शुक्रवार, ३ जून, २०२२

दोन डोंगराच्या हिरव्याशार वनश्रीतुन ...
हसत बागडत आढेवेढे घेत झुळझुळणारी नदी... 
आपल्या मधुर कंठ स्वर-सुरातून वातावरण चैतन्यमय करणारे आणि 
आकाशी मुक्त घिरट्या घेणारे स्वच्छंदी पाखरं... 
 फुला ताटवांचा सुगंधित लेप घेऊन आपल्या शरीर मनावर थंडाव्याचा शिडकावा करत स्मित हास्य उमटवणारा उनाड वारा... आणि वाडीतल्या टोकाशी...प्रशस्त मोकळ्या जागेत...
शांत उभं असलेलं आणि प्रसन्नता बहाल करणारं देऊळ..
आणि ह्या सर्वांशी संवाद साधणारे आपण... 
 कोकण म्हणजे आनंद 
 हवे हवेसे वाटणारे क्षण 
 - संकेत पाटेकरकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .