बुधवार, २९ जुलै, २०१५

आपलं म्हणणारं आपलं..ही कुणी आहे...

आपलं म्हणणारं आपलही कुणी आहे . ह्यातच किती सौख्य आहे . .....
बळजबरीने कुणाला हि आपलंस करता येत नाही वा कुणाचं मन जिंकता येत नाही .
वाटतं तितकं सोपं नसतंच कधी ... कुणाला आपलंस करनं...., आपल्यात सामावून
घेणं... 
काही वेळा सहज जुळून येतं सगळ ... काही वेळा प्रयत्नांची पराकाष्टा करावी
लागते.
तरीही कसली शाश्वती नसते ............शेवटी उरतो तो नशिबाचा भाग .....

काही नाती जुळतात , काही नाही . काही नाती जुळल्या तरी त्यात प्रेमाचा अंश
टिकेलच अस नाही .
हि परिस्तिथी कोणता लंपडाव खेळेल ह्याचा ही नेम नाही .
खर सांगू ..प्रेमासारखी दुर्लभ गोष्ट नाही .
कणकण कुणी त्यासाठी तडफडतं ....कुणी त्यासाठी आपलं अनमोल जीवन कवटाळतं .
कुणास सहज मिळून जातं हो ...एखाद्याचं प्रेम ....
कुणी वाट पाहतं बसतं , कुणी वाटेला लागतं. कुणी व्याकूळतेने आतून ओक्साबोक्शी
रडत राहतं ...
क्षणभराचा सहवास हा .. कुणा एखाद्याचं जीवन आनंदाने फुलवू शकतो ...
आपलेपणाचा शब्द हि कुणा मनाला फार मोठा आधार होवू शकतो .
प्रेमाच्या स्पर्शाची जादूच न्यारी ......त्याबद्दल काय बोलावं.
नात्यानुसार त्या स्पर्शाची उब निराळी असते हो . . एखाद्याच जीवन त्यानं
सार्थकी लागू शकतं.
आपलं म्हणणारं आपलही कुणी आहे . ह्यातच किती सौख्य आहे .
जीवनात अनमोल एकच आहे ते म्हणजे प्रेम ....
कुणी त्यापासून वंचित असेल तर ते त्यास द्या ..........निर्मळ मनानं.. 
आनंद मिळेल ..त्यासही आपणासही....
मनातलं काही ..
संकेत य पाटेकर
२९.०७.२०१५


सरप्राईझ पार्टी ..

आयुष्यात चांगल्या मित्रांची साथ संगत लाभनं हे नशिबातच म्हणावं लागेल.
असे मित्र मला लाभलेत ह्यातच माझं अर्ध अधिकी जीवन सार्थकी झाल्याचं मी समजतो. 

हे मित्र लाभनं जस भग्यातलं समजावं तसं त्यांच्या शिवाय हे जीवनं जगण देखील
व्यर्थच म्हणावं लागेल.
नेहमीच कुठल्याही प्रसंगी तत्पर असणारे .
न बोलता , न सांगता, कधीही कुठे हि, कसेही , टपकणारे हे मित्र .
म्हणजे आपला एक परिवारच ....एक इवलंस पण मोठ्या मनाचं , मोठालं कुटुंब...
आपल्या सुख द्खाचा वाटा स्वताहून हिसकावून घेणारे ... हे मित्र ,
आपला मूड असो वा नसो ...पण नेहमीच आपली सोबत करणारे ..हे मित्र ,
कधी सगळ्यां समोर आपली टर्र उडवणारे , कधी हसवून खिदळवनारे , कधी योग्य तो
मार्ग दाखवून ,मार्गीस्थ लावणारे , छोट्या छोट्या गोष्टींवरूनही पार्टी
मागणारे... हे मित्र ,

खिशात दमडी नसतानाही , स्वताहून आपले पैसे भरणारे ....,राहू दे रे, ' घेईन
नंतर व्याजासकट अस मुद्दामहून म्हणनारे , पण दमडी हि न घेणारे.. हे मित्र ,
कधी चित्रपट पाहण्यास चल म्हणणारे, नाही म्हणताच ओढवून घेऊन जाणारे ,म्हस्का
मारणारे , अन CCD त कॉफ्फी पाजणारे हे मित्र ..

कधी टपरीवरचा चहाचा घोट घेता घेता तासनतास गप्पात रंगणारे ,
कधी मुंबईतल्याच सागरी किनारी सांजवेळी एकांतात हरवणारे हे मित्र ,

कधी सह्याद्रीच्या माथ्यावरून ओसंडलेल निसर्ग सौदंर्य न्याहाळत ,सृष्टीचं
गुणगान गाणारे हे मित्र ,
कधी प्रेमा सारख्या हळव्या विषयावरून ..बोलून टाक रे , आता तरी वेळ दवडू नकोस
, अस वेळेच गणित मांडून समजावून सांगणारे हे मित्र ,

बिनधास्तपणा राहणारे , बिनधास्तपणातच जगणारे अन जगण्यास शिकवणारे असे हे
टवाळ खोर (मुदाद्मुहून हा शब्द टाकतोय हा )मित्र ...

हे मित्र म्हणजे आपल्या जीवनातील सुखाची हर्षगुणी लाटच जणू .. ती लाट स्वतः
बरोबर, काही ना ना काही भरभरून घेऊनच येत असते . अन आपण त्यात थुई थुईनि
हर्षमुख होवून जीवनगाण गात असतो .

असेच काही माझे मित्र ..अन त्यांनी दिलेली हि सरप्राईझ पार्टी ..

रात्री साडे बारेचा ठोका , दरवाज्यावर ठकठकल्याचा आवाज आला .
इतक्या रात्री कोण असणार ? म्हणून मनात ना ना विचारांचा फडश्या पडला.
वाढदिवसाचा दिवस नुकताच टळून गेला होता.

रविवारची मध्यरात्र सुरु झालेली ..., रातकिड्यांची संगीतमय स्पर्धा सुरु झाली
होती. त्यांची किर्र किर्र सुरु होती. 
गावी असल्याने ..साहजिकच रात्री १० च्या आधीच सगळेच सामसूम असतं. (मी हि
होतो ) संपूर्ण गाव निद्रास्त असतं अश्यावेळी . अन अश्यावेळीच नेमकी ठक ठक ..ठक ठक
.....
सावध पाउलनिशिच हळूच दरवजा उघडला . बाहेर डोकावून पाहिलं .
अंधाराशिवाय काही दिसत न्हवतं .पण क्षणात 'हैप्पी बर्थ डे' चा नारा देत एका
पाठोपाठ एक मित्र हजर झाले. अन एकाकी आश्यर्यचा सुखद धक्का मिळाला.
रात्री साडे बारा ते एक दरम्यान 'बर्थ डे सेलेब्रेशन' सुरु झालं. फोटोशेशन चा
कार्यक्रम हि उरकला . अन त्यानंतर अडीच तीन पर्यंत गावाबाहेर ,काळोख्या
रस्त्यावरून ..भूता सारखे आम्ही भटकत राहिलो. भूत खोताच्याच गोष्टी करत ...
अशी हि मित्र मंडळी ...
दुसर्या दिवशी ...अथांग तळ्यात मनसोक्त पोहणं काय , नि शहरी पुन्हा येता
येता ...पवित्र भूमी उंबरखिंड चे दर्शन घेतो काय अन निसर्ग सौंदर्याची लयलुट
तृप्त भारल्या नजरेनेच लुटतो काय ...सारच न्यारं...मदहोश करणार ..
पण इतक असूनही एक ठिणगी मनाच्या तळ कोपर्यात तांडव करत होती. त्याने मनं
काहीसं ढासलेलं. एक जिवाभावाची जिवलग व्यक्ती आपला वाढदिवस, विसरतेच कशी?
ह्याचं शल्य मनास लागून होतं . अद्याप हि ..

भले हि आपण लहानच किती हि मोठे झालो तरी हे लहानपणातलं हट्टीपण काही मिटत नाही
हो . अन ते माझ्यात आताही आहेच .... ...त्यासाठी राग अनावर झालेला . 
पण तो आता हळूहळू ओसरतोय ....
कारण हक्काने भांडायला अशीच संधी लाभावी लागते . तीसोडायची नसते. अन ती मी घेतलेय .

मध्यंतरी (वाढ दिवसाच्या दिवशी ) मी काही वेळ मोबाईल बंद ठेवला होता .
त्यासाठी क्षमस्व ....

काहींचा फोन रिसीव्ह करता आला नाही . काही call करत होते पण तो लागला नाही .
काही मित्र नक्कीच रागावलेत . हे माहित आहे .

तुम्ही बिनधास्त भांडू शकता . हक्क आहे तो तुमचा ...
माझ्या सर्व मित्रांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद ....वाढ दिवसाच्या
प्रेममयी शुभेच्छांसाठी ..असंच प्रेम बहरू द्या ...दरवळत राहू द्या .
आपलाच ,
संकेत उर्फ संकु ..
२८.०७.२०१५
फोटो - संदेश कोयंडे

मंगळवार, १४ जुलै, २०१५

असंच काहीस मनातलं...

हा अमर्याद असा , विस्तारलेला निळाभोर आकाश , अन त्यावर , ना- ना विविध चित्रमय आकाराने नटाटलेली हि शुभ्रधवल गालिचं (पांढुरके ढग ) पाहून मनोमनं वाटतं . 
कधी टुणूक टुणूक , आपणही इकडून तिकडून उड्या घेत सर्वत्र हिंदडावं तर कधी , ती शाल पांढीरकी हळूच अंगा खांद्याशी लपेटून घेत निवांत पहुडावं .  

कधी कल्पनेचे गरुडपंख लावून ह्या भूतलाचे विहिन्ग्मय दृश्य डोळ्यात साठवून घेत मनास तृप्त करावं तर कधी बरसणाऱ्या त्या पावसाच्या सरींमध्ये , त्या उनाड वेड्या वार्यासंगे मुक्तपणे विहार करावं.
कधी अवचित फुलणाऱ्या त्या इंद्रधनु सोबत आपणाहून रंगाची मुक्तहस्ते उधळण करावी . तर कुठे स्वर गायनाचे सुरेल गीत गात पक्षी पाखरांसंगे आपणही लयबद्ध सोबत करावी.

ह्या सह्याद्रीच्या कड्या कपर्यातुनी धो धो कोसळणारा जल प्रपातांचा तो अविष्कार अगदी जवळून न्याहाळावा तर त्या टपोऱ्या थेंबे थेंबाचा शिडकावा अंगा खांद्याशी शीरशिरून घ्यावा .
असंच काहीस मनातलं...
संकेत पाटेकर
फोटो क्रेडीट - अनुराग उर्फ अन्या
ठिकाण - Sankashi किल्ला



नाती ...

ना ना विविध मनाच्या ह्या नाती .
सांभाळण खुप अवघड जातं. ओढाताण होते मनाची काही वेळा , काही प्रसंगी ..
प्रत्येकाचा स्वभाव निराळा ..प्रत्येकाचं मन वेगळ ,प्रत्येकाची विचार करण्याची
पद्धत वेगळी,प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या .., 
कुणी सहज समजून घेतं , चेहऱ्यावर सहजतेच हास्य उमलत , कुणी समजण्यापलीकडे जातं, नाक मुरडतं  ..रागाचा पारा चढवत...!
कुणी हट्टच धरून बसतं , कुणी गृहीतच धरून राहतं.
ओढाताण होते मनाची अश्यावेळी ..., कुठे कुठे लक्ष द्यावं , कुणा कुणाला
सांभाळाव .पण संभाळण भाग असतं... नाती हवी असतात .


कारण आयुष्य खूप सुंदर आहे. अन ते आपल्या अवती भोवती असलेल्या , आपल्या मनाशी
जुळल्या नात्यातील , त्या त्या व्यक्ती अन त्यांच्या आपलेपणाने अधिक सहज
सुंदर होवून जातं.


पण राहून राहून कधी प्रश्न पडतो ..
समजणारे , समजून घेणारे , अन प्रसंगी अगदी प्रेमाने समजून सांगणारे सारेच असले
असते तर ...
पण ह्या 'जर'- तर' ला अर्थच कुठे असतो म्हणा ....
ह्यातूनच मर्यादेची एक रूपरेखा आखली जाते , आपल्या मनाशी ..
कुणाशी किती अंतर राखून राहायचं ..कुणाशी किती बोलायचं ..कुणाच्या किती जवळ
जायचं .
असंच लिहिता लिहिता...
मनातल काही ..
संकेत य पाटेकर
१४.०७.२०१५

बुधवार, ८ जुलै, २०१५

निसर्ग आणि प्रेमं ..

ह्या निसर्गाचं एक वेगळंचं रूप आहे. अनेक गोष्टींनी तो अगदी स्वयंपूर्ण आहे.
त्याकडे काहीही कमी नाही. आपण बारकाईने , अगदी समरस होवून गोड कौतुकाने
त्याकडे पाहिलं . त्याला ऐकलं ना तर तो बऱ्याच गोष्टी कथन करत जातो.
आता हेच बघा ना ..!
कधी कधी ह्या हिरव्याशार वृक्षराजींच्या सहवासात असता , नजर हळूच सळसळनाऱ्या
, ' त्या पानांकडे एकवटली जाते.
अन मनात विचारांचा फुलोरा हळूच आकार घेत जातो.
किती प्रेम अन जवळीक आहे ह्या दोघांत , अन तितकीच उत्कंठा हि ...आगमनाची !
हा उनाड , खट्याळ वारा..
त्याच्या नुसत्या चाहुलीनं हि पानं- फुलं अगदी शहारून येतात.
लाजून मोहून ती अगदी थरथरून जातात . स्पर्शाची मोहिनी त्यांच्यावर झेप घेते
जणू...
एखाद्या प्रियकरांनं आपल्या प्रेयशीचा हात हळूच हाती घ्यावा. अन तिने त्या
स्पर्शानं अगदी शहारून जावं, हूरहुरून जावं. तशीच काहीशी चेतना अंगभर संचारली
जाते त्यांच्या ..
कुणीतरी येतंय , आपलं हसू खुलवायला ..ह्यानेच ते अगदी बेभान होवून जातात .
आनंदाने नाचू बागडू लागतात.
आपलेपणाची नाळ रोवून हा उनाड वारा हि न चुकता त्यांचा आनंद त्यांना तो देऊ
जातो. स्वार्थ बाजूला ठेवून...
एकमेकांशी त्याचं इतकं घन्निष्ट नातं जुळलेलं असतं कि काही वेळा हि पानं-
फुलं त्याच्या निस्वार्थी प्रेमापायी स्वतःची आहुती हि द्याला तयार होतात .
अन मग हा उनाड वारा हि मोठ्या धीरानं अन कष्टी मनानं त्यांना आपल्यासोबत
सामावून घेतो. वाहून नेतो.
असच काहीसं स्फुरलेलं..
- संकेत पाटेकर (संकु )
०८.०७.२०१५


गुरुवार, २ जुलै, २०१५

! पाऊस मनातला ...पाऊस आठवणीतला !

सकाळपासूनच साऱ्या सृष्टीवर मनावर सरसरनारा हा धुंद पाऊस...
'मनसोक्त भिजून घे रे ' अस जणू काही वेडावूनच सांगत होता . पण मी आपला स्तब्ध ,  एकाच जागी . ..अधीर मनानं सृष्टीच्या ह्या नवंलाईचं रूप डोळ्यात साठवत होतो . त्याशिवाय पर्याय हि न्हवता म्हणा . म्हणावं तर हे तनं मनं तर केंव्हाच आतुरलं होतं . चिंब भिजावं , मनसोक्त बागडावं म्हणून ..पण ठरली ऑफिस वेळ, नाईलाज .... काय करणार ..!

खिडकीतून दिसणारा , झाडांच्या पाना फांदीतून ओघळनारा , टपटपनारा , मोत्यावाणी 
नितळ असा तो थेंबे थेंबे पाऊस मी नजरेनेच काय ते टिपत होतो .
नजरेनेच प्राशन करत होतो. पण तरीही हे मनं काही तृप्त होईना .
अन त्याह्यानेच दुपारच्या मधल्या सुट्टीत (लंच ब्रेक मध्ये ) पावसाच्या रिमझिमत्या टपोऱ्या 
थेंबाचा मारक स्पर्श , अगा खांद्याशी घेऊ लागलो . त्याने काहीसा सुखावलो... वेडावलो . अन निच्छलं मनानं एका  ठीकान्याहून सृष्टी सौंदर्याच हे वेड रूपं टकमकतेने न्यहाळू लागलो.

साऱ्या जीव सृष्टीशी सुत जुळवनारा हा बेंधुंद पाऊस, ' हलक्या सरीनिशी अजूनही तसाच बरसत होता ,वाऱ्याचे मंद झोके त्याला हळूच वळवणी देत होते. मृदल माती अजून मृदू झाली होती. न्हाहून निघालेल्या वृक्ष वेली, अन थरथरत्या पानसळीतून टपटपनारे थेंबाचे टपोरी रूप, एखाद्या मोत्यावाणीच लकलकुन दिसे.  
तर वृक्षराजींच्या पायथ्याशी , भूसभूसित मातीतुनी एक ढंगाने,  एका चालीने मार्ग काढत  , चालीलेली मुग्यांची  पोटापाण्याची लगभग मनास शिस्तीचे डोस देऊन जाई.
कोकीळाची मंजुळ कुहु अधून मधून कुठ्नशी कानी येत, तशी हृदयाची स्पंदन वेडावत ,त्या लयात ती धडधडत.
एखाद इवलसं फुलपाखरू कुठसं बागडता दिसे, तेंव्हा मन त्याकडे आकर्षिले जाई ,
अन मनोमनं म्हणून जाई , किती छानुलं आहे ना ते !
सौंदर्याची रूपरेखा आपल्या पाठीशी घेत ते कस निवांत बागडत आहे बघ ! 
आपल्या मनाशी ना ना विविध रंग भरत..!
सृष्टीचं हे असलं वेडावलं रूप मनास भोवत होतं.

ऑफिस बाहेरचा परिसर पावसाने असा उजळून निघाला होता.
एखादी नदी , दुथडी भरून वाहत जावी तशी रस्त्यावरून 'वाहत्या' पाण्याचा प्रवाह एकीकडे खळखळू लागलेला .
त्या खळखळून वाहणाऱ्या प्रवाहाकडे पाहून , एकाक्षणी वाटलं कि लहानपणी केली ती दंगा   मस्ती , मौज मजा , त्या गमती जमती,  तो आनंद, आपण पुन्हा का लुटू नये ?
का पुन्हा लहान होऊ नये  ? लहानपण प्रत्येकात दडलेलं असतंच ना …
 भले हि आपलं  वय वाढत राहो.

एखादी कागदाची होडी करून (मग ती नांगर होडी असो वा राजा राणीची) वाहत्या प्रवाहात ती सोडून त्या पाठोपाठ धावून , टाळ्या पिटून, ‘ त्या क्षणाचा आनंद’ जो आपण आपल्या लहानपणी लुटायचो, ‘ तो आता ह्या क्षणी हि का बर्र लुटू नये ?
तो आता ह्या क्षणी हि लुटून घ्यावा . ह्या गोष्टीवर मनाचं विचारविनिमय सुरु झालं .
अन मनाने एकदाचा काय तो निर्णय घेतलाच.  
त्यासाठी ते कागद धुंडाळू लागलं. नजर शोध घेऊ लागली.  अवती भोवती भिरभिरु लागली .
पण कागदाचा तुकडा कुठेच  मिळेना.  त्यात भर म्हणून कि काय , 'एक प्रश्न (अश्यावेळी टाळक्यात गजबजलेलाच असतो) मनाशी पुन्हा डोकावू लागला.
लोक काय म्हणतील ? उगा पाहून हसतील, राहू दे , जाऊ दे…!
मन काहीस खट्टू झालं .   देवाशी गार्हान गावू लागलं
लहान पण देगा देवा ... हे लहान पण दे!
तितक्यात नजर हि  घडल्याकडे स्थिरावली , त्यानं भानावर आलो .. लंच ब्रेक संपला होता . 
पटापट ऑफिस मध्ये धाव घेतली . अन पुन्हा कामास जुंपलो.
पण हा पाऊस अजूनही मनावर रुंजी घालत होता.
ये पुन्हा ये ..धाव घे…
संकेत य पाटेकर
१०.०७.२०१५

ई मेल – sanketpatekar2009@gmail.com

बुधवार, १ जुलै, २०१५

आधुनिक जगाच्या गुजगोष्टी ...

Whatsapp वर एखाद तरी अशी जिव्हाळ्याची व्यक्ती असतेच , जिथे आपण दिवसभरात 
कितीतरी वेळा तिच्या Profile मध्ये डोकावून पाहत असतो . 
मग त्या व्यक्तीचा मेसेज येवो अथवा ना येवो ...आपण तिथे डोकावणारच 
आणि डोकावतोच ..अधून मधून ..wink emoticon 
कधी उगाच स्टेटस पाहणार , कधी लास्ट सीन , कधी profile pic , कधी असच..
चैनच पडत नाही म्हणा , wink emoticon wink emoticon
त्या मध्ये काही वेळा गम्मत अशी होते , कि नकळत whatapp calling वर क्लिक
होतं अन call लागला जातो . tring tring .....
अन त्यामध्ये आपली पुन्हा झटपट ...तो call end करतना होतेच होते .
तुमची हि असेलच अशी जिव्हाळ्याची व्यक्ती wink emoticon
whatspaa_ जग
- संकेत उर्फ संकु

सोमवार, ११ मे, २०१५

प्रिय आई ...

प्रिय आई ...,

साष्टांग  दंडवत ,
आज पुन्हा एकदा  तुला पत्र लिहायला घेतोय . बऱ्याच  दिवसाने ...रागावू नकोस हा ..
तुझी आठवण सदाच असतेच  अगं  !   सावली होवून  तू नित्य नेहमी सोबतच असते म्हणा...
पण तुला ठाऊक आहे ?  आज एक खास दिवस आहे. फार महत्व आहे अग त्याला . त्या दिवसाला .
कोणता माहित आहे. ? 'मातृ दिन' . MOTHER'S DAY..!

जन्म दात्या 'आई' साठी तिच्या प्रेमापोटी , भक्तीभावाने वाहिलेला एक दिवस. 
जगभरात साजरी केला जातो अगं  ..!
कुणी आपल्या आईसाठी काही भेटी गाठी देऊन. कुणी प्रेमाचं प्रतीक असलेलं,  गुलाबचं एखाद  फुल देऊन .  कुणी तिला बाहेर कुठे फिरायला घेऊन जाऊन,   आपल्या आई बद्दल,  तिच्या प्रती असलेल प्रेमं व्यक्त करत असतं. तसं प्रेम व्यक्त करायला  एखाद  ठराविक दिवस असायलाच  हवा  अस काही नाही . 
पण तरीही ठीक आहे ना  , काय होतंय ...
असो, 
वयाने कितीही मोठो झालो तरी , आईसाठी आपण तीच  अगदी  छोटं तान्हुल बाळ असतो. 
अन म्हणूनच लहानाचं मोठे झालो असलो तरी हि एखाद वेळेस आपण मुद्दाम तिच्या कुशीत जाऊन अलगद पडून राहतो. मायेच्या पंखाखाली  वात्सल्याची उब घेत .
तेंव्हा कसलीच चिंता नसते . ना कसले दुख .... ते सर्व्वोच क्षण असतात .
जीवनातल्या अथांग सागरातले ...स्थिर असे....!
लुडबुड  न करणारे , हवेहवेसे ..हसरे , आनंदा पलीकडचे ..हो ना...

पण आई , ऐक ना ,  कित्येक दिवस झाले बघ ..,मी ह्या क्षणापासून पोरका झालोय अग  .
तू अशी दूर , नजर ठेवून आहेस. आम्हावरती ..
''मी कुठे हि असली तरी  तुमच्य्वार  नजर ठेवून असेन.''  अस म्हणून तू रागावून  कुठे गेलीस ती गेलीस . 
पुन्हा न परतण्यासाठी..
पण कधीतरी तुला,  तुझ्या पिल्लाना कवेत घेउस वाटत  असेलच   ना ..,
सांग...येशील ना  परत....., तुझ्या पिल्लांसाठी .

तुझ्या उबदार कुशीत शांतपणे  निजायच आहे अगं..! 
तुझा मायेभरला प्रेमळ स्पर्श. ...ते धीरदार (धीर देणारे ) , कष्टाने झिजलेले तुझे नाजूक कोमल हात  ,
हळुवार केसांतून  भिरभिरताना    ..किती बर वाटायचं सांगू...
ते क्षण आठवले कि आजही तुझा हात  अलगद केसातून फिरत  राहतो .
किती सौख्य आहे अग त्या स्पर्शात  . सुखाची व्याख्या ह्यावूनी वेगळी  करता  येईल का ?

'मायेचा स्पर्श' सगळे 'क्षण कसे हलके फुलके बनवितात . वेदना  दु:ख ह्याना तिथे थारा नाही. 
एखादी भळभळती जखम सुद्धा 'आनंदाचे गायन' करत चिडीचूप होईल .
इतक सामर्थ्य  , इतकं प्रेम त्या मायेच्या अलगद होणर्या स्पर्शात असतं .
'प्रेमाची' उत्पत्ती मुळात 'आई' ह्या रुपान च झालेय  जणू  .
ती अवतरतली अन प्रेमाचं वारं भिनभिनू  लागलं सर्वत्र...,  मग ती हि 'पृथ्वी' रुपी आई का असो .
ती आई आहे . वात्सल्य मूर्ती आई...

माधव ज्युलिअन  ह्यांनी त्यांच्या कवितेतून ..लिहूनच ठेवलंय. 
'प्रेमस्वरुप आई, वात्सल्य सिंधू आई''

फ. मुं. शिंदे हि म्हणतात .
लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते
दुधावरची साय असते, लेकराची माय असते

आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही आणि उरतही नाही.

खरच गं  ...
आईच हे नातंच  अस आहे . श्रेष्ठत्वाच ..,,त्याला तोड नाही. त्याहुनी कुणी मोठ नाही.
बघ ,  हे मी कुणाला सांगतोय .  एका गोडश्या , प्रेमळ अश्या माझ्या  'आई' लाच  'आई' ची महती सांगतोय.
वेडा आहे ना मी ,..  तुझाच  तान्हुला  गं ..! समजून घे ..घेशीलच. 
अन ये पुन्हा ...तुझ्या ह्या लेकरूसाठी...वाट पाहतोय .

हैप्पी मदर्स   डे…...मातृ दिनाच्या शुभेच्छा…!  

तुझ्या पोटी मी जन्म घेतला हे माझं भाग्य .., अन हे भाग्य मला प्रत्येक जन्मी मिळू दे.
लव्ह यु आई… ,
खूप खूप खूप सारं प्रेमं  ..!


तुझाच  तान्हुला  गं,
तुझ्याविना जगतोय ,
मायेच्या स्पर्शाविना
पोरकपणं  वाटतयं !

तुझाच लाडका,
............

नातं तुझं माझं 

असच लिहिता लिहिता...
- संकेत य पाटेकर 
१०.०५.२०१५

गुरुवार, ३० एप्रिल, २०१५

'संवाद' हरवलेलं नातं ...

खूप काही लिहूस वाटतंय आज ? कारण हे मनं ,  फारच अस्वस्थ झालंय .
हळवं झालंय ते ,  'कारण 'संवाद'  हरवला आहे'.
बंध नात्यातला आपलेपणाचा 'संवाद'

कुठे दिसला का हो , तो ?
नाही ? नाही ना.....  ?
कुठेसा  निघून गेला आहे बघा   ... दूर कुठे , नाराज होवून माझ्यावर ...
कसं शोधावं अन कसं परत आणावं  त्याला  ? काही काही .... कळेना.
तुम्ही सांगू शकाल का ?
नाही.................असो,

आयुष्याची सगळी बहरच निघून गेलेय आता,
सगळे रंगच  जणू  धुसर झालेत  ,   रखरखत्या उन्हासारखं  अगदी...कालपटलेलं  जगण झालंय हे.
नाही राहवत आता..

तू हवा आहेस रे , खरचं  तू  हवा आहेस.
तुझ्याविना  ह्या नात्याला गंध नाही ..आपलेपणाचा स्वर  नाही,  चैतन्याचा बहार  नाही .
हास्य रंगाची  ती मुक्त उधळण  हरवलेय रे , तुझ्याविना . . .,

कुठे आहेस  तू , कुठे आहेस ?
सांगशील का ? बोल ना  काहीतरी...,

येशील  माघारी....  ..येशील  ...  ? बघ नाराज  नको होऊ असा ..
मला हवा आहेस  रे.......हवा आहेस तू...

मनाचे असे पुटपुटने सुरु होते . शब्द शब्दांची कागदावर  रीघ लागली होती.
भाऊक होवून ते स्वतःला त्यावर झोकु देत होते.

इतकं  वर्ष जीवापाड जपलेल्या नांत्यातला  मधाळपणा  , 'एकाकी कुठे  आणि  कसा   हरपला  कुणास ठाऊक , मनं  अगदी सैरभैर झालंय . अस्वस्थ होवून बसलंय आणि होणारच हो ,

जीवापाड जपलेल्या नात्यातला,  आपलेपणाचा गोड संवादच कुठेसा हरपला  म्हणजे मन असंच  सैरभैर होणार ,  नाही का ? .घुटमळनारचं  ते  मनातल्या मनात .

किती विश्वासाने नाती जोडतो आपण ? कितीशी स्वप्न बघतो . त्यात  हरखून जातो अगदी..
पण एकाकी......

विश्वासाची हि नाती , आपलेपणाची  साथ  कशी काय सोडतात, कळत नाही ?
त्याचा घाव मात्र झेलावा लागतो . ह्या इथे.... हृदयी...!
असो,

खूप काही विचार केला ह्या गोष्टीचा   , रात्रंदिवस अगदी..
मी चुकलो का, कुठे ? ते हि शोधून पाहिलं. कित्येक प्रश्नाचा संच पुढे मांडला .

तेंव्हा कुठे ऊतर आलं समोरून ...

तू कुठेच चुकत नाहीस रे , परिस्थितीनेच  मला बदललय.  

मी अगदीच सुन्न ...

परिस्थिती...,

हि परिस्थिती सुद्धा  अजब असते. खरच  बदल घडवते माणसा- माणसात..., त्याच्या विचारंना वेगळ्या वळणावर स्वार करते ती  .. स्वतःच्या निर्णयावर ठाम राहून ...
पण नाती..., त्याच काय ...?

आपलेपणाने जुळलेल्या नात्यात 'दूरत्व' का बरं  यावं.  ? ते हि त्या परिस्थितीमुळे .  ?
परिस्थितीमुळे एखाद नात्यात बदल घडू शकतो ?
छे ...पुन्हा प्रश्न ..

पण ह्याच उत्तर अजूनही काही सापडलं नाही . कित्येक दिवस ओलांडली . वर्ष निघून गेली .
नात्यातला  'संवाद'च हरवला आहे.  आता ते नुसतंच नातं उरल आहे. संवाद हरवलेलं नातं .
त्यात जाणीवा उरल्या  नाहीत .
एखाद्या कोमात गेलेल्या आणि संवेदना हरवलेल्या  व्यक्ती सारखंच  जणू  ..
जगण्यापुरता  श्वावोश्वास  काय तो सुरु आहे  ..बाकी आयुष्यातील  सारे रंग फिके ...

ह्यास जबाबदार कोण ? मी ? समोरील व्यक्ती ? कि हि परिश्तीती ? कि हा स्वार्थ ?
नाही   सांगता येणार मला, . सध्यातरी…
आणि आणि दोष हि कुणाला द्यायचा नाही आहे..
पण हरवलेला  तो 'संवाद'  मला पुन्हा आणावयाचा आहे.
नात्यातली ती  'बहरता  ' कायम ठेवायची आहे.
हास्य विनोदाचा, भरल्या प्रेमाचा , आपलेपणाचा गोड  संवाद हवाय मला.
त्याचसाठीच हि धडपड.
ऐकतेस का तू...
मला संवाद हवाय …आपलेपणाचा… प्रेमानं साधलेला. 
ऐकतेस ना...
संवाद हरवलेल्या नात्याची,  एका मनाची अशी हि अवस्था…

आपलं प्रत्येकाचं  आयुष्यं  तसं ह्या अनेकानेक नात्यांनी गुंफलंय.
मग ती रक्ताची नाती  असतील,  काही आपुलकीनं जोडलेली  ,   मना मनाची .
त्यात आई मुलाचं नातं असेल  , बहिण भावाचं असेल,  प्रियकर प्रेयाशीच असेल  , वा नवरा बायकोच .
ह्या सर्वांना एकसंध ठेवणारा , किंव्हा जोडणारा एक महत्वाचा दुवा म्हणजे हा  'संवाद'  .

नात्यातला मुख्य गाभा, तो नसेल तर नात्याला अर्थ नाही .
नाहीतर एखाद्या पर्णगळीत वृक्षासारखं ...भकास पण आलेलं ते नातं वाटायचं.
त्यातला हिरवा शारपणा जरा कायम  टिकून ठेवायचं असेल .  तर संवाद हवा .
पण नुसता संवाद  काही  उपयोगाचा नाही    ,  सुसंवाद हि हवा.

आपलेपणाचे , आपुलकीने म्हटलेलं  चार एक शब्द  मनाला खूप आधार देऊन जातात हो  . 
नवं काही करण्याची अन जगण्याची  नवी उमेद त्या स्वरातूनच   तर मिळते .  अन हेच तर  हवं असत आपल्याला.  
मनमोकळेपणाचे  आपलेपणाने म्हटलेलं गोड मधाळ शब्द . 
त्यात कधी , एखाद वेळेस उफालेला राग हि मग येवो , आपलेपणाचा  सूर  त्यात  असला म्हणजे त्याच काही वाटत नाही उलट   मनास समाधान लाभतं. आपल्या पाठीशी कुणी उभं आहे.  

जीवनात सर्व काही सहज सोप आहे . 
फक्त जीवापाड जपलेली आपलेपणाची,  आपली हि नाती आपल्या सोबत  असली म्हणजे झालं. 
हे आयुष्य उजळून निघेल . पण त्यासाठी संवाद हवा आपलेपणाचा…

तुमच्या नात्यात तो आहे ना ? असेल तर उत्तमच  , अन असू द्याच तो कायम , दरवळता….

नाती हि खरच अनमोल असतात ओ,  अन हा अनमोलपणा  प्रत्येकाला  जपायला हवा .

शेवटी  मनापासून म्हणावेस वाटतं  , कि…

‘संवाद’ हरवलेलं नातं नको... ‘संवादा’त हरवलेलं नातं हवं. 
… आपलेपणाचं..!

असंच लिहता लिहिता  ,
आपलाच ,
संकेत पाटेकर उर्फ संकु
३०.०४.२०१५

शनिवार, २५ एप्रिल, २०१५

' नातं' तुटत नाही , तुटतात ती ' मनं'

'नातं' तुटत नाही , तुटतात ती ' मनं' 
अन ती पुन्हा जुळवायला कधी वेळ हवा असतो तर कधी प्रेमाची हलकीशी थाप , अन आपुलकीचे काही उबदार प्रेमळ शब्द ... 
कितीही वाद विवाद झाले , रुसवे फुगवे झाले तरी प्रेमाचा एक हलकासा शब्द...
एक हलकसा स्पर्श ' मनातला' सारा राग क्षणात विसरून लावतं.  म्हणून प्रेमाशिवाय नातं नाही . 
अन नात्यांशिवाय प्रेम ....
प्रेम जिथे नातं तिथे .... 
 संकेत य पाटेकर 
४.१२.२०१३

अपेक्षांचं लहान मोठं भार..


कुणी रागावतं , कुणी बोलणं बंद करतं, कुणी रुसून बसतं. तर कुणी अगदी जुळलेल नातं तोडण्याच्या मागे पडतं. नाही नाही म्हणता म्हणता प्रत्येकाची आपल्याकडनं अन आपली समोरच्याकडनं  काही ना काही अपेक्षा हि असतेच. 
अन म्हणून रागावणं , रुसणं , ह्या सारख्या गोष्टी घडतच असतात. 
कुणाला आपलं वागणं पटत नसतं , कुणाला आपला चेहरा मोहरा पसंद नसतो.
कुणीकडे आपला स्वभाव नडत असतो, तर कुणाला प्रेमभरल्या मायेची अपेक्षा असते.
पण त्याची पूर्तता होत नसते, कुणाची काही औरच मागणी असते ती पुरी होत नसते , ह्या त्या कारणास्तव अपेक्षांचं लहान मोठं भार आपल्या मनावर थोड्या अधिक प्रमाणात तरी असतच असतं .
आणि ते आपण आपल्या परीने पूर्ण करण्याचा काटोकाट प्रयत्न करत असतो .
व्यक्तीव्यक्ती नुसार ..
मनातले काही ...
संकेत य पाटेकर
१८.०६.२०१४

शनिवार, १८ एप्रिल, २०१५

वपु .. माझे आवडते लेखक ..

वसंत पुरुषोत्तम काळे
वपु ..हे माझे सर्वात आवडते लेखक ..
आज ते हयात असते तर खरच नक्कीच भेट घेतली असती त्यांची.
त्यांच्यामुळे मला माणसातला माणूस शोधण्याच तंत्र गवसलं अस मी म्हणेन .
ती सुरवात हि मी माझ्यापासूनच केली आहे म्हणा, मी हि माणूस शोधतोय ....
स्वतःमधला , दडलेला माणूस , अन आयुष्याच्या ह्या प्रवास वाटेवर येणाऱ्या प्रत्येकामध्ये ...तो शोध घेण्याचा प्रयत्न करतोय ..
वपुंच्याच शब्दात सांगायचं तर ...
माणूस नावाचा प्राणी अनेकदा भेटला.
ना ना स्वरूपात भेटला , कधी खऱ्या स्वरूपात कधी खोट्या ,
तर कधी संपूर्ण स्वरुपात, पुष्कळदा तो निसटला हि , ह्या माणसानं कधी मला रडवलं कधी हसवलं , कधी भुलवलं कधी थकवलं , कधी बैचेनं केलं..कधी अंतर्मुख ..
तरीही माझा शोध चालूच आहे, अन चालूच राहणार ..माझा पेशन्स दांडगा आहे.
ह्याच श्रेय हि पुन्हा माणसांनाच आहे.
वाट पाहत राहण्याची माझी ताकद माणसांनीच वाढवली आहे.
साधारण ६-७ वर्षापूर्वी ठाण्यातल्या मराठी ग्रंथालयाचा मी सभासद झालो. अन तिथपासून खऱ्या अर्थाने वाचनाला सुरवात झाली . मित्रानी (जगदीश शेट्ये ) पाहिलं पुस्तकं हाती ठेवलं ते म्हणजे व्यक्ती अन वल्ली . पु . ल देशपांडे ह्याचं ..
तिथून पुढे मग.. , वि. स. खांडेकर , प्रवीण दवणे ह्यांनी वेड लावलं.
प्रवीण दवणे सरांच्या व्याख्यानाला जावू लागलो. भारावल्या अवस्थेत त्यांच्या व्याख्यानातून बाहेर पडत होतो. एकदा असाच एका पुस्तक मध्ये , त्यांनी पत्राविषयी लिहिलं होतं.
हल्ली ह्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात पत्र सहसा कुणी लिहत नाही .
त्यातच माझ्या मित्राने त्यानां पत्र लिहिलं.  त्याच उत्तर हि पंधरा एक दिवसातच  त्यांच्या पत्रातून त्याला मिळालं .
ते पाहून वाचून त्याचा बोलण्यातून व्यक्त झालेला,  त्याचा तो 'ओसंडता आनंद' मी  हि उपभोगत होतो .
तेंव्हा मी हि मनाशी ठरवलं . आपणही पत्र लिहायचं .
मी  सुरवात केली .पेन हाती घेतला . अन भरभर मनातलं उतरून काढलं .
अन ते पोस्टाने न टाकता. थेट त्यांच्या घरीच जावून दिलं.
त्यावेळेस ते मात्र घरी न्हवते .
त्यानंतर पंधरा एक दिवस ओलांडून गेले . त्याचं उत्तर काही आले नाही.
तेंव्हा मन थोडसं  काळवंडल. तरीही अशा सुटली नाही.
येईल उत्तर एक ना एक दिवस ह्यातच गढून राहिलो. .
आणि खरच ..एका महिन्या नंतर त्याचं सुवाच्च हस्ताक्षरात लिहिलेलं पत्र हाती आलं.
दिलगिरी व्यक्त करत...थोड उशिराने ऊतर देतोय म्हणून ...
तेंव्हाचा आनंद काही औरच होता. इवढ्या मोठ्या लेखकाने माझ्या पत्राला उत्तर दिलं . ह्यातच किती ते सुख होतं . मी ते पत्र सर्वांना दाखवत सुटलो . आनंद कसा गगनी मावेनासा झाला होता.
त्यानंतर वपुंच एक पुस्तक हाती आलं . आणि त्यांच्या लेखणीने मी अक्षरशा झपाटून गेलो.
अधाशासारखी एक एक पुस्तकं त्यांची वाचून काढली.
आपण सारे अर्जुन ,
इन्टिमेट , का रे भुललासी ,
गुलमोहर ,
गोष्ट हातातली होती,
घर हलवलेली माणसे ,
चिअर्स ,
तू भ्रमत आहासी वाया ,
दुनिया तुला विसरेल ,
दोस्त, पाणपोई , पार्टनर ,
प्लेझर बाँक्स,
फॅन्टसी - एक प्रेयसी ,
भुलभुलैय्या, महोत्सव , माझं माझ्यापाशी
मी माणूस शोधतोय , मोडेन पण वाकणार नाही
ही वाट एकटीची ..अशी एक एक पुस्तकांनी माझ्या मनावर छाप उमटवली .
त्याचा मनावर परिणाम झाला. .. माणसं निरखता येऊ लागली.
वपुंची वाक्य अन वाक्य मनावर कोरली गेली.
समाजात विशिष्ट उंची गाठे पर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते.
जबाबदारी...
?जबाबदारी आणि ओझं, ह्यातला नेमका फरक सांगाल??
"ओझं म्हणजे खांद्यावर दिलेला बोजा. पण कधीकधी दहा-बारा हजारांचा एखादा
दागिना सांभाळायचा असतॊ. ते इतरांनाही माहित नसतं. त्याला जबाबदारी म्हणतात. आयुष्यापासून मघाशी मी सांगितलेली यादी.."
"प्रेम, मैत्री, संगोपण, शुश्रूषा ह्या सगळ्या जबाबदारया.
त्यांचं ओझं वाटलं की सहजता गेली."
"ओझं हीदेखील जबाबदारी नसते का?"
"ओझं दिसतं कारण ते लादलेलं असतं. जबाबदारी स्वीकारलेली असते.
ओझं बाळगणारयाला कदाचित मदतीचा हात मिळतो. तसं जबाबदारीचं नसतं."
“एकाकीपण वेगळं , एकांत वेगळा . परीसराचं मौन म्हणजे एकांत .आणि परिवारात असतानाही पोरकं वाटण हे एकाकीपण .एकाकी वाटलं तर मनसोक्त रडावं. अश्रु म्हणजे दुबळेपणा नाही. पावसाळी ढग जसे बरसल्यावर हलके होतात. आणि दिसेनासे होतात, तसा माणुसही हलका होतो. आकाशाजवळ पोहोचतो. असंच कोणतं तरी दुःख पार केल्यावर तुकाराम " तुका आकाशायेवढा " असं लिहुन गेला असेल.”
अशी कितीतरी वाक्य आहेत . ..सांगायला गेलं तर हे पान हि  अपूरं पडेल. त्यापेक्षा तुम्ही वाचाच ...हाती पुस्तक घेऊन smile emoticon
माझे सर्वात आवडते लेखक ..वपु ..
- संकेत पाटेकर


बुधवार, १ एप्रिल, २०१५

असंच लिहिता लिहिता ...

वाऱ्याची एखादी हळुवार झुळूक क्षणभर सुखद गारवा देऊन जाते ना , तसेच काहीसे हे 'क्षण' असतात 
आपल्या आयुष्यातले...
हळुवार  कधी  कुठून,  गुपचूप  संधी साधून येतात अन तना  मनात रोमांच फुलवून जातात . 

मनी आसुसलेल्या  अपेक्षांची हि   पूर्तता  होवूनी जाते मग , सुखावून जातो अगदी त्या क्षणात आपण.

सुखाची एक व्याख्या तयार होते हळूहळू .. .
आनंदाच्या  परमोच्च शिखरावर ताठ मानेने , अभिमामाने आपण विराजमान होतो.
बेन्धुंद होतो बेभान होतो अगदी...

पण हे सगळ क्षणभर  ..क्षणभरच  सगळ...
वाऱ्याची झुळूक तेवढ्यापुरतीच  असते नाही का ? 
पुन्हा ती , कधी कुठून , कशी येईल त्याचा  नेम नाही ...पण तोर्पयंत असंच, असंच  चालत राहायचं .
असंच  चालत राहायचं ...

पण आपलं हे   मनं   ऐकेल  तेंव्हा.. .
ते एकच हेका घेऊन बसत .
जे हवं आहे ते कायम स्वरूपी ...क्षणभरासाठी नको..

इथूनच  मग सुरु होते ..   मनाच्या वेदनेची कथा ...

असंच लिहिता लिहिता ...
आपलाच ,
संकेत पाटेकर
०१.०४.२०१५
_______________________________________________________________________
_______________________________________________________________________

काही जखमा ह्या वेदना विरहित असतात . त्या कधी आपलं व्रण सोडून देतात ते कळून येत नाही
रक्त ओघळलं  तरी त्याची जाणं होत नाही. पण जेंव्हा ते नजरेआड येतं  ,
तेंव्हा कपाळी प्रश्नार्थी आठ्या पडतात ? हे कधी झालं ? कस झालं ?कुठे झालं ?
शोधार्ती मनं मागोवा घेत राहतं.  पुन्हा ते   थांबतं.  
किंचितसं कळवळतं  . पुन्हा हसतं,  पुन्हा भरारी घेतं.

आयुष्यं  अश्याच जखमांच  एक गोफ आहे. काही जखमा अश्याच कळून न येणाऱ्या असतात .
त्याच काही वाटत नाही.  पण  काही  भरून न येणाऱ्या असतात ...
पण प्रत्येकवेळी मनाला  भरारी घ्यावीच लागते .
रहदारीच्या ऐन रस्त्यावर माणसाच्या गर्दीत   कितीसा वेळ काढतो आपण , त्यातून मोकळी वाट काढावीच  लागते तेंव्हा कुठे मोकळा श्वास घेता  येतो . तसंच काहीसं  ....ह्या आयुष्याचं...

असंच काहीसं लिहिता लिहिता...
संकेत  पाटेकर
०३.०४.२०१५









शनिवार, १४ मार्च, २०१५

'' अरे, ऐकतोस ना रे...''

'' अरे, ऐकतोस ना रे...''

एखाद्या स्वप्नवतं  दुनयेत गाढ असता  अचानकपणे जाग यावी अन ते स्वप्नचं कोलमडून जावे  तसंच  काहीसं आयुष्यात कधी  घडतं  .
आयुष्यातले ' रंग ' एकाकी  बदलतात..  अन होत्याच न्हवतं  होवून जातं. 
'क्षणा' चा  हि  विलंब न लागता...
अशीच एक रविवारची रात्र ,हास्य आनंदा कडून वेद्नेकडे झुकलेली ...

रात्रीचे साधारण सव्वा आठ  होत आले होते ..
पनवेल स्थानकाहून ठाण्यासाठी आम्ही  लोकल पकडली अन सीट वर  निवांत बसते झालो. .
रेल्वे रुळावरून लोकलं अगदी धीम्या गतीनं  पुढे सरत होती.
डब्यात कमी अधिक रेलचेल  होती.
हळू आवजात  कुणा एकेकाची,  आप आपसात   कुजबुज चाललेली .
कुणी मोबाईल मध्ये डोकावलं  होतं. कुणी एकांतात हरवलं होतं.

आम्ही हि  आजच्या दिवसभरातल्या गोडव्यात अगदी मंत्रमुग्ध  झालो होतो.
निसर्गाने देऊ केलेला  आनंदाचा रसाळ  प्याला नुकताच प्राशन करून मनं  तृप्त झालं होतं.  
त्यामुळे तना- मनात  आनंदाचे  लहरी वारे अगदी सुसाट वेगाने वाहू लागले होते.

म्हणावं   तर आजचा ट्रेक अगदी  प्रसन्नतेच्या वावटळात फिरक्या घेत पूर्ण झाला होता .
निसर्गाने आज असे काही रंग उधलेले होते  कि काय बोलावं  अन काय नाही, अशी ह्या मनाची स्थिती झाली होती.
किती सुंदर वातावरण होतं ते  ..!

न बोलविता  हि , ‘ कधीही , अवेळी दाखल होणाऱ्या  पाहुण्या मंडळीसारखा  हा वेडापाऊस...
कधी रिमझिम कधी धो धो बरसत  लोकांच्या  सहनशीलतेचा अंत पाहतो .  
तर  दुसरीकडे  जीव सृष्टीला  ना ना विविध अलंकार परिधान करत  लोकांकडूनच  अमाप  सौंदर्याची वाहः वाहः अन  कौतुकाची वारेमाप थाप मिळवत राहतो.

आजचा आमचा दिवस  अश्याच अलंकार चढवलेल्या लावण्यावती प्रमाणे नटाटला होता.
त्याने सगळेच मोहित झालो होतो. सृष्टी सौंदर्याचे अमाप सुख मनी ढवळत  होतो.
त्यातच  रममान होतो ...

तोच एकाकी ..हृदय पिळावनारं   वाक्य कानी पडलं.

'अरे,  ऐकतोस ना रे '
क्षणात ह्या वाक्यांनी हृदयावर एक घाव घातला  अन वेदनेची ठिकरी उडाली..
नजर त्या आकृतीकडे स्थिरावली.

एखाद्या  फळा फुलांनी बहरलेल्या,  अन गर्द छायेंनी नेहमीच
आपलसं  करणाऱ्या, ' वृक्षावर 'आपल्या नजरेदेखत कुर्हाडीचा कत्तली  घाव   पडावा अन काळजात कळीची चर्र  उठावी  तशी काहीशी स्थिती  झाली होती. काळजाला एक एक शब्द ते भिडले होते.  

'अरे,  ऐकतोस ना रे...  , ऐक ना , थांब ना ..'

ती माउली कळकळीने  हाक देत होती.  आपल्या पाठमोऱ्या मुलाकडे पाहत.
पण तो तसाच चालत सुटला , आईचे ते  बोल ऐकूनही न ऐकल्यासारखं  करत,   मागे जराही वळून न बघता ..
तेंव्हा मनात विचारांची गस्त सुरु झाली.

कशी हि  माणसं असतात, काळीज  नावाचं  प्रकार असत कि नाही त्यांच्याजवळ , काही कळत नाही  .. तो एक प्रश्न चिन्हच  ?
जिथे काळीज नावच मनचं नाही तिथे ती आर्त हाक तरी कशी पोहोचणार, कशी भिडणार ?

काळजाची आर्त हाक कळायला आधी 'काळीज'   असावं  लागत तेंव्हा ती  हाक  काळजाला जावून भिडते.
पण कुणास ठाऊक त्या तरण्या मुलाकडे ते नसावं  ?
अन्यथा तो असा चालत सुटला नसता . ..मागे न वळता  ..त्या माउलीच्या डोळ्यात आसवे निर्माण करून ...

ती माउली मात्र तिच्या वेगानं धापा टाकत त्या पाठोपाठ लोकल मधून उतरती झाली .
'अरे थांब ना ' ऐक ना रे ... अशी आर्त हाक मारत,  हृदय पिटाळत...त्या  पाठोपाठ...

क्षणभर नजर   तिथेच  खिळून राहिली. ..त्या पाठमोऱ्या आकृतीकडे ..त्या माउलीकडे.. त्या क्षणाभोवती रेंगाळत ..
विचारांचं  काहूर  माजलं मनात  ...
अवघा क्षणाचा तो प्रसंग ...मनावर घाव करून भळभळती जखम देऊन गेला.

हे काळीज...खरच फार हळवं असत ..फारच  हळवं...

भावनेनं  उतू गेलेलं,  प्रेमानं ओथंबून वाहिलेलं
कुणा ना कधी कळलेलं , एकांतात कायम गढलेलं

शब्दांशी मिसळलेलं , काळजाशीच  नडलेलं
आक्रोशांनी  रडावंलेलं  , स्वतः वरच  हास्यांलेलं 

बंध  नात्याशी जुळलेलं , कधी कुठे भांडलेल
क्षणात तुटलेलं..अन दुभंगून उरलेलं, दुरावलेल .

हे काळीज...खरच फार हळवं असत ..

संपल ते सगळ नाट्य , संपल सगळ  .... डोळ्यात देखेतं...घडलेलं.. क्षणापूर्तीच..   .

गाडीने हळूच वेग घेतला  अन ती पुन्हा धावू लागली.
काही क्षणाआधी ,नजर भेट झालेली ती मंडळी...
ती माउली ,  तिचा  तो  मुलगा ..अन ते वाक्य , तो सारा प्रसंग मनात  तसच तरलत राहिला.

काय घडलं असेल त्या  बंध त्या नात्यात....ते माहित नाही .
पण त्या  माउलीच्या काळजाची ती आरोळी  मात्र मनास अजूनही खूप यातना देते....कळवळत मनं त्यानं..
 
आई वडील , जन्मदाते आपले , अनेक स्वप्नं बघून , सुखाचा त्याग करून , काबाड कष्ट करून  लहानाचं  मोठ  करून वाढविलेलं.
त्या माउलीच्या मनाची साधी हाक, ती कळकळ   आपण ऐकू नये ...  त्यास प्रतिसाद देऊ नये .तिला तसच एकट सोडूनी निघून जावे  ..
काय  बोलावं  ह्या उपरी ..शब्द नाहीत ....

आपलीच माणसं  जेंव्हा आपल्याशी अशी तर्हेवाईकपणे वागतात..
तेंव्हा खरंच गुदमरत मनं ..

संकेत य. पाटेकर

१५.०४.२०१५