बुधवार, १३ नोव्हेंबर, २०१३

जीवनात हर एक स्वभावाची माणसे भेटतात...


'' प्रेमाचा एक चतकोर हि आनंदाचा अंकुर फुलण्यास पुरेसा असतो''.
जीवनात हर एक स्वभावाची माणसे भेटतात.
प्रत्येक पाउल वाटेवरती एक ना एक नाती जुळतात . प्रत्येकाचा स्वभाव तसा वेगळा , प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी. प्रत्येकाशी आपलं  मन जुळेलच अस होत नाही . तरीही प्रत्येकाला हृदयी सामावून घ्याव लागतं .
कुठेतरी तडजोड करावी लागते .मनास समजून घ्याव लागतं.
भावनांना हि कधी आवर घालावं लागत .कारण माणसं महत्वाची असतात . नाती महत्वाची असतात .हर एक क्षण महत्वाचा असतो .
जीवन अशा हर एक व्यक्तींनी , ज्या त्या नात्यांनी गुंफल आहे . ते शोभिवंत आपल्याला करावं लागत. वेळोवेळी त्याची काळजी घेऊन , ' तरच त्यातल नव तारुण्य कायम राहतं.
कोण गरीब कोण श्रीमंत, कोण छोटा कोण मोठा ह्याच्याशी काही देण घेण नसत .
प्रेमाचा एक चतकोर हि आनंदाचा अंकुर फुलण्यास पुरेसा असतो.
प्रत्येकाशी आपला स्वभाव आपले विचार जुळतीलच अस नाही . तरीही वेळोवेळी प्रत्येकाशी त्यांच्या स्वभावानुसार, त्यांच्या विचारसरणीनुसार आपल्याला त्यात समरस व्हाव लागत .
हे मानवी स्वभाव वेगवेगळे रंगच आहेत जणू .. प्रत्येक रंगाच अस एक खास वेगळेपण असत .
तरीही त्यातल्या त्यात सफेद रंगाच एक खास वैशिष्ट्य आहे .तो कोणत्याही रंगात मिसळता येतो .
आणि कोणत्याही रंगात मिसळताना तो त्याच मूळ रूप मिटवत नाही तर त्यात त्यात तो अगदी सामावून जातो त्यांना हव तस. ...!!
स्वभाव हा असा हवा ''सफेद'' रंगासारखा ..
सर्वात मिसळता येणारा , त्यात समरस होणारा .
संकेत य पाटेकर
मनातले काही ..
१३.११.२०१३

बुधवार, ९ ऑक्टोबर, २०१३

नातं - हृदय अन मनाचं

शांत हो , शांत हो मना..
किती त्रास करून घेशील रे,  स्वतःला ?
 शांत हो, का ओढावून घेतोयस स्वतःला ह्या विशाल दु:ख सागरात ?
जिथे आनंदाचा एक थेंब हि मिळणे कदापि शक्य नाही .
 जिथे हास्याची तरल भावना हि कधीच लहरत नाही . का करून घेतोयस त्रास असा ?
का अशा अपेक्षांचं भार स्वतःवर ओढावून घेतोयस हे ठाऊक असूनही कि त्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. ?
का इतकं प्रेम करतोयस त्या व्यक्तींवर जिथे आपल्या असण्याला, जिथे आपल्या शब्दाला हि मुळीच किंमत नाही ?
का अस करतोयस ?
का अस वागतोयस ?
का असा धडपडतोयस ?
जीवन अवघं काही क्षणाचचं आहे रे ,   कधी कोण जाणे ह्या मृत्यूशी गाठ भेट घडेल .
त्यामुळे जे आहे त्यातचं समाधानी व्हायला शिक., थोडं आनंदात जगायला शिक .,
मोकळेपणे हसायला शिक.,दुखात हि आनंदाची कला जोपायला शिक., स्वतःच दुख लपवून दुसर्यांच्या आनंद बनायला शिक .
ऐकतोयस ना ? मी जे काही बोलतोय ते ऐकतोयस ना?
हृदय अगदी तळमळीने मनास समजावून पाहत होता. शेवटी दोघांमध्ये हि घट्ट मैत्रीच नात जे होतं. जीवापाड प्रेम होतं.
कित्येक दिवस झाले . हास्याचा लवलेश हि त्याने मनाशी फिरकताना पाहिला न्हवता .
एकांतात शांत बसून तो कित्येक तास स्वतःच्याच प्रश्नाची उत्तर शोधू पाहे .
पण उत्तर मिळूनही त्याच समाधान काही होत नसे. त्यामुळे सतत दु:खाच्या छायेखाली तो गुरफटत असे . त्याची हि अवस्था हृदयास पाहवत न्हवती . त्याचं अस वागण हृदयास त्रास दायक हि ठरत होतं .
त्याचा वेग कधी मंदावत तर कधी अधिक वेगाने धडधडत. एक दिवस हे सारं अनावर झालं नि हृदयाने ठरवलं आपण थोडस समजावून पाहू .
आणि त्याने सुरवात केली .
ऐकतोयस ना ? मी जे काही बोलतोय ते .. 
हो , ऐकतोय रे भावा..., सर्व काही ऐकतोय मला हे ठाऊक नाही असं नाही रे , सार काही कळतंय .
जीवन अवघ काही क्षणाचचं आहे , ठाऊक आहे.
आज  आहोत उद्या नसू हि . कोण जाणे कधी मृत्यूशी गाठ भेट घडेल , सांगता येत नाही
आनंदित जगायला हवचं यार ..
पण काही गोष्टी नीटशा कळत नाही रे . त्या विचारात मग दिवस रात्र गढून जातो .
 त्यातून बाहेर हि पडता येत नाही . किंव्हा कसं बाहेर पडावं ते हि कळत नाही .
घरा व्यक्तीरिक्त जेंव्हा आपला बाहेरील जगाशी संबंध येतो. तेंव्हा बऱ्याशच्या गोष्टींचा कळत नकळत आपल्यावर परिणाम होत असतो .
वेगवेगळ्या स्वभावाची , वेग वेगळ्या शैलीची माणसे आपल्या आयुष्याशी जोडली जातात वाटेवरल्या टप्प्या टप्प्या प्रमाणे आणि त्यातूनच मग काही अनामिक नाती निर्माण होतात , काही जिवाभावाची जिवलग प्रेमाची . मना मनाची ...
मग रक्ताची नाती नसली तरी आपण त्यात स्वतःला सर्वस्वी वाहून घेतो.
आनंद उपभोक्तो त्या क्षणांचा . त्यावेळेस वाटत देवाने आपल गाऱ्हांन ऐकलं !
आपल्याला हव ते त्यान दिलं. पण ते काही क्षणाचचं असतं अस पुढे समजतं .
कोणत्याही गोष्टीचा आनंद सदा सर्वकाळ टिकून राहत नाही रे ... तसंच काहीस दु:खाच देखील आहे .
पण शेवटी ते आठवणीतले गोजिरवाणे क्षणच आपली सोबत करतात आयुष्यभर . असो ...

प्रेमा सारखी हसरी आणि दुखी गोष्ट इतर कुठलीच नाही. 
प्रेम हेचि जीवन हे आजपर्यंत मी मानत आलो होतो . पण आता अनुभवाने शिकलोय प्रेम हे जरी जीवन मानलं तरी , जीवन म्हणजे प्रेम नाही रे . प्रेमा पलीकडे हि इतर गोष्टी आहेत . ज्यांचं मोल फार मोठ आहे .पण त्यात हि कुठे ना कुठे प्रेमाचा अंश हा दडलेला आहे हे हि तितकंच खरं आहे . .
छान ! म्हणजे अनुभवाने तुला शहाणे केले तर ; मनाचे मनातले हे अनुभवी बोल इतका वेळ शांतपणे एकूण घेतल्यावर हृदयाने हळूच स्मित हास्य केले अन बोलण्यास सुरवात केली.
'बरोबर आहे तुझं ... प्रेमाचा अंश हा सर्वत्र असतोच , कोणत्या ना कोणत्या स्वरूपांत , त्याचाशिवाय जीवनानंद तो कुठला रे'

फक्त अपेक्षांचं ओझं नको त्यात , असलं तरी त्याच भार इतकं नको घेऊ कि हे जीवनक्षण भकास वाटेल. दुखांनी व्यापलेलं .
आनंद तसा सर्वत्र ओसंडून वाहतच असतो रे...तू पहिलस तर..
पण तशी दृष्टी हवी पाहण्याची आणि तुझ्या वेळीच वळणाची .
तसं अडकून कुठेच राहायचं नसतं . नेहमी मार्ग शोधायचा तो आनंदाचा , हर्षाचा ..., मोकळ्या श्वासेचा , प्रकाशित जीवनाचा . बरोबर ना ? मना हो रे भावा..
दुसर्यांनसाठी जरुरू जगावं , पण त्या आधी स्वत:हा जगायला शिकावं . आनंद घ्यायला शिकावं . आनंद द्यायला शिकावं .
ह्यास जीवन ऐसे नावं !
नातं - हृदय अन मनाचं
संकेत पाटेकर
११.१०.२०१३

शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१३

आई - माझी गोड प्रेमळ आई ......


काही दिवसापूर्वीच एक स्वप्न पडलं . त्यात आईच दर्शन झालं खरं. पण त्या स्वप्नाच अर्थ काही कळला नाही. संपूर्ण दिवस मात्र भीतीने कापरत गेला .
अजून देखील तो क्षण आठवतो अन काळजात चर्र होत . सकाळचे ८ वाजून ३५ मिनिटे झाली होती. बुधवार होता . घटस्थापनाचा पहिला दिवस - देवीच आगमन झालं होतं.
नेहमीप्रमाणे मी ऑफिस ला जाण्यसाठी बाहेर पडणार होतो. तेवढ्यात आई म्हणाली . मी सुद्धा येते तुझ्या सोबत . मी म्हणालो कशासाठी ? ती म्हणाली असच जरा फेरफटका मारण्यासाठी .
तेंव्हा माहित न्हवत . फेरफटका म्हणून बाहेर निघालेली माझी आई हि आम्हाला सोडून दूर कुठे जाणार आहे ते पुन्हा परतून न येण्यासाठीच . नशिबाची खेळी हि अजब असते . जे घडणार आहे ते घडणारच कसेही करून. आई सोबत मी बाहेर पडलो खरा . घरापासून साधारण १५-२० मिनिटे पुढे चालत आल्यावर कुर्ल्याला जाण्याकरिता मला बस दिसली . म्हणून मी धावत पळत जावून ती पकडली . जाता जाता मात्र आईला हातानेच दूरवरून निरोप दिला . आणि तोच शेवटचा क्षण ठरला तिला पाहिल्याचा .
ह्या नंन्तर मात्र आठवणीतच तिला आता पाहतो . तिच्या मायेचा स्पर्श अनुभवतो . तिचे बोल कानी साठवतो .कळत नकळत कधी डोळ्यातून आसवे गाळतो.
त्या दिवशी नियतीला असच काहीतरी घडवायचं होत . तिने एक खेळी केली . आई घरी परतली नाही हि बातमी सर्वांना रात्री उशिरा कळली . आणि तेंव्हा फार उशीर झाला होता . सकाळी निघालेली माझी आई कुणास ठाऊक कुठे दूरवर निघून गेली होती . ती रात्र , पहाट होईपर्यंत आम्ही रस्त्यावरून नुसत भटकत होतो . तिच्या शोधार्थ . पण नाही .....................ती परतली नाही .
एक मात्र सांगून गेली .हा प्रसंग घडण्याच्या काही दिवस आधी . माझी तुमच्यावर नजर असेल भले मी कुठे हि असेन . आणि ती नजरच आता आमच्यवर लक्ष ठेवून आहे
आई विना भिकारी म्हणतात ना ते खर आहे . मायेच्या स्पर्शासाठी मी आता दुरावलो . आईच्या उबदार कुशीत डोक ठेवून शांत पडून राहणं ते हि हिरावलं. आजारपणात इतरांपेक्षा जास्त काळजी घेणारी . बाजूला बसून डोक्यावरून प्रेमाचा अलगद हात फिरवणारी ती एकमेव आई ..सार माझ्यपासून दूर गेलं. आता फक्त आठवणी आहेत . त्या गोड मधुर तिच्या सहवासातल्या तिच्या शिकवनितल्या .
जे पुढ्यात आहे ते खायचं . जेवणाला नाव ठेऊ नये . हे तिने शिकवल . तसं लहान पण आमच गरिबिचच होतं . घरात रॉकेलच्या दिव्यावर आम्ही रात्र काढायचो . कधी एक वेळ मसाल्या भाताशी जेवायचो. तेलात लाल तिखट मसाला मीठ मिसळत भाताशी लावून लावून खायचो. अजून ती चव जिभेवर रेंगाळते . कधी एक वेळ उपाशी तर कधी मसाल्या भाताशी . तर कधी नुसत भात आणि सोबत कोरी चहा ,तेंव्हा सिलेंडर गस असा प्रकार न्हवता आमच्याकडे .त्यामुळे रॉकेल स्टोव्ह वर सर्व चालायचं . त्यसाठी हि आईची चाललेली धडपड मी पाहायचो . सकाळी सात ते आठ वाजल्यापासून ते दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत धुण्या भांड्याची कामे करत ती आम्हा सर्वाना सांभाळत होती . आणि त्यातच चांगले संस्कार करत होती.
आयुष्यात मी अजून कधी शिवीगाळ केली नाही .हि सुद्धा तिची शिकवण एकदा लहान पणी मित्राशी झालेल्या झटापटीत मी फक्त त्याला '' कुत्रा'' अस रागानेच म्हटलं होत . आणि ती शिवी मानून मी मनाशी पक्का निर्धार केला होता . एखाद्याला कुत्रा म्हणन हि देखील एक शिवीच .आणि तेंव्हा पासून अस बोलन हि मी सोडून दिल . हि सारी तिचीच शिकवण घरी वडिलांना दारू -तंबाखूच व्यसन असतना आम्हाला वाईट व्यसने कधी लागली नाही . हे हि तिच्यामुळेच.अशा किती तरी गोष्टी तिने शिकवल्यात . प्रेमाने समजावल्या त्या तिच्या अनुभवानेच .
त्यातलीच अजून गोष्ट म्हणजे :- माझा भाऊ आणि मी , तिचे शब्द जसेच्या तसे कानी आहेत . एकदा तिने सांगिलते होते . संकेत तू आणि भाऊ आप आपसापासून कधी दुरावू नका . एकत्रित राहा . भले हि काही हि होवो .
आईचा एक दंडक असे . मुलांनी मुलांमध्येच राहावे. मुलींनी मुलीनमधेच राहावे. मुलींच्या बाजूला बसने आईला खपत नसे . मग ती बहिण असो वा इतर कोण . अंतर ठेवूनच बसावं आणि बोलाव जे काही आहे ते. असे ती मला सांगे बहिणीच्या बाजूला हि अस अंतर ठेऊनच बसावं . ह्यावरून मात्र माझ नि आईच कधी पटल नाही.
लहानपणी मात्र आई कडे केलेला हट्ट अजून आठवतो . मला सख्खी बहिण नाही. म्हणून तिच्याकडे सतत रडत रडत सांगायचो मला एक बहिण हवी आहे. तेंव्हा त्यापुरत ती माझी समजूत काढायची . आणू ह ! आपण एखादी छानशी बहिण तुझ्यासाठी हॉस्पिटल मधून ... तेंव्हा मी कुठे शांत ह्वायचो .
आता ह्या सारया गोष्टी आठवतात ...........अन अलगद डोळे पाणवतात .
प्रेमाने राहायला तुने शिकवलं .
प्रेमाने वागायला तुने शिकवलं .
प्रेमानेच लहानच मोठ केलंस
प्रेमाशीच घट्ट नात तू जुळवून दिलंस.
माझी गोड प्रेमळ आई ....................... कधी तरी तू येशील परत .............हि माझ्या मनाची खात्री आहे .
संकेत पाटेकर
०५.१०.२०१३

गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०१३

जेंव्हा आपण काहीच नसतो ..


जेंव्हा आपण काहीच नसतो तेंव्हा आपल्याला कुणी विचारात घेत नाही .
जेंव्हा आपण काहीतरी असतो तेंव्हा लोक स्वताहून आपली विचारपूस करतात, जवळीक साधतात.
आयुष्य हे असं ... कुठल्यातरी एका वळणावरती , पाउल वाटेवरती आपल्याला समजून घेणार , आपलं ऐकणार कुणी एक नसतं. तेंव्हा त्या वळणावर त्या वाटेवर स्वतःला सावरतंच आपल्याला पुढे याव लागतं.
ज्या गोष्टींची ज्यावेळेस खरी गरज असते ती गोष्ट वेळेवर मिळतेच अस नाही . काही वेळा गरजेची ती खरी वेळ निघून जाते. आणि आपण मात्र अनुभवाने शहाणे होतो.
- संकेत
मनातले काही
०३.१०.२०१३

बुधवार, २५ सप्टेंबर, २०१३

....आणि मी प्रेमात पडलो.


....आणि मी प्रेमात पडलो.
सांजवेळ होती.मी माझी दुचाकी घेत रस्त्याच्या एका कडेने सरळ मार्गी जात होतो .
 सूर्य मावळतीला त्याच्या परतीच्या मार्गी जाण्यास अतिशय व्याकूळ झाला होता .
 त्याची चाललेली ती धडपड समोरच नजरेला भिडत, मनाला चैतन्य बहाल करत होती.
 त्याची सोनेरी तांबूस प्रकाश किरणे माझ्या अंगा खांद्यला छेदत रस्त्यावर विखुरलेल्या लाल मातीशी लगट करत होती . त्यातच लहरी वारा हळुवार कानाशी गुंजत मनाशी संगीत खेळी करू पाहत होता .
रस्त्यावर तशी रहदारी न्हवती . तुरळक वाहनांची ये जा आणि एक दोन माणसे अधून मधून दिसत होती तेवढीच .
दुर्तफा झाडी आणि अधून मधून दिसणारी हिरवीगार शेतजमीने , आणि त्यावर डोलणारी लुसलुशीत गवतांची पातं . त्या रमणीय वातावरणात , मी माझ्या दुचाकीचा वेग थोडा कमी करत नजरेत ते सारे क्षण टिपून घेण्याच्या प्रयत्नात होतो .
तितक्यात नजरेतील प्रकाशकिरणे थेट एका सुंदर चेहऱ्याकडे खिळून राहिली .नेत्रपटला वरती ती सुंदर आकृती हळू हळू एकजूट होऊ लागली .
गहू वर्णीय गोलाकार चेहरा, काळे भोर सुंदर डोळे ,त्या नजरेतील तिचे आदरयुक्त प्रेमळ भाव .......,
पाहूनच मन वेडावलं .
पाणी भरावयास आलेल्या, विहिरीवरील काठाशी जमलेल्या अनेक मुलीन पैकी ती एक होती . सर्वात उठून दिसणारी . एक सुंदर गोड परी ....
तिच्यावरची नजर काहीकेल्या हटत न्हवती .माझी दुचाकी मात्र तिच्याच वेगेत पळत होती. थोड्या पुढे एका वळणावर उंचच उंच चहूकडे आपले बाहू पसरलेल्या त्या वृक्षाभोवती हळूच माझ्यासकट माझी दुचाकी आदळली. आणि खरच मी प्रेमात पडलो तो असा .
असच थोडा विरंगुळा ........
तुमची प्रतिक्रिया आवश्यक ....
- संकेत पाटेकर

सोमवार, १६ सप्टेंबर, २०१३

नाती मनाची प्रेमाची अन विश्वासाची

नाती मनाची प्रेमाची अन विश्वासाची
काही नाती हि फक्त दोन अक्षांरा पुरतीच मर्यादित असतात . त्यात आपलेपण हा नसतोच . साध्या - छोट्या अपेक्षा हि जिथे पूर्ण करता येत नाहीत ते नातं कसल ते असूनही मृत असल्यासारखंच .
खर तर अपेक्षा ह्या करूच नये , पण पण साध्या छोट्या अपेक्षा हि करू नये का ? बर ह्या अपेक्षा हि कुणाकडून हि नसतात , त्या आपल्याच माणसांकडून असतात . पण त्या हि काही वेळा पूर्ण होत नाही . अशा वेळेस थोडस निराशपण येतंच , पण म्हणून त्या व्यक्तीला दोष देण हि योग्य नाही . जे नशिबात आहे ते आहे . पण तरी हि ...
काही सेकंदासाठी का होईना , आपल्या व्यक्ती साठी आपल्या बिझी शेड्युल्ड मधून थोडा वेळ हा काढावा. ५ मिनिट का होईना थोडं बोलाव , कधीतरी भेटाव ..., मी म्हणत नाही वारंवार फोनवरच राहावं , प्रत्येकवेळी भेटाव - भेटत राहावं ...पण कधी तरी ..केव्हातरी ... या इवल्याश्या मनाला दिलासा ...
खर तर ...
एकमेकांच एकमेकांवर मनापासून प्रेम असेल , एकमेकांविषयी ''आपलेपणाची'' भावना दृढ असेल, आणि जिथे सामंज्यस पणाची जाणीव असेल तेच नातं खरया अर्थानं ''विश्वासाचं नातं' असत . आणि त्या नात्यात प्रसन्नतेच तेज कायम झळाळत राहत.
अहो , नाती आहेत म्हणून आपण आहोत , आपण आहोत म्हणून आपलेपण आहे , एकमेकांवर प्रेम आहे .
मनातले काही ..
नातं तुझं माझं
संकेत य पाटेकर
१६.०९.२०१३

सोमवार, १९ ऑगस्ट, २०१३

I have done Big mistake in my life''


''I have done Big mistake in my life''
सकाळ्च मोबाईलची रिंग खणखणू लागली.
इतक्या सकाळच कुणाचं call म्हणून मोबाईलकडे सहज नजर फिरवली , नंबर ओळखीचाच होता. आलेला call रिसीव्ह केला . आणि बोलण्यास सुरवात केली .
नित्य नेहमीचाच आवाज सुरवातीला वाटला , पण हळू हळू शब्दातली गंभीर भावमुद्रा मनावर उमटू लागली .
पुढे शब्दांसोबत अश्रूंचाही बांध फुटू लागला . तसं तसं चेहर्यावर प्रश्नार्थी भाव उमटू लागले.
'' संकेत मी आयुष्यात फार मोठी चूक केलेय.
'I have done Big mistake in my life, feeling guilty n upset ''
तिच्या ह्या एकएक शब्दांसोबत अश्रुथेंब हि वाहत होते . तुटक तुटक शब्दात ती बोलत होती.
'' संकेत, कुणासाठी खरचं compramise करू नकोस , sacrifice करू नकोस , त्यांना त्याची काहीच किंमत नसते .
तिच्या ह्या वाक्यात मात्र सत्यता होती . आयुष्यात कधी अशी एखादी व्यक्ती येते . जिच्यावर आपला जीव जडला जातो. एक घट्ट नातं जुळल जातं. ज्या साठी आपण बऱ्याच गोष्टी सर्वस्वी पणाला लावतो . पण शेवटी त्या व्यक्तीला आपल्या ह्या साऱ्याची काहीच किंमत नसते . अस जेंव्हा कळत तेंव्हा मनाचं संतुलन साहजिकच बिथरत .
अशा वेळेस झालं ते विसरून , काय तो त्यातून बोध घेऊन आपल्या पाउल वाटेने पुढे निघत जायचं. आयुष्याचा एक तो भाग होता अस समजून पुढे निघायचं. बस हेच हाती असत .
आयुष्य असंच अनेकानेक चांगल्या वाईट घटनांनी भरलेलं आहे . त्यात अडकून न राहता हसत खेळत पुढे चालत राहण आणि इतरना हसवत राहण हेच जीवन आहे .
मनातले काही ...
नातं तुझं माझं
संकेत पाटेकर
१२.०८.२०१३

शनिवार, १७ ऑगस्ट, २०१३

शिकून सुद्धा अडाणी ...ते अडाणीच


शिकून सुद्धा अडाणी ...ते अडाणीच व्यवस्थित टापटीपपणा आणि सूट बुटात असणारी एखादी व्यक्ती ..घरात , ऑफिस मध्ये व्यवथित वागेल . पण घर बाहेर पडताच .... एखाद्या ना समज मुलासारखी .... अक्कल नासेलेली आपण इतकी पदवी घेतलेय शिकलोय ह्याच त्यांना काहीच मुल्य नाहि ., खर तर लाज वाटायला हवी . आपण जे काही करतोय त्याची ... तुम्हाला वाटेल मी काय हे वायफळ बडबडतोय ........काय लिहितोय , खर तर मित्र मंडळी ... एक साधासाच विचार आहे . पण खरच शिस्तीची गरज आहे .
जाता येता रस्त्याने आपणास एक चित्र नक्कीच पाहायला मिळत असेलच . एखादी व्यक्ती एखद्या दुकानातून काही खाद्य पदार्थ विकत घेते , आणि त्याने पोट तृप्ती झाल्यानंतर त्यातून निर्माण झालेला केरकचरा , कागदाचा एखदा बोळा असो , प्लास्टिक असो , टरफलं असो वा इतर काही ...आपल्या आसपास कुठे हि टाकून पसार होते . ह्याउलट तंबाकूच्या पिच्कारया उडवण ..असे प्रकार हि सर्रास दिसतातच .
बस मध्ये म्हणा , ट्रेन मध्ये म्हणा , रस्त्याने चालताना म्हणा , driving करत असतना म्हणा एखद्या ऐतिहासिक स्थळी म्हणा ........ह्याना शिस्त नि नीती मुल्य ती नाहीच.
घरात ह्यांच्या स्वच्छता , टापटीपपणा , पण घरा बाहेर सार्वजनिक ठिकाणी घाण करायची .
हे शोभत का ? हा प्रश्न स्वतःने स्वतःलाच विचारा ? रस्त्येन चालताना आपणच एका ठिकाणी कचरा करायचा ...आणि तिथे कचर्याचा ढीग साचल्यावर मात्र दुसर्यांच्या नावावर बोंबा मारायची . हे असे प्रकार .. निदान शिकलेल्या माणसांनी तरी शिकल्या सारखं थोडं तरी वागा.
जिथे स्वच्छता असते , तिथले वातावरण हि छान , मोकळ असत . मनाला ताजतवान करणार . देशात अनेक प्रश्न आहेत . पण सर्व प्रथम खरच मुल्यशिक्षणाची गरज आहे .
चला तर मग स्वच्छतेची शिस्त पाळू ......
- संकेत पाटेकर
१७.०८.२०१३

शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०१३

वाद हे होतंच असतात . एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती हवी .


रागापेक्षा देवाने प्रत्येकाला सामंज्यसपणा अधिक दिला असता ..तर मला वाटतं कित्येक नात्यांमधली जवळीकता नि त्यातली माधुर्यता कायम तशीच टवटवीत राहिली असती.
व्यक्ती व्यक्ती दुरावल्या नसत्या .......नात्यातला सुगंधितपणा तसाच निखळपणे दरवळत राहिला असता. पण हल्ली अस घडतं नाही . ऐकमेकांच कुणी ऐकूनच घेत नाही ? समजण्याइतपत माणसं आहेत तरी कुठे ? एक ऐकतो नि दुसरा संतापतो ..मग दोघे हि एकेमेकांशी ऐकेनासे होतात. हा वाद इथेच मिटत नाही ,तो तसाच ज्वलंत राहतो. जोपर्यंत जो तो एकमेकांपासून दुरावत नाही .
पूर्वी एकत्रित कुटुंबीय पद्धत असे .., आजही आहे , मी नाही अस म्हणत नाही. पण मोजण्या इतपतच असे काही कुटुंबीय असतील. बहुतेक जण हल्ली ह्या धावत्या पळत्या दुनियेत ...एकमेकांपासून दूर असलेलंच पसंद करतो.
नात्यातली सुवासिकता हरवून बसतो. काही वेळा अस करणं भाग हि असत. मी घरातल्या प्रत्येक व्यक्ती बद्दल बोलतोय . आई - बाबा - भाऊ बहिण , मोठा भाऊ - वाहिनी - जे कुणी घरात असतील .
वाद हे होतंच असतात . एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती हवी .
- संकेत य पाटेकर

प्रश्न पडल्यावरच त्याची उत्तर शोधावी लागतात .
- संकेत

जगावं तर ह्या पावसा सारखं..


जगावं तर ह्या पावसा सारखं.. कुणी काहीही बोलो , त्याला हवं तेंव्हा तो बरसतो . हवं तेंव्हा येतो , हवं तेंव्हा निघून जातो . कुणी त्याला चांगलं म्हणत, तर कुणी शिव्या शाप देतं. पण तरीही तो सर्वांना हवा असतो . त्याच्या असण्यातच बऱ्याच गोष्टी सामावलेल्या असतात .
म्हणून... जगावं तर ह्या पावसा सारखं... कुणी कितीही काहीही बोलो , आपल्या परीने आपण जगायचं . पण जगता जगता ह्या पावसा सारखं , तो जसा सर्वांना हवा असतो , तसं आपण ही सर्वांना हवे असू , असंच काहीतरी करत राहायचं .
- संकेत य पाटेकर

जिथे शांतता नांदते .....तिथे मनाची एकाग्रता वाढते ...!!

तारुण्य...


तारुण्य, तरुणपण हि अशी स्थिती आहे , जिथे घरातील जबाबदारयान सोबत , घरा बाहेरील येणाऱ्या जबाबदाऱ्यांच , तसेच समस्यांचं , अडचणींच .. प्रेम , नातं , नात्यातील भावनिक गुंत्यांच , अशा अनेकानेक गोष्टींच भार मनावर एकाच वेळी दडल जातं.
अशा वेळेस मनाचा संतुलन बिघडण्याची शक्यता हि नाकरता येत नाही . पण अशा हि परिस्थितीतून , ह्या साऱ्या गोष्टीतून जो स्वतःला सावरतो .....व्यवस्थित सार हाताळून जो पुढे जातो तो आयुष्यात यशस्वी होतो .
- संकेत य पाटेकर

सोमवार, २९ जुलै, २०१३

मनाची जडण घडण हि आपल्या विचारांवर अवलंबून असते ..


ह्या २५ तारखेपासून म्हणजेच माझ्या वाढ दिवसापासून अनेकानेकांचे शुभेच्छा आणि त्यांचे अनुभवी विचार एका पाठोपाठ एक मनावर धडाडत आहेत .
एखादी वस्तू बर्थ डे गिफ्ट म्हणून मिळते खरी, ' मित्रांकडून , नातेवाईकन कडून , पण मला ह्यावेळेस शुभेच्छांच आणि विचारांच पुष्प गुच्छच मिळाल ..मिळतंय अजूनही
मनाची जडण घडण हि आपल्या विचारांवर अवलंबून असते . आपण कसे विचार करतो , त्यावरच बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात .
मनास आकार देण्याच काम मात्र , आपल्या समाजातील विविध घटित- अघटीत घटना करत असतात , तसेच आपल्या कुटुंबातील वयामानाने मोठ्या असलेल्या व्यक्ती त्यांचे अनुभवी विचार आपल्या समोर मांडून आपल्या मनाला एक विशिष्ट्य आकार देत असतात . त्यातून आपण घडत असतो .
माझ्या वाढदिवशी मध्य रात्रीपासूनच शुभेच्छांचा वर्षाव झाला .
संध्याकाळी आलेल्या एका call ने मात्र शुभेन्छ्यान सोबत शाब्दिक मारा देखील केला. पण त्या मागे प्रेम दडल होत . आपलेपणाची जाणीव होती . कुठेतरी आपण चुकतोय , वेगळ्या वळणावर पाउल टाकतोय हे त्या मनास उमगून आल होत . आणि त्याच साठी तिने समजुतीचा शाब्दिक मारा चालवला होता (माझी प्रेमळ बहिणी ती ) .
दुसर्या दिवशी सहज रस्त्याने चालत असता एका मित्राशी योगायोगानेच म्हणा भेट घडली ,
आणि बोलता बोलत त्याने त्याचे किमती अनुभव शेअर करण्यास सुरवात केली . रोजच्या ह्या धका धकीच्या जीवनात आपल्याला वेळ तसा मिळतो कुठे? . ऑफिस घर -ऑफिस ह्यातच आठवड्यातले सहा दिवस भुरकन निघून जातात .
घरच्यांना वेळ देण्यात आणि घरातली कामे करण्यातच आलेला रविवार हि तसाच निघून जातो . त्यात मग आपल्या आवडी निवडी जपता येत नाही ,मित्रांसोबत कुठे बाहेर पडता येत नाही , मित्रांशी ओळखी वाढविता येत नाही. जीवन हे सुंदर असून ते सुंदरतेने जगता येत नाही . म्हणून आठवड्यातून दोनदा तरी सुट्टी असावी . जेणेकरून हे जीवन जीवन म्हणून जगता येईल.
दुसरी गोष्ट म्हणजे ''आउट ऑफ बॉक्स विचार करन''
आपण एका कंपनीत ठराविक एकच अस काम दिवसेंदिवस , वर्ष वर्ष करत असतो , त्यामुळे इतर कामे हाताळायची गरजच पडत नाही . आपण एका चौकटीत राहूनच आपली कामे करत असतो .
त्यामुळे तुम्हाला कुणी काहीतरी वेगळ अस एखाद छोट मोठ काम करण्यास सांगितल आणि ते तुम्हाला जमल नाही तर ...
तुला हि गोष्ट येत नाही अस कुणी म्हणायला नको ..
अरे हे काम हाच /हीच करू शकते /शकतो अस म्हणायला हव . प्रत्येक गोष्ट आपणास करता आली पाहिजे .
त्या रात्री सहज मित्राला भेटण्यास म्हणून निघालो . आणि भेट झाल्यावर बोलता बोलता तिथे जवळपास विक्रीसाठी असलेल्या गणेश मूर्ती पाहण्यास म्हणून गेलो , तेंव्हा त्या विक्रेत्या काकांनी बऱ्याच गोष्टी सहजतेणे सांगून टाकल्या . त्यात शिक्षणाच महत्व होत . प्रामाणिकता , विश्वासार्हता अशा हि अनेक गोष्टी होत्या . आपल्या बोलण्यावरच सर्व काही आहे . हे त्यांनी ठामपणे सांगितल . ओळख नसूनही ओळख असल्यासारखं मनसोक्त मनातले भाव ते उलगडत गेले .
आता शनिवार निघून गेला आणि रविवार उजाडला दिवसाची लगभग आरामात सुरु झाली . दुपार होत आली आणि पाउले उल्हास नगरच्या वाटेला निघू लागली . पुन्हा एका प्रिय व्यक्तीच्या भेटीला .
१) आपला आनंद कुणावर Depend ठेवू नये , कुणावर Depend राहू नये .
२) आपल्या मूळे हा प्रकार घडला , अस घडायला नको होत . अस Gilty Feel हि कधी करू नये .
३) जे विधी लिखित आहे ते घडत असत . आपण ते स्वीकारायचं . पुढे जायचं .
४) आपल्या मनाचं संतुलन आपण राखायच .
५) ''नियम'' मधला ''नि' बाजूला काढला कि उरतो तो ''यम'' म्हणून नियमा प्रमाणेच वागावं . नाही तर यम आहेच ...!!
६) आपल्या बोलण्यातूनच आपला स्वभाव आपलं वागण कळत, म्हणून बोलाव, बोलतं व्हाव.
अशा कितीत्तारी चांगल्या गोष्टी चांगले विचारांचं गुच्छ मला मिळाल .
मनातले काही ..
संकेत पाटेकर
२९.०७.२०१३

मंगळवार, ९ जुलै, २०१३

अपेक्षा .....


अपेक्षा .....
आपल्या माणसांकडूनच आपण अपेक्षा फार ठेवतो . आणि तेच कारण असतं काहीवेळेस असलेल्या विश्वासाला तडा जाण्याचं..
. त्याच दोष मात्र आपण सर्वस्वी समोरच्याला देऊन मोकळे हि होतो लगेच , पण खरी चूक हि आपलीच असते, कारण अपेक्षा ठेवणारे आपले आपणच असतो .
अपेक्षा ह्या आपल्या माणसांकडूनच नाही कराव्यात तर कुणा कडून कराव्यात हा ? हा प्रश्न देखील लगेच उद्भवणारच ......पण त्या प्रश्नाचं उत्तर देखील तयार असत..
अपेक्षा ह्या असाव्यात ...पण फार नसाव्यात , ज्या आहेत त्या समोरच्याकडून पूर्ण होत नसेल तरी त्याच दुःख नसावं . कारण समोरचा त्याच्या वतीने पूर्णपणे प्रयत्नशील असतो , जर त्याच्या तुमच्यावर अगदी जीवापाड प्रेम असेल. तुमच्यावर विश्वास असेल तर ........
पण प्रत्येक वेळीस त्याच्या प्रयत्नांना यश येइलच असंही नाही .त्यामुळे आपल्या माणसांकडून ठेवलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तरी त्याची खंत मनी नसावी . नाहीतर जीवन जगण असह्य होईल .
आपल्या जशा अपेक्षा असतात , तशा समोरील व्यक्ती कडून हि असतात, हे हि लक्षात ठेवावं . पण अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तरी त्याच दुखं नसावं .....अन त्यासाठी कधी कुणाचा विश्वास तोडू नये. कारण तुटलेला विश्व्वास पुन्हा मिळवण , जुळवण खूप अवघड असत.
- संकेत य पाटेकर
०९.०७.२०१३