गुरुवार, ७ जून, २०१२

जीवन हे खूप गुंतागुंतीच आहे

मित्रहो, 
जीवन हे खूप गुंतागुंतीच आहे ...तो गुंता सोडवता सोडवता आपण आपल्या जीवनातला आंनदच गमावून बसतो . ......अन दुखाला कवटाळून राहतो . आनंद म्हणजे नक्की काय असत ह्याचा आपणास विसरच पडतो. 
आयुष्य हे एकदांच मिळत .........म्हणून जीवनातला प्रत्येक क्षण हा शक्यतो हसत खेळत काढावा . नेहमी हसत राहावं . हसत ...हसत प्रेमाने बोलाव , कधीही कुणावर उगाच चिडू नये , द्वेषाने बोलू नये , द्वेषाचे बोल ते शब्द खूप आघात करतात एखाद्यावर. 
जीवनातला प्रत्येक क्षण हा खूप महत्वाचा आहे . .... गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही . 
म्हणून हसत रहा...आनंदात रहा , प्रेमाने बोला प्रेमाने चला 

संकेत य पाटेकर 
३०.०५.२०१२

मन ..

मनं ...........
कधी म्हणतं तिच्याशी खूप भांडाव , रागवाव.... पण रागाच्या भरात नको ते शब्द भराभरा निघतात आणि मग समोरील व्यक्तीच्या मनावर आघात करतात ...नंतर आपणासही पच्छांताप होऊ लागतो त्या गोष्टीचा.......
समोरील व्यक्तीच वागण कधी कधी अचानक बदलत...ते कां बदलत ह्याच कारण काही केल्या आपणास मिळत नाही.
जोपर्यंत ती व्यक्ती स्वताहा ते सांगत नाही , खर काय आहे ते कळत नाही तोपर्यंत आपण मात्र वेगळ्याच गैरसमजुतीन जात असतो. मनात येत कि हि जाणून बुजून अस करते आहे , भेटण बोलन वगैरे सार टाळते आहे.
...पण खरी परिस्थिती वेगळी असते , असू शकते ....पण आपण मात्र .....त्याच लयात राहतो, मनाचा ताण अधिक वाढवत जातो .
- संकेत

बुधवार, ३० मे, २०१२

खर चुकतो तो इथे आपण ..............

मनं .............
समोरील व्यक्तीच्या मनात आपल्याविषयक, आणि आपल्या मनात समोरील व्यक्तीविषयक काय विचार आहेत...काय भावना आहेत , किती प्रेम आहे , किती काळजी आहे ......हे कधी कळतंच नाही कारण हे मनं कधी कळतंच नाही ...कुणाचं कुणाला .. :( कळलं तरी फार उशिराने ते कळतं ...
तेंव्हा आपण एक तर तिच्या नजरेतून फार उतरलेलो असतो .....किंवा आपल्या मनात तिच्याविषयक प्रेम कुठेतरी कमी झालेलं असतं.
मनाची हीच गोष्ट खूप खटकते ... आपल्या मनात तिच्याविषयक असलेल प्रेमळ भावना ...तिला कळतच....नाही आणि बहुदा तिच्या मनातली आपल्याविषयक असलेली ' प्रेमळ भावना' आपल्यालाही कळत नाही ....
मनं हे अस..................मनं हे असं..
miss u a lot...!! संकेत य पाटेकर
२१.०५.२०१२
सोमवार

आपल्याला प्रिय असलेली व्यक्ती सोडून का जाते रे ?

आपल्याला प्रिय असलेली व्यक्ती सोडून का जाते रे ?
काल सायंकाळी ऑफिस मधून घरी परतत असताना ... एक मेसेज आला मोबाईल वर जवळच्याच एका व्यक्तीचा .. त्यात तिने प्रश्न केला होता ...
आपल्याला प्रिय असलेली व्यक्ती सोडून का जाते रे ?
काही क्षण त्या प्रश्नाकडे नजर माझी स्थिरावली गेली. अन क्षणात वाऱ्या गतीने मनात विचारांचे चक्र गरगर फिरू लागले . भूतकाळाच्या आठवणीत मनं कस गढून गेल.
का दुरावते ती व्यक्ती जिच्यावर आपण मनापासून प्रेम कराव ? का होत अस ? काय चुकतं आपलं ?
पहिली गोष्ट : आपण त्या व्यक्तीशी कसं बोलतो कस वागतो कस आचरण करतो ? त्यावरून तिच्या मनात आपल्या विषयीक प्रेम भावना व आदर निर्माण होत असतो.
व त्याप्रमाणेच तिचं आपल्याशी बोलणं वगैरे होत असतं.
दुसरी गोष्ट : काही वेळा ...वेळे अभावी ...व परिस्थितीच्या कचाट्यात सापडल्यामुळे त्या व्यक्तीला आपणास वेळ देता येत नाही .
भेटता येत नाही ..नि बोलता हि येत नाही . हे खर असत पण ते आपणास खोट वाटू लागत .. ती व्यक्ती जाणून बुजून आपल्याशी अस वागत आहे ह्याच तंद्रीत आपण राहतो . त्यामुळे कधी कधी अस वाटून जात . कि ती व्यक्ती आपणा पासून दुरावत चालली आहे .
तिसरी गोष्ट : आपल इतक प्रेम असत त्या व्यक्तीवर .. कि सतत आपण त्या व्यक्तीचाच रात्रंदिवस विचार करत राहतो तिच्याविना आपणास दुसर काही दिसत नाही किंवा काही सुचतच नाही . अशा वेळी समोरील व्यक्ती जीवन काय आहे , आपल ध्येय काय आहे . .. प्रेमा पलीकडे सुद्धा एक जग आहे . हे दाखवून देण्यासाठी आपणापासून काही अवधीसाठी स्वताहाच्या मनावर दबाव टाकून दूर राहते . आपल्या हितासाठी आपल्या भल्यासाठीच ..!!
बघा माझं म्हणणं पटत का ते तुम्हाला ...
संकेत य पाटेकर २४.०५.२०१२
गुरुवार

गुरुवार, १७ मे, २०१२

प्रेम..पाहायला गेल तर अवघे दोनच शब्द ..

प्रेम
पाहायला गेल तर अवघे दोनच शब्द आहेत हे 'प्रेम' पण त्या शब्दात किती भव्यता आणि विशालता दडलेय .
प्रत्येकजण आप आपल्या आयुष्यात 'प्रेम मिळाव' म्हणून किती धडपडत असतो , तळमळत असतो, रडकुंडीस देखील येतो !! कारण प्रेम हे जीवन आहे . जगण्याची एक शक्ती आहे , प्रेरणा आहे.
जीवनात प्रेम, सर्वांनाच मिळत नाही , सर्वांच्या भाग्यात नसत ते . , कुणी वंचित राहतो आईच्या प्रेमापासून , कुणी वंचित असतो बहिणीच्या मायेपासून तिच्या प्रेमळ सहवासापासून कुणी वंचित राहतो वडलांच्या कठोर पण तितक्याच प्रेमळ छायेपासून कुणी वंचित राहतो भावाच्या खेळकर , खोडकर आणि प्रेमळ सहवासापासून
प्रेम प्रेम प्रेम असत............. सर्वांनाच ते हव असत पण भाग्यात मात्र कुणाच्या असत तर कधी नसत. दु:ख त्याचच तर फार असत ..!!
मनातल काही !!
संकेत पाटेकर

आनंद आनंद आनंद हे आनंद म्हणजे तरी नक्की काय हो ?

आनंद आनंद आनंद हे आनंद म्हणजे तरी नक्की काय हो ?
१) मनाच्या कप्प्यात कुठेतरी कुणासाठी तरी एक जागा असणं..प्रेम असन तसेच समोरच्या व्यक्तीमध्ये सुद्धा तसंच काहीस मिळत जुळत असन अस दिसन आणि ते एकमेकांना समजण म्हणजे आनंद .
२) अचानक अनेक वर्षांनी महिन्यांनी दिवसांनी आपल्या प्रिय व्यक्तीचा किंवा मित्र मैत्रिणीचा फोन आला ...तेंव्हाचा तो क्षण म्हणजे आनंद
३) एखाद्या जिवलग मित्राची- मैत्रिणीची आपल्या नात्यातील व्यक्तीची वर्षानुवर्षा नंतर जी अचानक योगायोगाने म्हणा जी भेट घडते ..तेंव्हाचा तो क्षण म्हणजे आनंद
३) वणवण भटकून अथक परिश्रमाने मिळवलेला तो अन्नाचा एक दाणा म्हणजे आनंद
४) यशाच्या उंच शिखरावर आपण उभे असताना आपल्या आई वडलांच्या डोळ्यातून वाहणारे ते आनंदअश्रू पाहणे म्हणजे आनंद
५)आईच्या मांडीवर आपण कितीही मोठ झालो तरी शांत डोक ठेवून निजण तेंव्हाचा तो आनंद
६) पावसाच्या पहिल्या सरीत आंघोळ करणं तो म्हणजे आनंद
७)२-३ तासाच्या अवघड चढणी नंतर पहिला पाउल जेंव्हा पाहिलं पाउल गडाच्या माथ्यावर पडत तो क्षण म्हणजे आनंद
८) अथक परिश्रमानंतर एखाद्या वस्तूचे पक्षी प्राण्याचे आपल्याला हवा जसा फोटो मिळून जातो त्या समाधानात मिळणारा तो आनंद
अशा आनंदाच्या अनेक व्याख्या देता येतील ...मला इतक्या देता आल्या ....आपणास बघा जमतंय का ..!!
संकेत य पाटेकर
१०.०५.२०१२
मित्रहो
जवळ जवळ १०० पैकी ९० टक्के लोक (त्यात अडाणी आणि सुशिक्षित आणि नेते मंडळी हि) हे घरातून बाहेर पडल्यावर आपल्या जवळ असणारे कागद - बॉटल्स- कचरा रस्त्यावर कुठेही सैरा -वैरा टाकून देतात. आणि तेथील परिसर अस्वच्छ - घाण करून टाकतात. तर मित्रहो कृपया अस करू नका...
!! आपला परिसर स्वच्छ तर आपल आरोग्यही निरोगी !!
एखाद सुंदर स्वच्छ परिसर पाहिल्यावर आपल मन कस टवटवीत आणि प्रफुल्लीत होवून जात.
तर मित्रहो माझी तुम्हाला अशी विनंती आहे कि कृपया इतरत्र अस कचरा कुठेही टाकू नका तो जिथे कचरा पेटी दिसेल तिथेच टाका. आणि आपला परिसर सुंदर - स्वच्छ ठेवा.
मित्रहो तुम्ही म्हणत असाल कि तू आम्हाला सांगतोय तर तू तरी ते करतोस का ?
अमलात आणतोस का ? तर मी हो म्हणेन..
मित्रांनो मी कुठेही जाताना ..तर ते पिकनिक असू देत.
ट्रेकिंग असू देत .. किंवा रस्त्या वर फेर फटका मारताना असू देत ..
मी कुठेही अस कचरा मग तो छोटासा कागद हि असू देत.
कुल्फीची काडी हि असू दे किंवा इतर काही असू दे ..
ते कचरा पेटीतच किंवा घरातल्या कचरा पेटीतच टाकतो .
आणि मित्रांनाही आवर्जून ओरडून - समजावून सांगतो. कि कचरा हा कचरा पेटीतच टाका इतरत्र नाही.
माझे मित्र तर आता कुठे पिकनिकला वगैरे गेल्यावर मला कचऱ्याचा डबा च म्हणतात (मस्करीने हा ) ते मी आनंदाने स्वीकारतो . कारण मला माहित आहे माझ्यामुळे त्यांच्या सवयी मध्ये काहीतरी परिवर्तन होतंय . आणी झालाय सुद्धा ..!
मित्रहो शिस्त हि आपोआप नाही लागत.
ती लावावी लागते. समजावून ..प्रेमाने ..आणि कधी कधी दमदाटिनी सुद्धा ..!
 तर चला मग तुम्ही सुद्धा तयार आहात ना...आपला परिसर स्वच्छ - सुंदर ठेवण्याकरिता..!
आणि हो तुमच्या मित्रांनाही आवर्जून सांगा आणि त्यांच्या मध्येहि हि सवय रुजवा..!
मित्रहो माझ्या वाचनात आलेली एक सुंदर गोष्ट तुम्हाला मी सांगतो...
शिकण्यासारख आहे त्या गोष्टीतून ... एकदा एका आश्रमात गुरु आपल्या शिष्याला बोलावतात.
 अन त्याला एक काम सांगतात.. कि असाच पळत जा पलीकडच्या गावातील लोकांना संध्याकाळच्या भोजनासाठी आपल्या येथे बोलावून आण..
तो मुलगा तसाच पळत सुटतो. आश्रम आणि गावाच्या मध्ये आंब्याच्या अनेक बागा असतात.
वाटेत ते त्याला दिसतात. त्याला ते आंबे खाण्याचा मोह होतो..आजूबाजूलाही कोणीही नसत.
थोडा वेळ थांबतो ..अन स्वतःशीच म्हणतो,'परत येताना बघू' .पहिलं आपल्या गुरुंच काम करू...
त्या गावातील लोकांना तो गुरूंनी सांगितल्या प्रमाणे भोजनच आमंत्रण देतो.. आणि पुन्हा परतीच्या वाटेला लागतो..
वाटेत त्याला पुन्हा त्या आंब्याच्या बागा दिसतात.. तो आजूबाजूला बघतो. कोणी नसत...कसला तरी तो विचार करतो ... आणि सरळ आश्रमाच्या दिशेने निघतो.
गुरु त्याला विचारतात ...अरे काही आंबे वगैरे खाल्ले कि नाही..भरपूर बागा आहेत तिथे..
तो त्यांना सांगतो ...गुरुजी "मला आंबे खायचा मोह तर झालेलाच...
आजूबाजूलाही कोणीही न्हवत.
 कोणीही नसताना परवानगीशिवाय ते काढण म्हणजेच ती चोरी ठरली असती मला कोणी पाहत नसलं तरी मी स्वतःला पाहत होतो .."आपण दुसर्यांना फसवू शकतो. पण आपण स्वतःलाच कधीच नाही फसवू शकत."
त्याचे ते बोल एकूण गुरु त्याला म्हणतात ..."आता तू माझा खरा शिष्य वाटतोय"
मित्रांनो .कोणतेही काम करताना ते मन ..लावून ..नीट ..छान कराव ..
मी एका ठिकाणी माझा घड्याळ .नवीन सेल टाकण्याकरिता दिला होता.
 त्याने तो घड्याळाच पूर्ण ..त्याची coil कट करून .जुना कुठला तरी सेल टाकून ...मला दिला . ..
तो घरी जायाच्या अगोदरच .बंद पडला .. दुसर्या दिवशी त्याच्याकडे गेलो .तर त्याने सर्वीसिंग करायला लागेल .असे सांगिलते.
काल एका दुसर्या घड्याळवाल्याकडे गेलो होतो.
त्याने मला सांगितले. कि घड्याळातील coil कट केली आहे. अन सेल हि पुरा डाउन झालेला टाकलेला आहे.
मित्रहो,
 कोणतेही काम असू द्या ते चांगलच करा... ग्राहकांना उत्त्तामात्तम सेवा द्या ...
तरच तुमच्या कामाची प्रशांशा होईल...अन तुमचा Business देखील वाढीस लागेल... 
नाहीतर...तुमच्या कडे कोणी फिरकणार देखील नाही. 
! चांगल काम करणाऱ्या कडे कामाची काहीच कमी नसते. !
मित्रहो आपल्यात जितके गुण असतात ..तितके दोषही असतात.
आपण जे काही बोलतो ..जसे वर्तन करतो ...त्यानुसार आपल्यातील गुण दोष इतरांना दिसत असतात. प्रत्तेक सामान्य माणसामध्ये असामान्यत्वपणा कुठेतरी दडलेला असतो.

फक्त आपल्याला ते आपल्यातील असामान्यत्वपण ओळखता..शोधता आला पाहिजे.
 आपल्यातील दोष चुका ...जसे इतरांना न सांगता कळतात.
तसे आपल्यातील गुण देखील कुणाला न सांगता ते आपल्या मेहनतीने ..आपल्यातील कौशल्याने त्यांना कळले पाहिजे. इतरांनी ते अनुभवले पाहिजे स्वताहून स्वताहाच गुण ...महत्व इतरांना सांगणे ह्याला काहीच अर्थ नाही .
संकेत य पाटेकर
मित्रहो,
मागील वर्षी म्हणजेच डिसेंबर २०१० रोजी ठाण्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलन भरविण्यात आल होत. ते ३ दिवस सतत होत. आणि ते ३ दिवस मी तेथे उपस्थित होतो.
ते तीन दिवस मी कधीच विसरू शकणार नाही . त्या तीन दिवसात मला अनेक मान्यवर लेखकांना , नेत्यांना प्रत्यक्ष अगदी जवळून पाहता आल. त्यांचे विचार ऐकता आले.

त्यात प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर ...विश्वास राव पाटील ...प्रवीण दवणे व अशोक बागवे याचं कवी संम्मेलन...तसेच अनेक मान्यवरांच भाषण प्रत्यक्ष ऐकता आले.
त्यातील न विसरणार म्हणजे जगदीश खेबुडकर यांची पानिपत लेखक विश्वासराव पाटील यांनी घेतलेली त्यांची ती मुलाखत काय दाद दिली होती प्रेक्षकांनी त्याच्या त्या मुलाखतीला १ तासाच वेळ होता मुलाखतीचा पण २ अडीच तास झाले तरी ...कोणीही प्रेक्षक आसनावरून उठण्यास तयार होईनात ...
त्यांचा एक एक शब्द कानात गुंजत होता ..त्याच्या एक एक शब्द लोक जीव लावून मनाच्या एकाग्रतेने ऐकत होते...मी सुद्धा
त्याचं एक वाक्य सांगतो ...जे मुलाखतीच्या शेवटी त्यांनी सांगितल.

कोणतेही काम करा ..पण ते निष्ठेने ..प्रामाणिकपणे फलाची कसलीही अपेक्षा न ठेवता.
प्रसिद्धीसाठी काम करू नये. 
आज ते नाही आहेत परंतु त्यांच्या सुंदर गीतांचा साठा आपल्यासोबत आहे. 
मी खूप भाग्यवान आहे अशा महान व्यक्तीची मुलाखत मला प्रत्यक्ष ऐकता आली पाहता आली...

मित्रहो ,
जीवनात प्रत्त्येकाच्या वाटा, मार्ग हे वेगवेगळे असतात
जो तो आपआपल्या वाटेने मार्गीक्रमण करत असतो .चालत असतो .
पुढे जिथे काही वाटा एकत्र मिळतात...त्या वाटेवर आपणास बरेच प्रेमळ मित्र....लोक भेटतात..त्यांच्या सहवासात आपण राहतो..रमतो..बागडतो...प्रेममई होवून जातो. प्रेम देतो प्रेम घेतो...
अन पुन्हा आपल्या त्या खडसर वाटेने पुढे पुढे एकट चालत राहतो..
सोबत मग पुढे कोणीच नसत...फक्त आपल्या प्रिय जणांचा आशीर्वाद, शुभेच्या, प्रेम..आपल्या सोबत असत.
अन तेच आपल्याला पुढे उपयोगी पडत. आपल्या वाटेत आलेल्या अडचणींवर मात करत.

तेंव्हा मित्रहो, प्रेम करा, आपल्या प्रिय जणांचा आशीर्वाद घ्या. शक्यतो कुणाच मन दुखवू नका
अन स्वतःच सुद्धा मन दुखी करून घेवू नका.
- संकेत य. पाटेकर

मित्रहो आज रक्षाबंधन! 
भावा बहिणीच्या प्रेमळ अतूट अस नात सांगणार हा सण....!

रक्षाबंधन म्हणजे स्त्रीकडे पाहण्याच्या दृष्टीत बदल. रक्षाबंधन म्हणे केवळ आपल्याच बहिणीच्या नव्हे, तर समाजातील सर्व स्त्रियांच्या रक्षणाची जबाबदारी. रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या उदात्त, पवित्र प्रेमाचा अखंड वाहणारा झरा ही भावना लक्षात ठेवली पाहिजे. 

मित्रहो रस्त्याने जाता येता आपण पाहताच असणार ..काही वाईट प्रवृत्तीची माणस...एखादी मुलगी ...जात असल्यास मुद्दाम तिची छेडछाड काढतात ...मुद्दाम धक्का देतात...! 

घरात आई - बहिण असून सुद्धा असे वागतात हे लोक....!
एखादी मुलगी रस्त्याने जात असेल तर ती कुणाची तरी बहिण आहे. 
हे लक्षात असू देत. जस आपल्या बहिणीची आपण काळजी घेतो...तसं इतरांच्या बाबतीत हि घ्या ..!!

छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात त्या वेळी अस कुणी छेड छाड करताना आढळ्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जात ....हाथ पाय तोडले जात. ..!!

आता मात्र आपल्या राज्यात .......अस कडक शासन नाही . त्यामुळे प्रत्त्येक स्त्रीने स्वतःचीच काळजी घ्यावी. जो कोणी असा माणूस आढळा तर त्याला दो-चार थोबाडीत द्यावेत. 
अन पोलिसांच्या हवाली करावे.

!! रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या...!!

आज आपण सारे भ्रष्टाचारा विर्रुद्ध लढत आहोत.
देशातला हा भ्रस्टाचार मुळापासून नष्ट झालाच पाहिजे..अन ...तो होईलच
कारण ह्या देशातला प्रत्त्येक तरुण भ्रस्टाचार विर्रुद्ध आज पुढे आले आहेत..

मित्रहो, माझ एक सांगण आहे तुम्हाला ? ऐकाल ना..जरूर ऐकाल ....खात्री आहे

मित्रहो,
घरात - हॉटेल मध्ये कुठेही जेवत असताना........!!
तांटातल अन्न तसाच टाकून देऊ नका. हव तेवढाच घ्या पाहिजे तितकाच घ्या. पण अन्नाची अशी नासाडी करून नका. ..
अन्नाच्या त्या एक एक कणासाठी काही गरीब लोक तडफडत असतात. हे लक्षात असू द्यात.

पाण्याचहि तसाच आहे.
उपयोग नसताना ..काहीजण नळ तसाच चालू ठेवतात.
पाण्याच ते भांड वाहून जात वाहून जात . तरी त्याकडे कोणी लक्ष देत नाहीत.
हा मात्र ज्यावेळेस पाणी कपात असते ....दोन-दोन दिवस पाणी घरात येत नाही.
त्यावेळेस मात्र सर्वांना पाण्याची किंम्मत कळते. मित्रहो अस होता कामा नये.

विजेचेही तसेच आहे मित्रहो,
आपल्याला हव असेल तेंव्हाच आणि तितकाच विजेचा वापर करा.

मित्रहो आपल्याजवळील गोष्टींचा आवकशक्तेनुसार व्यवस्थित उपयोग करावयास शिकलं पाहिजे.
आपण जीवन जगत असतना इतरांचांही विचार करावयास शिकलं पाहिजे.
हि सुद्धा एक देश सेवाच आहे .!!
!! धन्यवाद !!
 ·  ·  · 17 August 2011 at 16:37

मित्रहो,
जीवनात यश मिळवायचं असेल तर प्रथम स्वताहाला शिस्तबद्ध होता आल पाहिजे.
स्वतःच स्वताहाला नियम बद्ध केले पाहिजे.
नियमाचे साखळदंड आपल्याभोवती गुंडाळता आले पाहिजे
तरच ते यश आपल्याला गाठता येईल. नाहीतर आहेच त्या जागेवर फिरत राहायला लागेल.
 ·  ·  · 16 August 2011 at 14:38