सोमवार, २० फेब्रुवारी, २०१७

प्रार्थना शब्दांसाठी..

प्रार्थना ।। 
शब्दांसाठी। ।।

हे भगवंता ! 
मनातून उमळणाऱ्या ह्या शब्दांना इतकी माया, प्रेम दे, कि त्याने कधी कुणाचं मन दुखावलं जाऊ नये. 

आपलेपणाचा त्यांस इतका सुंगंधित सुवास दे, कि त्याने दुरावलेली नाती गॊती पुन्हा एकत्रित जुळू देतं.

शौर्याइतकचं प्रेरणादायी आग हि त्यात तळपू देत. जेणेकरून, ढासळलेल्या बुरज मनाला पुन्हा आभाळाकडं निर्भीड पण पाहता येईल.
आयुष्याची लढाई सहज अशी जिंकता येईल.

सौन्दर्याची हि इतकी अमाप रूपरेखाटनं जोडून दे, कि कोमजलेल्या कुठल्याही मनाला त्या शब्दसौन्दर्याची भुरळ पडून , तो आनंदाने दौडू लागेल.
नवं चैतन्याची अतरंगी शाल लपेटत.

वज्रासारखी प्रचंड अशी ताकद हि दे, जेणेकरून सर्व वाईट प्रवृत्तीच्या, हृदयी पाषाणा लाही , 
शब्दसख्यांचे, वज्रघाव बसून त्यातून मानवी
प्रेमाचा उमाळा ओघळू लागेल. 

आणि 
हे भगवंता !! 
सर्वात महत्वाचं, ह्या माझ्या मनाला हि अहंकारी परिघापासून, वलयापासून दूर ठेव.
इतकंच...
 
संकेत य पाटेकर
२१.०१.२०१७

मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०१७

हल्ली ती फार जवळ असते माझ्या …

हल्ली ती फार जवळ असते माझ्या …
विना काही संवाद , मुकेपणाने , हळुवार दौडत , चाहूल हि न कळू देता ,नजरेच्या कड्याशी, धुंद बेहोषीने , हळूच झेपावते ती अन बिलगते मला... सर्वांग बहाल करत , मी हि तिला मिठीत अलगद सामावून घेतो. श्वासाच्या परिघात , कितीतरी वेळ , कितीतरी स्वप्नांच्या आखीव रूपरेखा उठावपणे मांडत. दाखवत अन मिरवत.
तसा इतका लाडीगोडीपणा हि बरा नाही. म्हणून मी हि मुद्दाम तिला कधी कधी , जवळ येऊच देत नाही. दटावतो . थांब म्हणतो , अजून थोडा वेळ , बस्स थोडा वेळ..
ती बिचारी कंटाळत , नाकी रुसवा फुगवत , हुंदके देत , ताडताड निघून जाते.
मी तितकं लक्ष देत नाही. 
कारण माहिती असतं ती स्वतःहून पुन्हा माघारी येणारं, अन ती त्याप्रमाणे येतेच. तिला हि काळजी असतेच ना हो, अन असायलाच हवी. 
 कारण तिचं माझ्याशिवाय अन माझं तिच्याशिवाय , आम्हा एकमेकांचं एकमेकांशिवाय , असं अस्तित्वच नाही. म्हणून ती तत्पर असते. 
सदैव , सदैव सादेला प्रतिसाद द्याला . स्वतःहून , न काही सांगता , बोलविता, मुकेपणाने , हळुवार दौडत ...
पण हल्ली ती जरा जास्तच जवळ येऊ लागलेयं. उतावीळ झालेयं , नको त्या वेळेत , नको तेंव्हा , उठसूट कधीही येते. कधी हि बिलगते. 
मलाच संकोचल्यासारखं होतं , लोक काय म्हणतील ? घरी एक वेळ ठीक आहे. पण बाहेर, इतर ठिकाणी ? छे ..
तिला ह्या सर्वाची काही पर्वा नाही . पण मला हे पटत नाही. 
मी सावरतो स्वतःला, कसाबसा , नाहीतर एक एक कट कारस्थान तरी रचतो. 
ती माझ्यापासून दूर होण्यासाठी.
मग कधी, चहाचा गरम घोट मुखी घेत तर कधी चेहऱयावर थंडगार पाण्याचा शिडकावा करत मी तिला मुद्दाम छेडतो. तिला ते रुचत नाही .
ती नाक मुरडत पुन्हा ताडताड निघून जाते. 
ती म्हणजे ‘झोप’. 
- संकेत
Valentine's day Special ..


शनिवार, ४ फेब्रुवारी, २०१७

क्षण क्षण वेचूनि जगलो मी ...

घाव कुठूनही कसाही पडला तरी  तो अलगद झेलायचा  अन हळूच थोपवायचा , हे  कसब आपल्यात असलं ना  कि  नात्याला हि कसा गोडवा प्राप्त होतो....

‘हा माझा बेस्ट फ्रेंड संकेत ..’
नुकतेच लग्नाच्या  बेडीत  विराजमान झालेल्या आपल्या नवऱ्याशी तिने माझी ओळख करून दिली.
एकमेकांचा तसा वरवरचा  आमचा  परिचय झाला.  वरवर  का , कारण  इतक्या घोळक्यात , माणसांच्या  त्या राशींमध्ये , तिच्याकडचे अन त्याच्याकडचे आप्तमंडळी , कधी न भेटलेले , ना पाहिलेले , ना  कधी कुठे बोललेले,  पहिल्यांदा  भेटतात  तेंव्हा असंच काहीस होतं असावं नाही  का ? इतका वेळ असतोस कुठे म्हणा तेंव्हा ,
त्याच हि तेच  झालं. त्याने  हळूच माझ्याकडे पाहिलं. 'अच्छा' असं काहीस म्हणत  हलकंसं स्मित केलं .
तुम्हा दोघांनाही लग्नाच्या भरभरून शुभेच्छा असं म्हणत , मी हि पुढे होऊ  लागलो.
तोच वधूच्या बोहल्यात नटलेल्या माझ्या मैत्रणीने अडवलं.
थांब ना , फोटो...
तिने माझ्याकडे एकवार पाहत नवऱ्याकडे कटाक्ष टाकला.
तिच्या मनातील फोटोसाठीची तळमळ चेहऱयावर स्पष्टपणे दिसू लागली .
तसं लग्नाला तिच्याशिवाय मला कुणी परिचयाचंच  न्हवतं.  आलो सुद्धा एकटाच होतो . कारण दोघात घट्ट मैत्रीचे संबंध, येणे अगतिकाचे होतेच.  त्याकरीताच आज रजा घेतली होती .
दादरच्या , छबिलदास शाळे जवळील, एका लग्न सभामंडपात ,  विवाह सोहळा यथोच्छित पार पडत होता
मी आपला आलो, बसलो , जेवलो अन  आणि निमूटपणे  प्रेजेंट देण्याकरिता वाट पाहत बसून होतो .

प्रशस्त असा तो एसी हॉल, अलवार ताल देत  सुरु असलेले श्रवणीय Instrumental Song ,  नाकी गंधळत असलेला अत्तराचा सुगंधी शिडकावा , शुभेच्छांचा मोकळ्या वर्षावा  करिता, नटून थटून आलेल्या सगे सोयरे , त्यांची  उडालेली धांदल , लगभग.....नजर एकटक टेहाळत होती.
घोळक्या घोळक्याने , कुटुंब  कबिलासह  वधू वरांच्या   भेटीकरिता , सगळ्यांचीच  घाई गर्दी  उसळली  होती. रांगेत हळूहळू  जो तो पुढे सरत होता . नव्या जोडप्याला भेटून , ग्रुप  ग्रुपने  फोटो काढणाऱ्यांचीतर  संख्याच  जास्त दिसून येत  होती. अपवाद काय तो माझ्या एकट्याचा असावा बहुदा ,  कारण मी एकटाच असा  होतो .
एकटाच असल्यामुळे , आपण कधी पुढे व्हावं  ?  हा प्रश्न मनाशी उभा ठाकलेला . त्यात  शिवाजी पार्क ची ओढ खुणावू लागलेली . पुढे फावला वेळ होताच. अन  दुपारचे दोनच वाजले होते.  
अधिक वेळ खर्च न करता आपल्याला आता निघायला हवं,  ह्या उद्देशाने मी शेवटी जागेवरून उठलो अन  त्या घोळक्यात मिसळून गेलो . अर्थात  रांगेत उभं राहूनचं ,  त्या दोघांचीही भेट घेतली. शुभेच्छा दिल्या, थोडं बोलणं झालं  आणि निघण्याच्या तयारीत असता...
मैत्रणीचे बोल उमटले ‘थांब ना..फोटो ...
नाही नाही म्हटलं तरी मैत्रिणीच्या आग्रहातर थांबणं होतंच...
पण तोपर्यंत घोळक्या घोळक्याने  इतर  ग्रुप हि आमच्यात  समाविष्ट  झाला.
बोलण्याबोलण्यामध्ये हास्याचे मनोरे चेहऱयावर उमटवत   सगळे फ़ोटोकरीता रांगेत उभे राहिले. त्यात मी हि होतो  , मैत्रिणीच्या बाजूलाच , दोघांच्या डावीकडे ..कॅमेराशी पाहत ...उभा,
फोटोग्राफर तयार होताच ...फक्त क्लीक  करायचा अवधी होता.
तितक्यात  कुठूनसा हलकासा स्वर कानी आला..अर्थात तिच्या नवऱ्याने तिला उद्देशून म्हटलेले ते बोल,
एकत्रित फोटो काढला तर चालेल ना ?
ते बोल ऐकून मी हसलो स्वतःशीच , विचाराचं पर्व एकाकी सुरु झालं  माझ्या  मनाशी ...
वाईट वाटण्यासारखं असं काही नव्हतं.  पण तिला दोघासमवेत , म्हणजे नवरा बायको अन मी असा , एक त्रिकोणी फोटो घ्यायचा होता.  पण इतर मंडळी त्यात मिसळल्याने  तो बेत तिथेच कोलमडून पडला.अन ती कोमजल्या फुलासारखी क्षणात हिरमसून गेली.
चेहऱ्याशी हास्यतुरा उजळवत  ..., पुन्हा इतरांशी ओळख पाळख करून घेण्यात,  शुभेच्छा वर्षाव स्वीकरण्यास ...
मी मात्र निरोप घेत तिथून निघालो.
रस्त्याशी चालत चालत ..विचारांच्या गतीने ,  स्वतःशी हसत...स्वतःशीच बोलत...
चला, म्हणजे तडजोडीची सुरुवात हिच्यापासून झाली तर .....आणि ती हि ह्या क्षणापासून ....
आयुष्याचा नवा अध्याय सुरु म्हणजे.....
मी स्वतःशीच बोलत सुटलो .
लग्नाच्या काही दिवस आधीच आम्ही भेटून ह्याच  विषयवार बोलणं केलं  होतं. लग्नाची पत्रिका घेऊन ती भेटायला आली होती.
संकेत आज सरप्राईझ द्यायचं आहे . काय सांग ? तिने उत्साहित म्हटलं .
मी लगेच तारलं. लग्न ठरलं ? हो रे , तुला कसं कळलं.? 
त्यात कळायचं काय , साधं सोपं गणित आहे . व्यक्ती ओळखून असल्यास अन नेहमीच संर्पकात असल्यास , गोष्टी मनातूनही कळतात रे, 
बराच वेळ आम्ही बोलत होतो ...आयुष्य अन लग्न ह्या विषयवार .. 
तू नाही तर त्याने , दोघांनाही एकमेकांना सांभाळा , आपला अहंकारी ठेवा बाजूला ठेवून ... 
लग्न लग्न आणि लग्न म्हणजे तरी काय ना , एकमेकांना सावरणं , सांभाळून घेणं ...आयुष्याचा तुझ्या माझ्या प्रवास वाटेपर्यंत , मनमोळी ताल सुरांची लयबद्ध सुरावट ऐकत ऐकत...धुंद होत ...है ना ?
आयुष्याच्या  ह्याच  प्रवासात , 
घाव कुठूनही कसाही पडला तरी  तो अलगद झेलायचा  अन हळूच थोपवायचा , हे  कसब आपल्यात अंगी पाहिजे बस्स,  ते असलं म्हणजे ना , नात्यात गोडवा येऊ लागतो. तो गोडवा 
आपण टिकवायचा..आयुष्यभर ..

मी पटपट पाय  उचलत आयडियल बुक डेपो च्या येथून उजवीकडे  कडे वळसा घेतला. 
दादरच्या शिवाजी पार्क कडे पाउलं झपझप पडू लागली. तसं तशी विचारांनी हि दिशा बदलली .
लग्नाच्या गोष्टींचा विसर पडला अन गत आठवणीच्या प्रेम झुल्यावर बागडत ....मन , रम्य खेळात गाऊ लागलं...

आलो आलो बघ सखे त्याच पुन्हा वाटेवरी
तुझ्या माझ्या नात्याची हिच ना , पहिली भेट खरी ...

क्रमश : -
संकेत पाटेकर

०४.०२.२०१७

बुधवार, २५ जानेवारी, २०१७

‘तो आणि ती ...’


काय अशी पाहतेस ? एकटक अश्या नजरेनी ..
त्याने हळुवार सवाल केला .
'प्रेम'  तिने लगभगिने उत्तर दिलं.
प्रेम ?
हो ...
अच्छा , मग सांग बरं ….
किती प्रेम दिसलं तुला,   माझ्या डोळ्याआड  साठलेलं ? त्याने पुन्हा तिला प्रश्नांनी छेडलं .
तेच तर पहातेयं   ना ..
म्हणजे अजून तुला  कळलं  नाहीतर ? 
तसं नाही रे..
मग कसं?
तुझ्या डोळ्यातील जादू निरखतेय  , फार बोलके आहेत ते ,  जसं तुझं हे मन...  
अच्छा ..( भुवया उंचावून ..)
हं ,
तुझं  प्रेम आहे.  ते निशंक आहेच.
पण तूच म्हणतोस ना , कि प्रेमाला मापता तोलता येत नाही  ? मग,  मी तरी का  सांगू,  हा ?
त्याच्याच विचारांचं संदर्भ  देत , तिने त्याच्याच प्रश्नावर उत्तरीय झेप घेतली .
शोभतेस  हा तू  , माझी बायको म्हणून ...
हो का ? तिने नकट्या लाडीनं ,  त्यास चिमटा घेतला .
अजून आपलं लग्न तरी कुठे झालं आहे ? इतक्यात बायकोचा शेरा देत आहेस ते  ?
म्हणून काय झालं ,  लग्न नाही , तरी एक पत्नी म्हणून,  मी तुला केंव्हाच स्वीकारलं आहे .
हो,  हो,..माहित आहे मला... , ‘ तिने हलकं स्मित हास्य करत म्हटलं.’
पण समज , मी तुझ्याशी लग्नच केलं नाही तर ,   एक दीर्घ  श्वास घेतं... तिने उसासा टाकला . आपलं मन मोकळं केलं .
तिच्या ह्या आकस्मिक प्रश्नाने मात्र , त्याची हसरी मुद्रा क्षणात प्रश्नांकित झाली . 

लाटेवरती लाट कोसळत जावी तशी विचारांची धडकी मनात  घेर करू लागली. 
सैरभैर वादळासारखी अवस्थेने,  उचल खाल्लीच  होती . पण तोच ,
मावळत्या क्षितिजाशी , उमटलेल्या असंख्य भावपूर्ण रंगछटाईंनी त्याची नजर व्यापली गेली.   अन काहीसा धीरगंभीर अवस्थेतून शांत प्रवाहासारखा तो  एकांतात  गढून गेला.  


काय रे , इतका शांत  ? 
निवांत पहुडलेल्या एखाद्या डोहाशी , फिरकी वाऱ्यानं अलगद  झेप घ्यावी अन  नवं तरंग उमटावेत,  तसा तो तिच्या आवाजानं, पुन्हा त्याच विषयाशी प्रवाहित झाला .
काही नाही....
म असा प्रश्न विचारल्यावर , एकाकी  हरवलास तो ? ती चेहऱ्यावरचा भाव निरखत म्हणाली.
प्रश्न होताच तसा तुझा, अपेक्षेपलीकडचा...., विचारांच्या प्रवाहात  त्याने उत्तर दिल .
आयुष्यात बऱ्याच गोष्टी , ज्या घडतात त्या अनपेक्षितच असतात रे, अपेक्षा ठेवून सगळंच मिळत असं कुठे आहे ?
मान्य आहे. (थोडं थांबून...) .पण प्रयत्न अन सातत्य राखून , आपण  बदल हि घडवून आणू शकतो ना ?
त्याला दैवी जोड हवी रे . नुसते प्रयत्न हि निष्फळ . तिने एक सुस्कारा सोडला.
तू अशी झुकत्या विचारांकडे का वळतेस नेहमी...
जे शक्य नाही . तिथे असेच विचार येणार...
आपल्या लग्नाचं मला वाटत नाही . ते होईल म्हणून ....

क्रमश :-
क्रमश  :- 
संकेत पाटेकर 


शुक्रवार, २० जानेवारी, २०१७

'आनंद' साजरा करायला वयाची अट नसते.

'बंगले के पीछे तेरी बेरी के नीचे हाय रे पिया आहा रे आहा रे आहा रे पिया
काँटा लगा....''

क्षणभर ह्या गाण्याने विशेषतः त्या आवाजने माझं लक्ष वेधलं गेलं. 
ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक चार वर घाईघाईतच पोहचलो होतो. सकाळी ८ वाजून २४ मिनिटाची ठाण्याहून सीएसटी कडे धावणारी लोकल आज फलाट क्रमांक १ वरून न जाता ४ वर येणार, असं ऐकताच दौडत दौडतच फलाट क्रमांक ४ गाठलं. तेंव्हा ह्या गाण्याचे बोल कुठूनसे कानी घूमघुमले. तेंव्हा सहजच अवती भोवती नजर हेरावली अन लक्ष त्या दोन मावशींकडे गेलं. ( वृद्धत्वाकडे हळूहळू झुकत चाललेलं . )
एका ठिकाणी निवांत बसून , त्या दोघी हि , ईअर फोन लावून मस्त गाणं म्हणत होत्या . सूर ताल लय आदी छेडत, अवतीभोवतीचं सारं धांवत वलय , त्याचं भान विसरत ....
''बंगले के पीछे तेरी बेरी के नीचे हाय रे पिया आहा रे आहा रे आहा रे पिया
काँटा लगा....''
मी क्षणभर पाहत राहिलो. न्याहाळत राहिलो. त्यांचं वय अन ते गाणं ...
मनाशीच म्हटलं, बघ संकेत , 'क्षणांना असेच कवेत घेऊन जगता आले पाहिजे.' 
'आनंद' साजरा करायला वयाची अट नसते. ते 'क्षण' तेवढे पकडायचे असतात. आणि त्यात आपणहून मिसळायचं असतं. 
असंच लिहता लिहता... 
- संकेत पाटेकर 
२०.०१.२०१६

गुरुवार, १२ जानेवारी, २०१७

'प्रतिबिंब'..


ऐक ना, त्या नदीच्या प्रवाहाकडे बघ  ? किती संथपणे अलगद वाहत आहे ती,  वळणा -वळणाचा एक एक घाट अगदी सहजतेने ओलांडत ?  बघतो आहेस ?  
हो  ? 
असं वाटतंय,  मी जगावेगळ्या  स्वप्नं नगरीतच वावरतेयं  रे, किती  भन्नाट जग आहे हे  , 
मी असं कधी अनुभवलं  नाही ह्यापूर्वी........
हि अशी ध्यानस्त मनाला गुंगवणारी रात्र , हा  नदीचा संथ नितळ प्रवाह ..तो चंद्रमा , त्याची शुभ्र हळवी  शीतलता , झाड फांद्यांची हि स्थिरता- अस्थिरता,   तना मनाला भाव रंगात ढकलून  देणारा  हा मंद झुळकार वारा ...आणि   आपण दोघे, एकटे अन सोबत हि निःशब्दता ..., प्रेम रंगला अधिक गडद  करणारी .....

काय वाटतं  रे तुला ?
ह्या अश्या ऐकून वातारणाकडे पाहून ...
तुझ्या शब्दात वीण ना काही  ?
मला ऐकायचं आहे.........., तुझ्यातल्या लेखक अन कवी मनाकडून ...
इतका एकांत आजपूर्वी कधी मिळालाच न्हवता अन अन अशी नामी संधी  हि ...
सांग बरं आता  ?
चेहऱ्यावरती  मंद हास्य उजळून  त्याने हळूच तिच्याकडे पाहिलं . तिच्या चेहऱ्यावरची निरागसता अन कुतुहूल वाढीस लागलेलं. प्रेम रंगाच्या धुंदीत ते रसिक  सुवासिक  फुल हळुवार डवरलं जात होतं.    
त्याने अधिक वेळ न घेता शब्द मोहायला सुरवात केली . 

इतकं छान वर्णन केले आहेस तू   ? मी आणिक काय बरं  सांगणार ? 
तू जे पाहिलेस वा पाहते आहेस नं  , तेच मी हि पाहतो आहे . पण माझा रोख त्या नदीतल्या संथ प्रवाहाकडे आणि त्यात स्थिरावलेल्या त्या चंद्रमाकडे अधिक लागून  आहे. 
का बरं  ? 
हि संथ वळण घेत वाहणारी नदी आणि तो वर मैलो दूर असलेला चंद्र .....पाहतेस  ना ? 
हो , 
काय बरं नातं असावं  दोघात ? 
मैत्रीतलं  प्रेम कि प्रेमातली मैत्री  ? 
सूर्य  मावळतीला लागल्यावर , हि नदी हि कशी, बघ... संथ रूप धारण करते. दिवसभरातला तो खळखळाट , आलेला शिणवठा आदी , त्या निरव शांततेत ढवळून जातो . ती संथ होते. एकपात्री होते. 
स्वतःला मोकळं करुण घेत . 
तारुण्यसुलभ एखाद स्त्रीने आपला केशसंभार मोकळा करावं ना तसंच . ..ती हि मोकळी होते. 
आणि तेंव्हाच दिवसा लपंडाव  खेळणारा हा  'चंद्रमा'  तिच्या 'हृदयी 'मोकळा असा श्वास घेत स्वतःला हळूच सामावून घेतो. तिच्या गर्द मिठीत , तिला घट्ट बिलगून, श्वासाचं जाळं विस्तारत.    
ती प्रेमवेडी हि  ह्याच क्षणांची आतुरतेने  वाट पाहत असते . रोज.. अशी कित्येक रात्र.....

बापरे....इतका विचार , माझ्याकडनं हि झाला  नंसता रे  ?
कसं सुचत तुला ? 
त्याने तिच्याकडे सहज पाहिलं . 
तिच्या 'स्वरात' आपलेपणाचा गहिरा भाव  त्याला दिसून येत होता. 

सहज रे , दृष्टी अन सृष्टीचे हे खेळ आहेत. त्याला बस्स आपल्या मनातले भावरंग हळूच जोडायचे इतकंच...
अच्छा ...
हं ..
मग काय आहे त्या दोघांत ,  मैत्रीतलं  प्रेम कि प्रेमातली मैत्री  ? 
दोन्ही हि....... 
कसं ? 
मैत्री शिवाय प्रेम नाही. अन प्रेमाशिवाय हि  मैत्री . 
दोघांत हि बघ , मैलोच अंतर आहे .  पण तरीही ..ते दोघे एकमेकांशी हे प्रेमाचं नातं टिकून आहे .
आजही..  अद्यापही, शेकडो वर्ष ... 
मनातलं हे (एकमेकांचं ) 'प्रतिबिंब' जपता आलं पाहिजे रे ...आयुष्यभर . 

तिने त्याकडे एकवार पाहिलं. कुठल्याश्या गर्द विचारी प्रवाहात  तो हरवून गेला होता. 
तिने हि त्याच्या बाहुपाशात स्वःताला विसावून घेतलं होतं . 
- संकेत य पाटेकर 
१२.०१.२०१७ 
Email :- sanketpatekar2009@gmail.com




बुधवार, ४ जानेवारी, २०१७

Still i am waiting...


माझ्यामुळे तुझ्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम कश्याला , असा सारासार विचार धरून तू चाललेस हे ठाऊक आहे  गं मला , 
पण सखे असा विचार करून चालणे कितपत योग्य आहे.? कुठलीही वाट गवसण्यासाठी आधी एक पाऊल पुढे टाकण गरजेचं असत न्हाई ?  ते पाऊलंच भीतीने पुढे टाकलं नाही तर पुढचा मार्ग मिळेलच कसा ?
तू तो पाऊल तर उचल..

लाईफ मध्ये अगं एकमेकांना समजून घेणं हे जास्त महत्वाच असतं. आणि तितकंच गरजेचं हि  ,
एक कमी पडला कि दुसरा , दुसरा कमी पडला कि आपणहुन पुढे सरायचं , एकजुटीने प्रयत्न करायचं ह्यालाच तर संसार म्हणतात ना?संसाराची व्याख्या इतकी  साधी सोपी आहे.
पण अगं असा कुणी विचारच करत नाही. आपलाच अहंभाव आपल्या नात्याच्या आड येतो. अन तुटतात अन दुःखावली जातात मनं..त्यास कारणीभूत आपणच.. 

तुला एक सांगू , म्हणजे तुला माहित्ये  ?
अधिकाधिक संसार वा ह्या नाती गोती का उध्वस्त  होतात ते?
मनातलं सांगतच नाही कुणी,? दाबून ठेवतात सर्व , आतल्या आत...
आपल्याला काय हवं काय नाही, हे अगं बोलल्याशिवाय उघड कसं होणार ?

एक अंदाज बांधता येतो चला, मानलं ठिकायं, पण सगळ्याच गोष्टी,  ज्या खरंच गरजेच्या आहेत , त्या सांगितल्याशिवाय वा बोलल्याशिवाय,  नाही कळून येत रे, भावनेला हि कधी कधी संवादाचा हळुवार स्पर्श हवा असतो . तेंव्हा त्या मनमोकल्याने उमलून येतात . संवाद तेच काम करत . म्हणून तर तो हवा असतो.  जिथे संवाद नाही, जिथे समंजसपणा नाही, तिथे नातं तग धरून राहत  नाही.

माझं तुझ्यावर प्रेम आहे रे . . खरं तर हि शब्दात  सांगण्यासारखी  गोष्ट नाही. ती सहवासातून आपोआप उमलून येते.   कळते .   पण तरीही मला सांगावं लागतं.  कारण तू पळतेयस .  दुरं सारते आहेस मला , तुझ्यावाचून ..
आणि  हे तुला हि चांगलं ठाऊक आहे.
माझ्यामुळे तुझ्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम कश्याला, असा विचार तू मनात आणू नकोस.
अंग एकमेकांच्या साहाय्याशिवाय , समजुतीशिवाय आणि प्रेमाशिवाय कुठलंही नातं नाही. संसाराची व्याख्या म्हणून तर मी दिलेय .
दोष उणिवा प्रत्येकात असतात . आणि तसे गुणही असतात . आपण गुणांच्या बाजूने पाहावं .
पाहशील ना ? हो म्हणतंय बघ, मन माझं ...,

तुझ्यावाचून खरं  तर  दुसऱ्या कुणाचाही विचार माझ्या मनात नाही . दर्पणा प्रमाणे प्रतिबिंबित होऊन तू नजरेशी खेळत असतेस सदा…. हृदयात प्रेम संगीताचं वलय निर्माण करत ........
बघ विचार कर  ..

Still i am waiting….…….. तुझी वाट पाहतोय .
तुझाच…
Xxxxxxx

हृदया - एक स्वप्न सखी
- संकेत पाटेकर
०४.०१.२०१७ 




शनिवार, २२ ऑक्टोबर, २०१६

‘ती‘ एक ग्रेट भेट

मला आयुष्यात फक्त भरभरूनं प्रेम हवं होतं, संकेत... तेच मिळालं नाही.
क्षणभर स्मित करून , कुठल्याश्या भावगर्दीत ती पुन्हा गढून गेली.  मी मात्र एकटक तिच्याकडे पाहत राहिलो. मनातील दबलेल्या त्या भावना उघड करताना  तिच्या डोळ्यातून आसवं तरळून येत होती.
गोठलेल्या त्या जुन्या जखमां, आज पुन्हा नव्याने पाझरू लागल्या होत्या. त्याचा दाह , त्या मनास  सलत  होता.  त्यास  कारण अन निमित्त मात्र आज मी ठरलो होतो.

एक मित्र म्हणून, मैत्रीतला विश्वास म्हणून , तिचं अनुभव विश्व ,जीवनपट  माझ्यासमोर उलगडलं   जात होतं . ती बोलत होती, नजरेच्या आसवांतून ,  काळजाच्या  दुखिव वेदनेतून अन मी ते सर्व कानी घेत होतो. हळुवार ..

संकेत , हसावं लागतं बघ, जीवनासोबत ह्या  चालायचं झाल्यास..
अगदी म्हणायचं तर लहानपणापासूनच संघर्ष सुरु आहे माझा ह्या  जीवनाशी...
आधी स्वतःच्या शिक्षणासाठी  संघर्ष ,  मग घरातील व्यक्तींच्या आनंदासाठी आणि मग प्रेम .....
ते हि आलं खरं जीवनात , पण सुखानं  नांदलं नाही.

ज्याच्या सोबतीनं  मी आयुष्याची विविध रंगीन स्वप्नं  पहिली. एकत्रित सहवासाने स्वप्नं रंगिवली .
त्यानेच  ऐनवेळी सांगता , विविहबद्ध होतं , माझ्या स्वप्नांची आशाच मावळून दिली.
मला एकाकी करून सोडलं.  खूप रडले होते रे मी तेंव्हा ,  अस्वस्थ,  छिन्न - विच्छिन्न झाले होते.
वेदनांच्या अक्षरशः  ज्वाला फुलल्या होत्या .
त्यात काही वर्ष निघून गेली.

घरच्यांनी  एक स्थळ आणून ,  लग्न लावून दिलं माझं ,   
पण ते हि अवघे दोनच महिने , दोन महिन्याचा काय तो संसार राहिला.  तिथे हि उध्वस्त झाले मी
काय चूक होती म्हणा माझी.  आहे ते सगळं क्लीअर केलं होत ना मी त्याच्याशी ,
पण स्वार्थ नजरेतून त्यानं  माझ्याशी लग्न केलं. अन माझं आयुष्यच उधळून लावलं .
आता  एकाकी मी जगतेयं. हसतेय .

सदा चेहऱयावर हास्य असणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात इतके दुखिव वेदनांचे धागेदोरे असतात . हे मी आज प्रत्यक्ष पाहत होतो. तिच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी आज नव्यानेच  कळत होत्या.
ती मोकळी होत होती, हळुवार मनाचा एक एक कोपरा उघड करत....

खूप वाटायचं रे  ‘संकेत , कुणी तरी असावं. ज्यांच्या खांदयावर डोकं ठेवून आपण  भरभरून बोलावं , रडावं , मोकळं होतं हलकं व्हावं. शांत एकाकी पडून राहावं. पण असं कुणी भेटलंच नाही रे... 
असो , हवं ते मिळायलाच हवं असा काही नियम नाही आहे ना? जे आहे त्यातच  आनंद
तसही हसणं शिकलेय मी ,   अन त्याबरोबर  जगणं हि ………..

मी पाहत राहिलो तिच्याकडे, नजरेतल्या कडा ओलावल्या  होत्या.  बोटाने , हळुवारं ते कड,  ती पुसू पाहत  होती . एक स्तब्धता पसरली होती .
वाटलं म्हणावं , मोकळी हो बिनधास्त , मी आहे .  पण त्या शांततेत ते सगळं विरून गेलं.
स्वतःशीच मन पुटपुटू लागलं.

माणसाला आयुष्यात काय हवं असतं बरं? फक्त नि फक्त निस्वार्थ मनानं केलेलं प्रेम.  अन मन मोकळा आधार , संवाद  , बस्स, पण त्यासाठी हि किती झगडावं लागतं,  ह्या आयुष्याची.
म्हणावं तर  , काही गोष्टी  किती सहज येतात आयुष्यात ,   सहजच अगदी , हव्या त्या वेळी , हवं तेंव्हा  , तर काही गोष्टी येता येता आयुष्य निघून जातं.

काही क्षण दोघे हि निशब्द होतो आम्ही , काय बोलावे ते कळतं न्हवतं. सुचत न्हवतं.  
तेवढ्यात तिचे बोल कानी आले .

आजच रडून घेते  रे , पुढच्या वेळेस कुणाला वेळ आहे,  हे रडगाणं पुन्हा गायला . एकदाच काय ते मोकळं व्हायचं .हसायचं
दोघांच्याही चेहऱयावर स्मित हास्य उजळलं
अन एक वेगळ्या  विषयाला पुन्हा  सुरवात झाली  .

आई बाबा गावी असतात.  लहान बहीण- भाऊ आहेत.  हि तिथेच आहेत
 सध्या इंजिनीअरिंगच क्षिक्षण घेत आहेत.
मला फार  शिकता आलं नाही.  पण  मला त्यांना  मोठं करायचं आहे. खूप शिकवायचं आहे...
एक भरीव विश्वास तिच्या नजरेतून ओसंडून वाहताना दिसत होता .

मुंबईत इथे मी एकटी आहे. एकटी राहते.  आज जवळजवळ आठ वर्ष झाली.
ह्या मुंबईने , ह्या डिफेन्सस सर्व्हिसने माझ्यात एक बिनधास्तपणा अंगी भिनवला आहे.
अजून खूप सारी स्वप्नं आहेत. माझ्याच ह्या फिल्ड मध्ये मला पुढे जायचंय. जमेल तसं कुणाचा आधार हि व्हायचं आहे. जीवन सार्थ करायचं आहे . बस्स ....
बोलता बोलता ती थांबली. नव्या आत्मतेजाने तिचं मन  प्रसन्नतेत वाहू लागलं होतं.  

भेटीचा म्हणावा तर हा आमचा पहिलाच क्षण आजचा . वर्षभराची जुनी काय ती ओळख.  पण कधी भेटणं झालं नाही. मध्यंतरी तसा भेटीचा योग जुळून आला होता म्हणा ,  पण भेट अशी झालीच नाही .  ती आज घडली (वर्षभराने ) अन ते बरंच झालं म्हणा ,  एक धडाडणारं  खिलाडी व्यक्तिमत्व ..नजरेसमोर आलं.

'ईशान्य वार्ताच्या'  मासिकात छापून आलेल्या माझ्या त्या लेखामुळे तिची अन  माझी काय ती ओळख .
सामाजिक क्षेत्रात पुढाकार घेऊन ,लोक कल्याणासाठी , कुणाच आधार होण्यासाठी , सतत धडपडणाऱ्या व्यक्ती मध्ये हि एक , माझ्या मैत्रीच्या लिस्ट मध्ये हिचा  समावेश आहे .हिचा सहवास आहे . ह्याचा मला फार आनंद आहे .  अनं सार्थ अभिमान हि ...,

अगदी वयाच्या साठ सत्तरच्या आसपासच्या हिच्या मित्र मैत्रिणी आहेत . ह्याचा  खरंच खूप कौतुक वाटतं मला  . त्यांच्याशी दिलखुलास बोलणं , त्यांच्यात आपलं म्हणून सहज मिसळून जाणं. त्यांचं होऊन जाणं ,  हिला सहज  जमतं.
नुकतंच एका आजी आजोबांचं . नव्याने लग्न जुळवून दिलं हिने, म्हणे
हे सार अन सगळं कौतूकास्पद आहे
वाचनाची अन कवितेची आवड तर लहानपानापासूनच    ,
पण आता मात्र ह्यासाठी तिला वेळ मिळत नाही

खरंच , वर्षभरात मी तिला इतकं जाणलं न्हवतं.  ते प्रत्यक्ष भेटून आज तिच्याबद्दल एवढं काही जाणता आलं मला
म्हणतात ना , ' माणसं जेवढी 'जवळ' तेंवढी ती अधिकतेने कळतात. नव्याने उलगडली जातात . आतून बाहेरून . तशी ती आज मला  कळली, उमगली आतून बाहेरून.

चेहऱयाशी  हास्य  खिळवून , इतरांचं जगणं अन  जीवन हास्यगंधीत करणाऱ्या एखाद्याचं 'आयुष्य' आतून किती दुखीव वेदनांनी  जखमी असतं. ते हि आज जवळून  पाहिलं.

किती वेदना , किती संघर्ष ,किती त्या ओल्या  जखमा ,  अंगभर झेलुनही ,  फुटणाऱ्या आसवांना आत  दडून ठेवण्याचं , हसण्याचं अन हसवण्याचा सामर्थ्य ह्या लोकांत असतं.
त्यांचे अनुभवी बोल , शब्द नि शब्द म्हणजे प्रेरित जलसागर असतं .  आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी . अन अशी माणसं केवळ योगयोगने भेटतातं.

सलाम तुझ्या कर्तुत्वाला अन जगण्याला......

-  संकेत पाटेकर 
    22.10.2016