कधी कधी एक विचार मनात येउन जातो ,
कि येन गर्दीच्या वेळी मुंबईसारख्या ठिकाणी लोकल ट्रेन ने प्रवास करणाऱ्या ज्या व्यक्तीमध्ये १५- २० मिनिटाच्या त्या अवधीचा , त्या प्रवासाचा , ' त्रास सहन करून घेण्याची बिलकुलच क्षमता ज्यांच्याकडे नसते . त्या व्यक्ती , त्यांच्या घरी , त्यांच्या ऑफिस मध्ये त्यांच्या मित्रान सोबत कश्या वागत असतील बरे .......?
प्रश्नच पडतो , पण त्या प्रश्नाला काही एक अर्थ नसतो. ज्याच्या त्याच्या जीवनाचा तो प्रश्न ..मला प्रश्न पडून काय तो उपयोग . ?
पण असो ,
सांगायचं तात्पर्य कि , मुंबई ची हि लाखो लोकांची जीवनवाहिनी ,आपली लोकल ट्रेन ,
सर्वात मोठी आणि पहिली गोष्ट शिकवते ती , सहनशीलता, आणि मानवता धर्म.
काही लोकांचा अपवाद वगळता , ह्याच दर्शन नित्य नेहमीच आपणास घडतं.
पण ह्याच बरोबर अशा अनेकानेक गोष्टींच जीत जागतं दर्शन हि लोकल ट्रेन करून देते ,
पण त्यासाठी तशी डोळस वृत्ती हवी आणि संवेदनशील मन .
आणि ते सर्वांकडेच असत नाही का . ..
मनातले काही...
संकेत य पाटेकर .
०९.०७.२०१३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .