अशिक्षितपणाचं लेबल

मला ना ते हल्ली ‘तुम्ही शिकलेली माणसं असं …….’ हे वाक्य कुठं ऐकलं ना ( म्हणजे माझ्या स्वतःकडून आलं तरीही ) मला हसायलाच येतं. म्हणजे शिकलेल्या माणसांना एका चौकटीत बसून मोकळे झालोत आपण ? म्हणजे काय तर अशिक्षितपणाचा ठप्पा ( अशिक्षितपणाचं लेबल ) आपल्या वाट्याला येईल अशी कामे शिकलेल्या माणसाने कधी करूच नये वा त्याच्याकडून अशी कामं कधी घडता कामाचं नये, असा अलिखित नियमच जणू लागू केलाय ? त्याने तेच करावं जे इतरांना ( एक विशिष्ट असा शिक्षित वर्ग ज्याला ते ) योग्य वाटतं ? बाकी त्याने काही करू नये ? बरोबर ? अनवधाने..चुकून काही घडलंच तर आहेच चिखलफेक दगडफेक शब्दांची, अशी तशी …ह्याच लोक्कांकडून .. आता माणूस आहे म्हटला तर तो इथे तिथे थोडा गडबडणारच, साहजिकच आहे. यंत्रासारखं स्थिर अचूक राहणं वा राबणं त्याला थोडंच ना जमणार आहे. तो थकणार, आळस करणार, गप्पा गोष्टीत रमणार ….आणि कधी कधी गडबडणारच… तोल जातोच होsss माणूस आहे म्हटलं कि .. हो कि नाही ? सर्वगुणसंपन्न एखाद विरळाच होssssss , म्हणूनच म्हणतोय, ज्याचं त्याने स्वतःला पारखावं. स्वतःला उभं करावं.. कुठं काय अडलं गड्बडलंच तर … अशिक्षितपणाचं लेबल मात्र कुणावर चिटकू नये. स्वतःने हि आणि स्वतःला सुशिक्षित समजून घेणाऱ्यांनीही.. गंमत म्हणजे आपण त्यातच श्रेष्ठ असतो. -संकेत पाटेकर

Comments

Popular posts from this blog

नातं बहिण भावाचं - नातं प्रेमाचं

वपु .. माझे आवडते लेखक ..

' आठवणीतला एक दिवस ...आपला वाढदिवस '