शनिवार, २२ ऑक्टोबर, २०१६

‘ती‘ एक ग्रेट भेट

मला आयुष्यात फक्त भरभरूनं प्रेम हवं होतं, संकेत... तेच मिळालं नाही.
क्षणभर स्मित करून , कुठल्याश्या भावगर्दीत ती पुन्हा गढून गेली.  मी मात्र एकटक तिच्याकडे पाहत राहिलो. मनातील दबलेल्या त्या भावना उघड करताना  तिच्या डोळ्यातून आसवं तरळून येत होती.
गोठलेल्या त्या जुन्या जखमां, आज पुन्हा नव्याने पाझरू लागल्या होत्या. त्याचा दाह , त्या मनास  सलत  होता.  त्यास  कारण अन निमित्त मात्र आज मी ठरलो होतो.

एक मित्र म्हणून, मैत्रीतला विश्वास म्हणून , तिचं अनुभव विश्व ,जीवनपट  माझ्यासमोर उलगडलं   जात होतं . ती बोलत होती, नजरेच्या आसवांतून ,  काळजाच्या  दुखिव वेदनेतून अन मी ते सर्व कानी घेत होतो. हळुवार ..

संकेत , हसावं लागतं बघ, जीवनासोबत ह्या  चालायचं झाल्यास..
अगदी म्हणायचं तर लहानपणापासूनच संघर्ष सुरु आहे माझा ह्या  जीवनाशी...
आधी स्वतःच्या शिक्षणासाठी  संघर्ष ,  मग घरातील व्यक्तींच्या आनंदासाठी आणि मग प्रेम .....
ते हि आलं खरं जीवनात , पण सुखानं  नांदलं नाही.

ज्याच्या सोबतीनं  मी आयुष्याची विविध रंगीन स्वप्नं  पहिली. एकत्रित सहवासाने स्वप्नं रंगिवली .
त्यानेच  ऐनवेळी सांगता , विविहबद्ध होतं , माझ्या स्वप्नांची आशाच मावळून दिली.
मला एकाकी करून सोडलं.  खूप रडले होते रे मी तेंव्हा ,  अस्वस्थ,  छिन्न - विच्छिन्न झाले होते.
वेदनांच्या अक्षरशः  ज्वाला फुलल्या होत्या .
त्यात काही वर्ष निघून गेली.

घरच्यांनी  एक स्थळ आणून ,  लग्न लावून दिलं माझं ,   
पण ते हि अवघे दोनच महिने , दोन महिन्याचा काय तो संसार राहिला.  तिथे हि उध्वस्त झाले मी
काय चूक होती म्हणा माझी.  आहे ते सगळं क्लीअर केलं होत ना मी त्याच्याशी ,
पण स्वार्थ नजरेतून त्यानं  माझ्याशी लग्न केलं. अन माझं आयुष्यच उधळून लावलं .
आता  एकाकी मी जगतेयं. हसतेय .

सदा चेहऱयावर हास्य असणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात इतके दुखिव वेदनांचे धागेदोरे असतात . हे मी आज प्रत्यक्ष पाहत होतो. तिच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी आज नव्यानेच  कळत होत्या.
ती मोकळी होत होती, हळुवार मनाचा एक एक कोपरा उघड करत....

खूप वाटायचं रे  ‘संकेत , कुणी तरी असावं. ज्यांच्या खांदयावर डोकं ठेवून आपण  भरभरून बोलावं , रडावं , मोकळं होतं हलकं व्हावं. शांत एकाकी पडून राहावं. पण असं कुणी भेटलंच नाही रे... 
असो , हवं ते मिळायलाच हवं असा काही नियम नाही आहे ना? जे आहे त्यातच  आनंद
तसही हसणं शिकलेय मी ,   अन त्याबरोबर  जगणं हि ………..

मी पाहत राहिलो तिच्याकडे, नजरेतल्या कडा ओलावल्या  होत्या.  बोटाने , हळुवारं ते कड,  ती पुसू पाहत  होती . एक स्तब्धता पसरली होती .
वाटलं म्हणावं , मोकळी हो बिनधास्त , मी आहे .  पण त्या शांततेत ते सगळं विरून गेलं.
स्वतःशीच मन पुटपुटू लागलं.

माणसाला आयुष्यात काय हवं असतं बरं? फक्त नि फक्त निस्वार्थ मनानं केलेलं प्रेम.  अन मन मोकळा आधार , संवाद  , बस्स, पण त्यासाठी हि किती झगडावं लागतं,  ह्या आयुष्याची.
म्हणावं तर  , काही गोष्टी  किती सहज येतात आयुष्यात ,   सहजच अगदी , हव्या त्या वेळी , हवं तेंव्हा  , तर काही गोष्टी येता येता आयुष्य निघून जातं.

काही क्षण दोघे हि निशब्द होतो आम्ही , काय बोलावे ते कळतं न्हवतं. सुचत न्हवतं.  
तेवढ्यात तिचे बोल कानी आले .

आजच रडून घेते  रे , पुढच्या वेळेस कुणाला वेळ आहे,  हे रडगाणं पुन्हा गायला . एकदाच काय ते मोकळं व्हायचं .हसायचं
दोघांच्याही चेहऱयावर स्मित हास्य उजळलं
अन एक वेगळ्या  विषयाला पुन्हा  सुरवात झाली  .

आई बाबा गावी असतात.  लहान बहीण- भाऊ आहेत.  हि तिथेच आहेत
 सध्या इंजिनीअरिंगच क्षिक्षण घेत आहेत.
मला फार  शिकता आलं नाही.  पण  मला त्यांना  मोठं करायचं आहे. खूप शिकवायचं आहे...
एक भरीव विश्वास तिच्या नजरेतून ओसंडून वाहताना दिसत होता .

मुंबईत इथे मी एकटी आहे. एकटी राहते.  आज जवळजवळ आठ वर्ष झाली.
ह्या मुंबईने , ह्या डिफेन्सस सर्व्हिसने माझ्यात एक बिनधास्तपणा अंगी भिनवला आहे.
अजून खूप सारी स्वप्नं आहेत. माझ्याच ह्या फिल्ड मध्ये मला पुढे जायचंय. जमेल तसं कुणाचा आधार हि व्हायचं आहे. जीवन सार्थ करायचं आहे . बस्स ....
बोलता बोलता ती थांबली. नव्या आत्मतेजाने तिचं मन  प्रसन्नतेत वाहू लागलं होतं.  

भेटीचा म्हणावा तर हा आमचा पहिलाच क्षण आजचा . वर्षभराची जुनी काय ती ओळख.  पण कधी भेटणं झालं नाही. मध्यंतरी तसा भेटीचा योग जुळून आला होता म्हणा ,  पण भेट अशी झालीच नाही .  ती आज घडली (वर्षभराने ) अन ते बरंच झालं म्हणा ,  एक धडाडणारं  खिलाडी व्यक्तिमत्व ..नजरेसमोर आलं.

'ईशान्य वार्ताच्या'  मासिकात छापून आलेल्या माझ्या त्या लेखामुळे तिची अन  माझी काय ती ओळख .
सामाजिक क्षेत्रात पुढाकार घेऊन ,लोक कल्याणासाठी , कुणाच आधार होण्यासाठी , सतत धडपडणाऱ्या व्यक्ती मध्ये हि एक , माझ्या मैत्रीच्या लिस्ट मध्ये हिचा  समावेश आहे .हिचा सहवास आहे . ह्याचा मला फार आनंद आहे .  अनं सार्थ अभिमान हि ...,

अगदी वयाच्या साठ सत्तरच्या आसपासच्या हिच्या मित्र मैत्रिणी आहेत . ह्याचा  खरंच खूप कौतुक वाटतं मला  . त्यांच्याशी दिलखुलास बोलणं , त्यांच्यात आपलं म्हणून सहज मिसळून जाणं. त्यांचं होऊन जाणं ,  हिला सहज  जमतं.
नुकतंच एका आजी आजोबांचं . नव्याने लग्न जुळवून दिलं हिने, म्हणे
हे सार अन सगळं कौतूकास्पद आहे
वाचनाची अन कवितेची आवड तर लहानपानापासूनच    ,
पण आता मात्र ह्यासाठी तिला वेळ मिळत नाही

खरंच , वर्षभरात मी तिला इतकं जाणलं न्हवतं.  ते प्रत्यक्ष भेटून आज तिच्याबद्दल एवढं काही जाणता आलं मला
म्हणतात ना , ' माणसं जेवढी 'जवळ' तेंवढी ती अधिकतेने कळतात. नव्याने उलगडली जातात . आतून बाहेरून . तशी ती आज मला  कळली, उमगली आतून बाहेरून.

चेहऱयाशी  हास्य  खिळवून , इतरांचं जगणं अन  जीवन हास्यगंधीत करणाऱ्या एखाद्याचं 'आयुष्य' आतून किती दुखीव वेदनांनी  जखमी असतं. ते हि आज जवळून  पाहिलं.

किती वेदना , किती संघर्ष ,किती त्या ओल्या  जखमा ,  अंगभर झेलुनही ,  फुटणाऱ्या आसवांना आत  दडून ठेवण्याचं , हसण्याचं अन हसवण्याचा सामर्थ्य ह्या लोकांत असतं.
त्यांचे अनुभवी बोल , शब्द नि शब्द म्हणजे प्रेरित जलसागर असतं .  आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी . अन अशी माणसं केवळ योगयोगने भेटतातं.

सलाम तुझ्या कर्तुत्वाला अन जगण्याला......

-  संकेत पाटेकर 
    22.10.2016


शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०१६

‘संवादातलं मन’

आठवतोय तो संवाद .. शेवटचा अवघा मिनिट ...
तू म्हणाली होतीस… तुझ्या हळुवार पण काहीश्या भावमग्न  आवाजात   ..
''लिहत रहा म्हणून ..छान लिहितोस.. तू ''
मी हि म्हणालो होतो त्याच अदबीनं  ..बोलत रहा म्हणून ...
आठवतंय ?
शेवटचे  शब्द ..तुझ्या माझ्या हृदयातले. त्या संवादातले .
आठवतंय का ?

खरं  तर बोलायचं होत मला , त्याही पुढे  ...माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून .. सोबत रहा , बोलत रहा रे ,
पण नाही म्हणू शकलो. तो अधिकार मला असूनही न्हवताच.
हृदयास किती घाव पडत होते तेंव्हा ...ठाऊक आहे ? 

एकमेकांजवळ येऊन , कित्येक स्वप्नं नजरेशी रेखाटली होती आपण.
‘मला फोटो वगैरे काढायला आवडत नाही हं... आपण लग्नामध्ये एकचं फोटो काढायचा...’
इथपासून .. कितीतरी गोष्टी ऐकवल्या होत्यास तू अन मनातून कितीसा हसलो होतो तेंव्हा  मी .
पण त्या स्वप्नांची  ती रेख ..धूसर होत गेली हळूहळू ..

हाताची एक पकड , स्वप्ना पूर्तीच्या आधीच मोकळी होऊ लागली. असतील काही कारण त्याची हि किंव्हा आहेत ...

पण मन न्हवतं  मानत  रे .... घेतलेला तो हात ...आपल्या हातून मोकळं करू देणं . 
माझ्याकडून जेवढे प्रयत्न होतील ते मी केले.  आपल्यातले बंध तसेच टिकावे म्हणून ...
पण नाही सफल होता आले त्यात . बहुदा ..हेच नियतीला मान्य असावं .

आपल्या दोघांना एकत्र आणून वेडी स्वप्नं तना मनाशी जोडून ...त्याने योग्य वेळी योग्य ती खेळी केली . 
काय बरं सांगायचं असेल ह्या नियतीला अश्या प्रसंगातून ह्या घटनातून ? 
हृदयात जागा करून पुन्हा असं बेघर करून सोडून देणं ? 
प्रेमाचा अर्थ मनाशी लगावून द्यायचा होता . कि वेदनेची दाहकता  ? असो ...
जे झालं ते झालंच...
नातं मनातलं होत त्यामुळे ते मनातून तुटणं कदापि शक्य नाही .
ह्या आठवणींना मरण नाही. 

तुला ठाव आहे. ?
त्या संवादा नंतर , कित्येक दिवस मी वाट पाहत राहिलो..अगदी व्याकुळतेने ..भावविव्हळ  होत.
म्हटलं येईल तुझा फोन एकदा तरी  ...नक्की येईल. 
पण तो आवाज,  त्या आवाजातला नाद पुन्हा कानी घुमलाच नाही.

मी लिहत राहिलो ..तुझ्या एक एक आठवणींना ..शब्दमुलामा देत.
तू पाहत होतीस..वाचत होतीस  ...लाईक हि करत होतीस .
पण ते सगळं ह्या आभासी दुनियेत..........

प्रत्यक्ष बोलणं ..भेटणं ...नाहीच पुन्हा…

मी मात्र लिहतोय अजूनही ...  तुझ्यासाठी .


संवादातलं मन..
हृदया एक स्वप्नं सखी…
संकेत पाटेकर
30/09/2016 




बुधवार, २१ सप्टेंबर, २०१६

जीवन कोणावाचूनहि थांबत नाही ...

मनमोकळं हास्य घेऊन, किती सहजतेने आयुष्यात आलीस तू .. हो ना ?
जितक्या सहजतेने आलीस तितक्याच सहजतेने...एक दिवस निघून हि गेलीस.. 
मागे हि वळून पहिले नाहीस तू ? एकदाही ...
भिरभिरणारं एखाद सुंदर फुलपाखरू...आपल्या कळत नकळतं जसं हाती विसावंतं , मनमोकळं हसू उजळवतं , आनंद देतं आणि भावनिकतेची कड ओलावतं हळुवार निघून जातंतसं झालंय... माझं अगदी..

कळलचं नाही ...कधी आलीस ,निघून गेलीस तू...
कळले इतकेचं...ते श्वास रोखुनी गेलीस तू...

एकमेकां सहवासातले ते सोनेरी क्षण ...तेच आयुष्यं झालंय ...माझं...

किती जवळ होतो रे आपण...
बघ ..किती दूर निघूनि गेलो ....

हाती उरलेत ते केवळ आठवणीतले उबदार क्षण ...
अन भावनेने व्याकुळलेल्या अन ओथंबलेल्या ह्या प्रेमसरी ...त्यातच ओलचिंब झालोयं मी...

बघ, ऐकू येतेयं का ....... हृदयी साद ...... ?
बघ जरा माझ्याकडे .. बघ ना ...
हसतोय मी ...पाहिलंस माझं हास्य....? कुणी हि सहज वेडा म्हणेल............

कसा वेडासारखा हसतोय ..स्वतःशीच ...हाहाहा...
पण त्यांना कुठे कळणार .... का हसतोयं ते ....? 
गर्द आठवणीच्या धुंद नशेत झुळतोय मी ..आणि नजरेसमोर... तू आहेस ....केवळ तू ....

जीवन कोणावाचूनहि थांबत नाही बघ ...  पण सहजीवनातल्या त्या क्षणीक ( क्षणासोबत विसावलेल्या..बेधुंद ) आठवणी... साथ सोबत सोडत नाही ..हे हि खरं, नाही का ?
बघ , जरा मागे वळून ....अजूनही झुळतोय मी ............तुझ्या प्रेमरंगात ...

असंच काही सुचलेलं..
मनातलं काही ..- संकेत पाटेकर 
20.09.2016 



शनिवार, १७ सप्टेंबर, २०१६

ऐक सखे...

काही सांगायचे होते..
काही ऐकायचे होते..
काही जुन्या क्षणांना..
जरा गोंजरायचे होते..

क्षण हसवायचे होते..
जरा रुसवायचे होते..
मनं, नव्या क्षणांशी ..
जरा मिसळायचे होते..

भाव निरखायचे होते..
हृदयी जमवायचे होते..
मन तुझे आणि माझे..
जरा उसवायचे होते..

नाते झुलवायचे होते..
जरा फुलवायचे होते..
गंध मोकळ्या मनाचे..
तळ शोधायचे होते...

काही सांगायचे होते..
काही ऐकायचे होते..
ऐक सखे.....
जरा भेटायचे होते

~ संकेत पाटेकर
१७/०९/२०१६

गुरुवार, ८ सप्टेंबर, २०१६

आज पावसाने आनंद दिला...

आज पावसाने आनंद दिला...

वय वर्ष साधारण पासष्ट ते सत्तर च्या आसपास असणाऱ्या त्या आजी आणि पावसाच्या नितळत्या सरींसोबत, रस्त्याच्या कडेकडेनं  ..हळुवार , चालता बोलता झालेला  आमचा मन मोकळा संवाद...

अगदी क्षणभराची ओळख, पंधरा एक मिनिटे ,  अन  त्या एवढ्याश्या ओळखींमध्ये सुद्धा माणसं आपलं जीवनपट दिल खुलास मांडतात . त्याचा हा अनुभव. 

सकाळची साडे आठची वेळ , नेहमीच्या घाईगडबडीत आपला ऑफिस साठी निघालो. 
नित्य नेहेमीची लोकल आपली वाट पाहत बसणार नाही . म्हणून पाऊलं झपझप पुढे  पडत होती. 
पण पावसाने ऐनवेळी मुसंडी मारल्याने पाउलांचा वेग काहीसा मंदावला होता. तरीही  दहा एक मिनिटाच्या चालीनंतर कुठेसा भास्कर कॉलनीतून ..हितवर्धिनी मैदानाच्या आसपास पोहचलो. स्टेशन (ठाणे ) अजून हि दहा एक मिनिटाच्या अंतरावर होतं.  

पाऊस मनाची ओघळती टपटप रस्त्याशी सुरुच होती. छत्रीचा आडोसा घेतं माणसं ये जा करत होती. 
त्याच रस्त्याकडेनं एक आजी मात्र , डोक्याशी ओढणी घेतं ... पावसाच्या सरींपासून स्वतःला  सांभाळत,  हळुवार (वयोमानाप्रमाणे )एकटक अश्या  पुढे सरत होत्या. 

पावसाने ऐनवेळी हजेरी लावल्याने , छत्रीअभावी  त्या बाहेर निघाल्या असाव्यात ...असा एक  साधा सोपा कयास बांधत मी पुढे सरलो. 
ह्या वयोमानाप्रमाणे  पावसात भिजणे म्हणजे आजारला आमंत्रण देणे वा ओढवून घेणे आहे. असं स्वतःशी म्हणत , त्यांच्या जवळ गेलो. डोईवरी छत्री धरली. 

त्यांनी हळुवार नजरेने माझ्याकडे पाहिलं. 
अन धीम्या स्वरात म्हणाले '' अरे तुला उशीर होईल...कामावर जायला ?''  मी हि तितक्याच अदबीने  म्हणालो , नाही ..नाही , अजून वेळ आहे, नाही होतं उशीर...
कुठे जायचं आहे तुम्हाला  ? 
' तो समोर वटवृक्ष  आहे नं तिथे राहते मी ...पाचव्या मजल्यावर ...' समोर बोट दाखवत त्या म्हणाल्या, 
'अच्छा ...! चला मग,  तिथवर  सोडतो मी तुम्हाला ' ...असं म्हणत मी त्यांच्यासोबत चालू लागलो. 

चालता बोलता दोन अनोळखी 'मनं' क्षणातच मोकळ्या संवादात कधी  मिसळून गेली.. ते कळलंच नाही . 
मनातलं पाखरू उघडपणे भिरभिरू लागलं . 

त्यांनी त्यांचा जीवनपट थोडक्यात सांगायला सुरवात केली . मी  ते सगळं मनाशी टिपत होतो. 
आडनाव - धारप...
वय वर्ष साधारण 65 ते 70 च्या आसपास...
 मूळचे नागपूरकर , नंतर गिरगाव ..मग आता ठाणे.  
पेशा - शिक्षकी - भायखळा येथे एका शाळेत  गणित अन विज्ञान विषय घेऊन आठवी ते दहावी वर्गाला त्या शिकवत असत . गणित हे त्यांचा आवडीचा विषय .  
आता मात्र रिटायर्ड आहेत. 

लहानपणीच आई वडिलांचं छत्र हरपलं . तरीही त्या जिद्दीने  शिकल्या. आपलं शिक्षण पूर्ण केलं . अन शाळेत रुजू झाले  . त्यांच्या भावंडात त्या एकट्याच जास्त शिकलेल्या. त्यांना एकूण तीन भाऊ ( दोघं आता हयात नाहीत )  अश्या एक ना अनेक गोष्टी त्या  सांगू लागल्या . 
गणपतीचा त्या वेळेसचा उत्सव , आताच उत्सव ह्यावर हि थोडीफार  चर्चा रंगली..अन चालता बोलता आम्ही त्यांच्या वटवृक्ष असलेल्या संकुलात येऊन पोहचलो.  

त्यांनी चहासाठी आग्रह धरला. '' घरी ये ...बैस , चहा  घेऊन जा '' 
कामावर जायचं असल्याने,  मी  पुन्हा कधी , नक्की येईन असं म्हणत माघारी वळलो. नवा क्षण अन नवा आनंद मनात साठवत....

आपल्या रोजच्या आयुष्यात,  ह्या  जगण्यात अगदी लहान सहान गोष्टीतही किती आनंद असतो बघा... 
''आनंद देण्यातहि आहे अन आनंद घेण्यातही ''  . आज  मला आनंद मिळाला तो आशीर्वादाच्या रूपाने ...डोईवरी छत्र  धरत..

आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. 

- संकेत पाटेकर 
08.09.2016