बुधवार, २६ जून, २०१३

तिचं अस्तित्व ...


एक छोटासा प्रयत्न ....पुन्हा एकदा ...माझ्या लेखणीतून ..
तिचं अस्तित्व....
ट्रिंग ट्रिंग ट्रिंग .........
मोबाईलची रिंग वाजत होती. त्या रिंग ने, ' तिची नजर डेस्क वर असलेल्या आपल्या मोबाईल कडे वळली. आलेला कॉल हा त्याचाच आहे हे कळल्यावर , ती स्वतहा:शीच पुटपुटली- हा पुन्हा पुन्हा का कॉल करतोय ? सांगितले ना एकदा नाही जमणार म्हणून.. पुन्हा पुन्हा तोच प्रश्न ...का त्रास देतोय हा ?
डोक्यावर आपले दोन्ही हात कवटाळून ती स्वताहाच्या नशिबाला दोष देत होती .
 ऑफिस मध्ये हि घरातले छोटे मोठे वाद तिला स्वस्त बसू देत न्हवते. त्यामुळे ऑफिसातल्या कामात हि लक्ष लागेनासे झालं होतं विचारांच्या साखळीत तीच मन गुरफटून जात होत.
दोन वर्ष होवून गेली लग्नाला , पण ह्या दोन वर्षात स्वतःसाठी देखील कधी वेळ मिळाला नाही , मानसिक सुख म्हणावं तर नाहीच. त्यात धावपळ ..हा आजारपण कंटाळले मी ह्या जीवनाला..
नकोस वाटतंय आता ....काहीच...
का कुणास ठाऊक लग्न केलं.
खंर तर लग्न लग्न करायचं अस मनात सुद्धा न्हवत, पण मुलीची जात ना, न करून कस चालेल ?
लग्न केलेच पाहिजे,अडकले ह्या बेडीत ..तुरुंगवास नुसता .
जवळच्याच एका मित्र परिवारातील एकाने मागणी घातली होती.
 एका कार्यक्रम दरम्यान त्याने मला पाहिलं होत. तितकंच, ' त्याला मी आवडले , तिथपासून भेटीसाठी काही ना काही निमित्त साधून तो आवर्जून येत असे , भेटत असे .
मला तो पसंद होता असे मूळीच न्हवतं .
खंर तर लग्न हा विषयच मला नको हवा होता . मुलगी असून सुद्धा एक मुलगा म्हणून मला माझ्या आई - बाबांच्या सोबत रहायचं होत कायमच . त्यांच्या सेवेत हे जीवन व्यतीत करायचं होत .
आम्हां पाच बहिणींना इतके वर्ष त्यांनी काबाड कष्ट करून ,जीवाचं रान करून आम्हाला शिकून सावरून लहानाचं मोठ केलं, चांगले संस्कार दिले.आणि आता त्यांच्या ओसरत्या वयात अशा आजरपणात मी त्यांना सोडून दुसर्यांच्या घरी जावू ? असे विचार मला नेहमीच गुरफटून ठेवायचे.
मला हे योग्य वाटत न्हवत . पण वाटून न वाटून उपयोग तो काय ?
मी एक मुलगी , आणि मुलींच्या वाटेला हे यायचंच.
कितीसा काळ असतो तो , आई बाबांस सोबत घालवलेला , भुर्रकन उडून देखील जातो. कधी, कसे लहानसे मोठे होतो हे हि कळत नाही. आई -बाबांचा प्रेम , आपल्या बद्दलची त्यांची काळजी , त्याचे प्रेमळ शब्दगुच्छ . त्यांचा मम्त्वेचा स्पर्श ............त्याचा सहवास............. सगळ कस ..........
तेवढ्यात पुन्हा फोन खणाणतो :- ट्रिंग ट्रिंग ट्रिंग
त्या रिंग ने त्या विचारांची संपूर्ण घडीच कोसळते, ती त्या तंद्रीतून बाहेर पडते .
 डेस्क वर ठेवलेल्या मोबाईल कडे तिचं लक्ष जात .
पुन्हा त्याचाच कॉल ...क्षणभर ती काहीसा विचार करते ...आणि तो कॉल रिसीव्ह करते .
HELLO HELLO.... बोल ....
-------------------------------------------------------------------------------------------------------------
मनाचा अस्वस्थपणा माणसाला कधी स्वस्थ बसू देत नाही .
त्याच्याशी बोलण झाल्यावर ती पुन्हा तिच्या ऑफिस च्या कामाला लागली.
मनात मात्र तो विषय चघलतच होता. पण तरी हि दिलेलं काम तिला सायंकाळ पर्यंत पूर्ण करायचंच होत. त्यासाठी तो विषय तिने सध्या तरी डोक्यातून बाजूला सारायचे ठरवलं . नि पटपट दिलेल्या कामास जुंपली .
सायंकाळचे ७:०० वाजले होते . दिलेलं काम वेळेत पूर्ण करून ती ऑफिस मधून निघू लागली .
तेवढ्यात मोबाईलची रिंग लागली . त्याचाच call होता , तिने रिसीव्ह केला.\

Hello बोल ..
अ .. मी आता निघतोय ऑफिस मधून , लवकर ये , वेळेत ? त्याने फार काही न बोलता फोन ठेवून हि दिला.
मनातल्या अस्वस्थेचे भावनिक चित्र आता तिच्या चेहऱ्यावर उमटू लागले होते. सकाळपासून त्याचे किती कॉल , दुपारचा तो एक कॉल वगळता मी एकही कॉल त्याचा रिसीव्ह केला न्हवता.
बाहेर जायचं म्हणतोय ? मनाशीच काहीतरी पुटपुटल्यासारख तिन केल . त्याला मी कालच म्हणाले होते, मी उद्या आई कडे जाणार आहे . तरी हि बाहेर जायचं आहे , बाहेर जायचं आहे ? कुठे जाणार आहे ते हि धड सांगत नाही .
कित्येक दिवस झाले आईकडे जाईन म्हणते, पण हल्ली वेळ मिळतोय कुठे ? सकाळी लवकर उठून सर्वांच्या आवडी निवडीचा विचार करून केलेला डबा घेऊन, बाकी इतर गोष्टी पटापटा आटपून धावत पळतच ऑफिस गाठायचं आणि संध्याकाळी उशिरा पुन्हा घरी गेल्यावर पुन्हा त्यातच जुपायचं , धुणी भांडी , कपडे , जेवण करता करताच घड्याळाचे काटे कधी १२ वर स्थिरावतात तेच कळत नाही . रात्री उशिरा झोपायचं नि पहाटे पुनः लवकर उठायचं . हेच नित्य क्रम ठरलेलं...
स्वतःच्या आवडी निवडी पूर्ण करायला ,स्वतःच स्वास्थ्य जपायला इथे सवड नाही. तिथे इतरांच्या माझ्याकडून असलेल्या अपेक्षा मी काय पूर्ण करणार ? म्हणूनच आता मी इतर बंधन, नाती गोती ह्या पासून दूरच राहायचं ठरवल आहे. बस्स सध्या तरी काही नकोच .....
ऑफिस मधून ती केव्हाच बाहेर पडली होती ...रस्त्याने चालता चालता हि तिच्या विचारांची गती काही कमी होत न्हवती. विचारांच्या ह्या सोबतीमुळे कधी ती त्या स्थळी पोहोचली ते तिलाच कळल नाही. तेवढ्यात समोरच उभ्या असलेल्या आपल्या नवऱ्या कडे तिचं लक्ष गेल. दोघांची नजर भेट झाली. ती काही बोलली नाही. तो मात्र लगेच बाईक ला किक मारून तयारीत राहिला. ती बाईक वर आसनस्थ झाली. आणि बाईक आणि ते दोघे असा प्रवास सुरु झाला .
------------------------------------------------------------------------------------------------------------
ठरवून सुद्धा काही गोष्टी मना सारख्या होत नाही .तेंव्हा खरच खूप मनस्ताप होतो .केली गेलेली सर्व तयारी, मेहनत त्या क्षणी तरी वाया जाते . आज हे करावं अस मनी ठरवावं , आणि त्याच्या नेमकच उलट विपरीत अस काही घडावं , दुसरं काहीतरी काम निघावं , असच काहीतरी घडतं राहत .
ह्या नियतीचा खेळ देखील अजब असतो आणि ती हा खेळ खेळण्यास नेहमीच तत्पर असते. कधी कुठे , कसे फासे टाकावे, ते तिला चांगलच ठाऊक असतं अन त्यातूनच ती आपल्या प्रसंगी मनाचा वेध घेत असते.
स्वतःला आपण ह्या कडवट जीवन खेळी मधून कसे सावरतो ह्याकडेच तीच कटाक्षान लक्ष लागलेलं असत. आणि त्यावरूनच ती त्या व्यक्तीच्या सहनशिलतेचा,तिच्या जिद्दीचा , तिच्या प्रसंगी मनाचा वेध घेत राहते.
रात्रीचे २ वाजून गेले होते. तीनच्या च्या आसपास तास काटा हळू हळू आगेकूच करत होता. तरी हि तिचं मन काही स्वस्थ बसेना , मनाची तगमग चालूच होती. झोप काही लागत न्हवती. रात्री उशिरा घरी परतल्यावर , सासू आणि तिच्या मध्ये पुन्हा एकदा वाद झाला होता . नेहमीच होतो , होत राहतो , शुल्लक-शुल्लक कारणावरून ...
पण आज वादाचा अवाका जरा जास्तच मोठा होता. आणि त्या विचारांनीच तिला पछाडून सोडले होते .
रात्रभर मनाची ती तळमळ , ते असंख्य विचार , तिला झोप काही लागलीच न्हवती , सकाळी पुनः लवकर उठून सर्व काही आवरता घेत ती पुनः कामावर निघू लागली . मनात एक निश्चय करून ...आज नक्की घरी जाईन .........आई कडे .
------------------------------------------------------------------------------------------------------------
इमारतीतले एक एक मजले - एक एक पायऱ्या सप सप चढत ती दारी - वऱ्हांड्यात पोहोचली. दार अर्ध उघडंच होत .थोड आत सारलं ..
Hiii ...मम्मा ..
कशी आहेस ग ? घरात पाऊल टाकताच क्षणी , आईला पाहून ती म्हणाली. मी बरी आहे, ये बैस
माझं काय, आहे रोजचंच , काढतेय दिवस आपला ..आजार काय पिच्छा सोडत नाही. कामं हि हल्ली होत नाही पण तरी हि करते , करत असते बसायची सवय नाही ना , काही ना काही करत राहील कि बर वाटत बघ ..
प्यायला पाणी आणू ...? तिला पाहून त्या म्हणाल्या. नको , थांब मी घेते , आईला उगाच त्रास नको म्हणून ती स्वतः उठून स्वयंपाक गृहात जाते. अन थोड्या वेळेत पुन्हा आई शेजारी येउन बसते .
बोल , काय चाललंय ? कानावर आल्यात काही गोष्टी माझ्या ? एकवार तिच्याकडे पाहत अन पुन्हा हातातले काम करत , त्या तिला म्हणाल्या .
मम्मा , कंटालळे ग ..
का लग्न केलंत माझं ? काय बिघडल असत का ?
आईनी तिच्याकडे एकवार पाहिलं, ती कुठल्याश्या विचारात मग्न होती अन भरभर बोलत होती.
एक क्षण हि आराम नाही ग , मानसिक शांतता नाही ....... कांटाळले ग मम्मा , खरच खूप कंटालळे , मनातल्या भावनांना ती एक मोकळी वाट करून देत होती. ..
आई हि एकमेव अशी छाया असते , जी आपल्या मुलांच्या सुख दुखाच्या प्रत्येक क्षणी सोबत करते .
आपल्याला समजून घेण्यापासून ते आपल्याला समज देण्यापर्यंत ती नेहमीच पुढाकार घेत असते . त्यामुळे निशंक पणाने आईकडे मन हलकं करतां येत .
ती हि आपल मन हलक करत होती.... मनातल बोलत होती . आई मात्र तिच्या बोलण्याने धीर गंभीर होत होत्या , त्यांच्या मन आता त्यांना स्वस्थ बसू देत न्हवत ,
लाडीगोडीने, प्रेमाने , वाढवलेल्या, आपल्या ह्या मुलीच्या वाटेला काय आलाय हे ,ह्या हे विचारांनी , तिच्या काळजीने ते कष्टी होत होत्या .
इतके चांगले एक एक स्थळ येत होती पण तिने ते नाकारली , म्हणायची , मला लग्नच नाही करायचं , मला तुमच्या सोबतच राहायचं आहे . हट्टी नि तापट स्वभाव थोडा , घेतला रोष ओढवून सर्वांचा , बरेच दिवस तिच्याशी कुणी काही बोलत न्हवते , पण काही एक महिन्यानंतर कशी बशी राजी झाली स्वताहून लग्नासाठी .., पण लग्ना साठी तिने जो वर वरला तो काय विचार करून देव जाणे , सुरवातीचे लग्ना नंतरचे काही दिवस आनंदित होते, पण पुढे मात्र जस जसे दिवस पुढे जावू लागले , तस तसे आनंद तिच्या जीवनातून विरघळू लागला . त्याच अस्तित्वच जणू नाहीस झालं.
रोज रोज घरात वाद वाढू लागले . त्यात एकदा त्याने (तिच्या नवरयाने )तिच्यावर हात हि उचलला होता. आजवर आम्ही कधी आमच्या मुलीवर हात उगारला नाही . पण त्याने कहरच केला . कधी तिला घर सोडून जा म्हणून सांगतो , तर कधी काय तर कधी काय ..........कस होणार ह्या पोरीच .
आपल्या आईच्या चेहरयावरील प्रश्नार्थी काळजीयुक्त भाव पाहून क्षणभर ती थांबली , आपल बोलन तीन थांबवलं .
थोडावेळ ती तशीच शांत राहिली . अन एकाकी बाजूला ठेवलेली पर्स आपल्या हाती घेतली . नि येते ग आई , अस म्हणून निघू लागली .
अग थांब , काहीतरी खाऊन जा ? चपाती भाजी ? चहा ठेवते ......
नको आई , घरी जेवण बनवायच आहे अजून ..बरीच कामे आहेत , निघायला हव . अस म्हणत , आईचा चरण स्पर्श करून , आशीर्वाद घेऊन ती निघू लागली ......भरभर भरभर.. घराचा व्हरांडा ओलांडत ...
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
सहवास हा काही क्षणाचाहि का असेना ...पण तो नेहमीच हवासा वाटतो.
जर ती व्यक्ती आपली जिवाभावाची - जिवलग असेल तर ,त्यांच्या सहवासात घालावंलेले , त्यांच्या सहवासातले ते काही क्षण हि मनाला उत्तुंग आनंद देऊन जातात खरच ...
आज किती दिवसाने आईला भेटले ..खरच खूप बर वाटलं. मनाला ताजेपणाचा स्पर्शच झाला जणू ! असे हे क्षण सोडले तर बाकी मात्र मनाला पार खचून टाकतात. अगदी गुदमरून टाकतात हे क्षण ..
आईकडून ती थेट.... घरी निघून आली होती . माहेर नि सासर काही हाकेच्या अंतरावरच .अवघ्या १०-१५ मिनिटाचं पण तरीही आईकडे जाण्यचा योग हा क़्वचित कधी येतो .असो आपल्या नशिबीच हे लिहल आहे. काय करणार , स्वतःच्या मनाशी कुजबूज करत, चालत चालत ती कधी घरा शेजारी पोहचली . ते तिलाच कळल नाही.
गेट शेजारीच सासूबाई कुणाशीतरी फोन वर बोलत उभ्या होत्या .त्यांना पाहून तीचि पाउलं जरा अडखळली . पण काही न बोलता पाउलं पुढे टाकत ती तशीच आत शिरली .
घरात आल्यावर मात्र नेहमी प्रमाणे कामाचा ढीग पसरला होता. भांडी - कपडे होतेच , पुन्हा त्यात जेवण हि , ते हि नवऱ्याच्या आणि सासूच्या आवडी निवडी नुसार बनवायचं .
मी हि घरात आहे , माझ्या हि काही आवडी निवडी आहेत . मला काही हवंय नकोय ह्याच मात्र कुणाला देण घेण नाही . सून हि आपल्या मुलीसारखीच असते . आपल घरदार सोडून सासरी येताना ,सासरी तिला स्वतंत्रपणे वावरायला , मुक्तपणे बोलायला घरातली मंडळी तशी स्वतंत्र मनाची हवी असतात . समजून घेणारी - समजावून सांगणारी हवी असतात .
पण माझ्या नशिबी कुठे आलंय ते ....
- क्रमश :-

शनिवार, १८ मे, २०१३

दुभंगलेली मन...


दुभंगलेली मन एकत्रित करताना ..आपल्या मनाचा हि त्यात विचार करावा लागतो . सहज जुळलेल , अन जवळीक साधलेल एखादं नातं काही काळानंतर हळूच दूर होत जात.
माणसाची मन जशी एकत्रित येतात तशीच ती दूर हि होतात. त्या मागच कारण शोधायला गेल्यास , एक मात्र कळत.
आपण त्यांच्याप्रमाणे वागत नाही , त्याचं मन राखत नाही . काही ना काही कुठेतरी त्यांच्या मनाला छेदून आपण पुढे जात असतो . ते त्यांच्या मनाला पटेनास होत .
सुरवातीला जीव लावणारी , भरभरून प्रेमाचा वर्षाव करणारी व्यक्ती पुढे मात्र काळा ओघाने आपली साधी विचारपूस करणं हि सोडून देते. तेंव्हा उगाच वाटत .
माणसाच्या मनाचा काहीच भरवंसा नाही , ते कधी हि बदलू शकत . परिस्थितीनुसार नि वेळेनुसार, त्यात बदल हा घडत राहतो . तेंव्हा आहे ते स्वीकारायचं हेच हाती रहात. तरीही मन मात्र प्रश्नाच्या अनेक गुंत्यात स्वतःला झोकून देत . आणि त्याचा त्रास काहीसा होत जातो .
काही प्रश्नांची उत्तर मिळतात ती सहज सोडवता हि येतात . पण काही प्रश्न निरुत्तरच राहतात .
मनातलं काही
संकेत पाटेकर

मनातलं काही ...- भाग २


माणसाच्या गर्दीला हि माणूस कधी  कंटाळतो , नकोसं वाटतं  सार त्याला ,
कोणाची जवळीक नि प्रेमं  हि ...मायेचा स्पर्श हि , नको हवी असते स्तुती , नि कौतुकाची थाप हि ...
मनं  मात्र त्याचं, असलेल्या जागेपासून दूर कोसा पर्यंत फडफडत घेऊन जातं.
अन जिथे ते थांबतं. तिथे असतो  निसर्गाचा अद्भुत चमत्कार , अलंकारित  सौंदर्य,  एक वेगळं विश्व ...
महत्वाचं  म्हणजे त्याला हवा असलेला एकांत ......
रोज त्याचं  त्याचं जीवनापासून कुठेतरी दूर जावं  जिथे आपल्याशिवाय कुणीच नाही .
अस प्रत्येक मनाला कधी ना कधी वाटतं .  आणि आपलं  मनं  तिथ पर्यंत आपल्याला घेऊन हि जातं ......
कधी कल्पनाच्या दुनियेतून .. निळ्याशार तरंगमय सौम्य लहरीत, शांत निरागस, चमचमत्या काळोख्या रात्री ..हळूच..त्या तरुतून ...... तर कधी प्रत्यक्ष, वर्तमानातून ...
हवा असतो तो फक्त एकांत ....................
स्वतःसाठी , स्वतःच्या गतीसाठी ..
संकेत य पाटेकर
 १४.०५.२०१३
____________________________________

आयुष्याची व्याख्या  सहज अन साध्या शब्दात देता येते पण तेच आयुष्य त्या व्याख्या नुसार जगणं फारच कठीण असतं . आणि ते फारच कमी लोकांना जमतं.
- संकेत
____________________________________
नात्यातला जवळीकता साधणारा दुवा म्हणजे संवाद.
-संकेत
____________________________________
स्व:ताहाच्या मनावर ताबा मिळविणे हि एक सर्वात मोठी आणि तितकीच अवघड गोष्ट.
-संकेत
____________________________________
दु:खाला सोबती नाही , कुणी त्याचं  भागीदार हि नाही .......ते स्व:ताहाच स्व:ताहालाच पचवावं लागतं ..पेलावं  लागतं.
-संकेत
____________________________________
जोपर्यंत आपले विचार आपण समोरील व्यक्तीला पटवून देत नाही .....तोपर्यंत समोरील व्यक्तीचं  आपल्याबद्दलच मत हे ''आपण दोषी'' असल्यासारख असतं .
-संकेत
____________________________________
आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर जागो जागी खड्डे ...असतातच.
तिथे आपण ठेच लागून कधी ना कधी पडणारचं  ............पण पडल्याच दु:ख आपणास नसतं  काही .. दु:ख असत ते अशा वेळी सोबत कुणी नसतं  त्याचंच ....
आयुष्य हे अस धडपडतचं  जगावं लागतं  ....स्व: ताहाला सावरतं...
-संकेत
____________________________________
जीवन म्हणजे असंख्य धाग्यांचा एक गुंता...न सुटणारा ..आणि ते असंख्य धागे म्हणजे आपण , हि नाती हे बंधनं आणि सभोवतालची परिस्थिती .
-संकेत
____________________________________
एखाद्या जिवाभावाच्या व्यक्तीच्या नजरेतून आपण पार उतरलो तर पुढे पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण करणं फार कठीण जातं.
-संकेत
____________________________________
ज्यांच्यावर आपण मनापासून प्रेमं  करावं  ते दूर निघून जातात. आणि जे आपल्यावर मनापसून प्रेमं  करतात त्यांच्यापासून आपण दूर निघून जातो .
उरतं  ते काय ते फक्त एकटेपणा आणि एकाकीपण ....
येती माणसं जाती माणसं
लावी जीवाला घोर
प्रेमाजे बीज पेरुनी
होती सारे दूर...
-संकेत
____________________________________
दुराव्यात देखील गोडवा असतो ...पण तो केंव्हा ज्यावेळेस दोघांमध्ये थोड्या प्रमाणात  तरी एकमेकांविषयी प्रेम भावना शिल्लक असते.
-संकेत
____________________________________
दुखाला अंत नसतो ............. सुखही क्षणाचेच सोबती असतात ...!!
-संकेत , मे १७ , २०१२
____________________________________
आयुष्याच्या वाटेवर , वळणावळणावर आपल्यास अनेक माणसे भेटतात , त्यातील काही आपल्या सोबत चालत राहतात तर काही मागेच राहतात पण म्हणून आपण मागे असलेल्यांना कधी विसरायचं नसतं.
-संकेत
____________________________________
आपल्यातले ''कला- गुण'' जोपर्यंत आपण लोकांना (आपल्या कामातून असो वा आपल्या विचार शैलीतून) ते दाखवत नाही तोपर्यंत त्यांना आपले महत्व कळत नाही.
-संकेत
____________________________________
कोणत्याही नात्यातलं दुराव्याचं  मूळ कारण म्हणजे आपल्या अपेक्षाप्रमाणे त्या व्यक्तीने तसं न वागण   ...!! (माणूस हा स्वार्थी असतो)
-संकेत
____________________________________
आवडत्या व्यक्तीचा सहवास आणि प्रेमं  मिळाल्यास ........चेहर्यामागच दु:ख क्षणात नाहीसं  होतं .
पण तोच सहवास ते प्रेम कुठेतरी कमी होत आहे ....लुप्त होत आहे असं जाणवू  लागल्यास त्या अनमोल नात्यातलं अंतर हळू हळू वाढीस लागतं. आणि मग माणसं दुरावतात ...एकमेकांपासून ....!
-संकेत , मे १७ , २०१२
____________________________________
नातं कितीही घट्ट असलं तरी .......त्यामध्ये थोडी स्पेस (SPACE )हि असावीच लागते , अन्यथा शंका-कुशंका ने एक अमूल्य नात्यात तुटातुट होऊ शकते.
-संकेत
____________________________________
प्रत्त्येकाला स्वातंत्र आहे मुक्तपणे हे जीवन जगण्याचा , जीवनाचा पुरे पूर आनंद लुटण्याचा .
असं  आपण म्हणत असलो  तरी , तसं नसतं  , कारण नात्याच्या बंधनात प्रत्त्येकजण अडकलेला असतो. काय बरोबर ना मित्रहो , तुम्हाला काय वाटत माझ्या ह्या विधानाबद्दल ???
____________________________________
योग्य काय आणि अयोग्य काय ? हे माहित असून सुद्धा आपण काहीच कृती करत नाही.
ह्याचाच अर्थ आपल्याला योग्य तो निर्णय घेता येत नाही.
-संकेत
____________________________________
प्रेमाने बोला, प्रेमाने वागा .......तर समोरची व्यक्ती तुमच्याशी प्रेमाने बोलेल ,प्रेमाने वागेल.
-संकेत
____________________________________
आपल्या प्रिय व्यक्तींचं बोलनं सुद्धा...कधी कधी मनावर खूप वार करून जातं.
खर तर असं बोलनं आपल्याला त्यांच्याकडून अपेक्षित नसतं . पण त्यांची ती परिस्थिती अन आलेली ती वेळ '' त्यांच्या कडून अस नकळत वदवून घेते , पण त्याचा '' त्या बोलण्याचा . त्या शब्दांचा परिणाम आपल्यावर नक्कीच होतो. अन आपलं मनं  दुखावलं जातं हे खरं...
-संकेत
____________________________________
प्रेम असं करावं  कि मेल्यावरही .....आपल्यावरील प्रेमामुळे हि धरती अनेकांच्या आसवांनी न्हावून निघेल.  -संकेत
____________________________________
जाता येता माणसांचे चेहरे पहां , निरखून बघा, बरेच काही लपलं असतं  त्या चेहर्यात .....
जे आपल्याला बरंच काही सांगून जातं  ,शिकवून जातं ..जीवनाचं सार त्यात कुठेतर लपलेलं असत.
- संकेत
____________________________________
काही गोष्टी ह्या स्वीकाराव्याच लागतात . त्याला पर्याय हा नसतोच ......!!
- संकेत
____________________________________

प्रत्त्येकाचं  जीवन वेगळ असतं  , प्रत्त्येकालाच दु:ख असतं,
काही लोक मनातले दुख चेहर्यावर आणत नाही,
पण काहींच्या चेहर्यावरूनच मात्र ते सार दिसत असतं .
दुख हे सार्यांनाच आहे,
तरीही मनं  हे आपलं  म्हणत " काश तुझ्या सारखं  जीवन असतं '' तर  फार बरं  झालं  असतं .
पण ज्याचं त्याचं  दुख ज्याला त्यालाच कळतं.
संकेत
____________________________________
जोपर्यंत जबाबदारीचं ओझं   आपल्या  खांद्यावर पडत  नाही.
तोपर्यंत  खऱ्या  जीवनाला  सुरवात  नाही.
जीवन  हे  अनेक  गुंतागुंतीच ,अनेक  शंकां कुशांकांनी , संकटांनी  भरलेलं आहे.
तो गुंता ती संकट सोडविण्याची  कसब  ज्याच्या  जवळ ....तो  जीवन  जगायला  शिकला  अस  समजावं.
- संकेत
___________________________________
मनं स्वतंत्र असलं  तरी ...त्याला  तुरुंगवास  हा  भोगावाच लागतो.
नात्यांच्या गुंफण,  हे बंधन हेच  काय त्याचं  तुरुंगवास...
इथे जामीन नसतो  इथे असते फक्त  शिक्षा जन्म  ठेपेची  '' प्रेमाने  जगायची ,जगविण्याची '
निखळ  ,निर्मळ  प्रेमाने  जीवन आनंदमय करण्याची  ..
- संकेत
___________________________________
चांगले विचार मनात असून सुद्धा उपयोग नाही जोपर्यंत आपण ते प्रत्यक्ष विचार कृतीत उतरवत नाही.
संकेत य. पाटेकर
___________________________________
आपलं  मनं हे  कितीही शुद्ध, निर्मळ, स्वच्छ, प्रामाणिक, सदाचारी असो , आपला चेहरा कधी कधी आपल्याला फसवतो, अडकवतो कुठल्यातरी संकटात.
संकेत य पाटेकर
___________________________________
'नातं' तुटत नाही , तुटतात ती ' मनं' 
अन ती पुन्हा जुळवायला कधी वेळ हवा असतो तर कधी प्रेमाची हलकीशी थाप , अन आपुलकीचे काही उबदार प्रेमळ शब्द ...
कितीही वाद विवाद झाले , रुसवे फुगवे झाले तरी प्रेमाचा एक हलकासा शब्द...
एक हलकसा स्पर्श ' मनातला' सारा राग क्षणात विसरून लावतं.  म्हणून प्रेमाशिवाय नातं नाही .
अन नात्यांशिवाय प्रेम ....
प्रेम जिथे नातं तिथे ....
 संकेत य पाटेकर
४.१२.२०१३
___________________________________

एकदा का माणसं ओळखता आली .........कि जुळलेल्या त्या नात्यामध्ये किती अंतर ठेवायचं  किती नाही ते आपुसकचं  कळत जातं ..
 - संकेत, १२.२०१३
___________________________________

सर्वच तर्क , शंका बरोबर असतातच अस न्हवे , सर्व तर्क शंका चुकीचेच असतात असे हि न्हवे पण त्यातले काही मात्र खरे निघतात हेही खरे .. - संकेत
___________________________________



काही प्रश्न न बोलताच सुटतात , पण काही प्रश्न बोलण्यास भाग पाडतात , तेंव्हाच ते सुटतात - संकेत

__________________________________

नातं कधीही तुटत नाही , तुटतात ती जुळलेली मनं, आणि तुटलेल्या त्या मनाला पुन्हा जुळायला थोडा अवधी हा लागतोच . - संकेत

__________________________________

जीवन म्हणजे ''त्याग'' आहे.
जीवन जगायचं म्हणजे काहीं गोष्टीनचा त्याग हा करावाच लागतो , एक तर स्वताहाच्या हितासाठी किंवा दुसर्याच्या हितासाठी , चांगल्यासाठी ...., स्वताहाच्या मनाला सावरायला लागत. मन बळकट करावं लागत.
कारण एखाद्या गोष्टीचा त्याग म्हणजे दु:ख-वेदना ह्यांचा भरमसाठ साठाच जणू !!
ते पेलायला कणखर मनाची गरज असते .
- संकेत य पाटेकर 
__________________________________

रस्त्याने जाता येता अनेक चेहरे दिसतात. 
कधी हसरे कधी रडवे ...कधी एकदम टवटवीत प्रसन्न ... कधी कुठल्या तरी विचारात बुडालेले ...आयुष्याचा विचार करणारे...
त्या सर्व चेहऱ्यांना पाहून ...मन स्वताहाच स्वताःआशीच मनातल्या मनात पुटपुटत... हे जीवन म्हणजे सुख- दुखाचाच एक मिश्रण आहे ...!!
आपल्या सुखासाठी जो तो धडपडतो ....आसवे गाळतो ..किती काबाडकष्ट कष्ट करतो. केवळ सुखासाठी ....
पण सुख सुद्धा अशी गोष्ट आहे कि ....जी हातात यावी नि निसटून जावी ...!! 
क्षणभर का असेना एक आनंद देऊन जातो तो सुख ...पण आठवणीत कायम कोरले जातात ते सुखद क्षण !!
- संकेत
__________________________________

संधी '' हि कधी - कुठे - कशी अन कोणत्या स्वरूपात येईल ते काही सांगता येत नाही म्हणून नेहमी तत्पर असणे , सावध असणे अन तयारीत असणेच चांगल .
- संकेत य पाटेकर
__________________________________
मित्रहो ,
जोपर्यंत आपल्या कडून मदतीचा हाथ कुणाला स्पर्श होत नाही . तोपर्यंत आपणास माणूस म्हणून म्हणता येणार नाही. कारण
जग चालते ते प्रेमावर
प्रेमळ अशा माणसांवर
माणसातल्या त्या माणुसकीवर ...!!!!
- संकेत
_____________________________________

मनातल्या सर्वच गोष्टी कधी कुणाला share करता येत नाही.
काही गोष्टी आपल्यालाच सहन कराव्या लागतात. मनात ते कायमचेच ठेवावे लागतात.
चेहर्यावरचं  हसू देखील मुद्दाम ठेवावं लागतं  कधी कधी कुणाच्या तरी प्रेमापायी.
 - संकेत
______________________________________

जीवन हे एकाकी असतं.
संघर्षाच...आपणच ते जगायचं असत . लढत लढत पुढे पुढे जायचं असत .
पण जीवन जगात असताना ..आपल्या माता पित्यांचा आशीर्वाद ..मित्राचं सहवास ..त्याचं प्रेम हे असायला लागत. ...प्रेमामुळेच हे जग आहे. प्रेम करा ..प्रेमाने रहा ..प्रेमाने जगा आणि प्रेमाने जगवा ....
या जन्मावर या मरणावर शतदा प्रेम करावे.....
माझ्या वाढ दिवसा निम्मित्त हा प्रेमाचा संदेश..
- संकेत
__________________________________

प्रत्त्येक क्षण हा फार महत्वाचा असतो ...
क्षण हा क्षणा क्षणाला बदलत असतो ...काही व्यक्ती आयुष्यात येतात ..अन लगेच निघून हि जातात.
.पण येन- जाण्यामाधाला जो मधला जो काल असतो..तो आपल्यास विसरता येत नाही .
.कारण त्या मधल्या काळात आपण ..एकत्र भेटतो ...बोलतो ...विचारांची देवान घेवाण करतो ...
एकमेकांचा विश्वास संपादन करतो.....आनंदाने सर्व काही चालत असत ....

पण अचानक त्या व्यक्तीच अस आपल्याला सोडून जाणं  ..त्याचं दूरवर जाणं ...
आपल्या जीवाला लागतं.
त्याच्या त्या गोड अन प्रेमळ आठवणी मध्ये आपण फार फार गुंतलो जातो.

म्हणून मित्रहो प्रत्त्येक क्षण हा प्रेमाने जगा..
क्षणाला आपण थांबवून नाही ठेवू शकत ...
शेवटी त्या गोड अन प्रेमळ आठवणीच राहतात...त्याच जगायला हि शिकवतात
- अनुभवावरून - संकेत
__________________________________
मित्रहो,
गमती जमती मध्ये आपण कुणाची मस्करी करता करता तिचं वादात केंव्हा रुपांतर होत ते कधी कळत नसत .
कुणाची मस्करी करणं ह्याला देखील काही मर्यादा असतात.
मित्रहो' 'मस्करी करताना कुणाच त्याने मन नाही ना आपण दुखवत ह्याच भान जरूर ठेवावं .
तोडन फार सोप असत जोडन फारच कठीण ...नात जोडायला शिकले पाहिजे ..प्रेमान राहायला शिकल पाहिजे.

सुप्रभात..
संकेत
__________________________________
शब्द हे फार धारदार असतात म्हणून ते जरा जपूनच वापरावे ..
एखाद्या व्यक्तीशी बोलत असताना..बोलानाच्या ओघात ..नकळत आपण काही तरी वेगळ बोलून जातो .ज्याचा समोरच्या व्यक्तीच्या मनावर खोलवर परिणाम होतो.....
मग त्याच्या मनात आपल्याविषयक वेगळ मत निर्माण होतं ....मग त्याचा आपल्यालाही त्रास अन समोरच्या त्या व्यक्तीलाही.....!!
- संकेत
__________________________________
जीवनात जितक आनंदाने राहता येईल, हसता येईल, तितक हसत खेळत राहावं ...कारण दुख हे भिंतीवरच्या पालीसारख सदाने आपल्या पाठीवर चिकटलेले असते..आपल्या अवती भोवती ...फिरत असतं.
- संकेत
__________________________________
माणूस वयाने कितीही मोठा होवो......तो प्रेमात अगदी लहान मुलासारखाच असतो....
- संकेत
__________________________________
भविष्याचा विचार करूनच वर्तमानात जगायचे असते ..तरच जीवनाला कुठे अर्थ निर्माण होईल.

-संकेत य. पाटेकर
__________________________________
ज्या व्यक्तीवर आपण सर्वात जास्त अन मनापासून प्रेम करतो..त्या व्यक्तीच्या मनाला लागेल ..टोचेल ..त्रास होईल अस वर्तन हि आपण करतो... पण शेवटी प्रेम ते सगळ काही "माफ" ..
संकेत य पाटेकर
__________________________________

आनंदाचे क्षण हे मोजकेच असतात ...दुख दारात टपलेलाच असतो...त्यामुळे आनंदाचे ते क्षण हृदयात सामावायाचे असतात ..साठवायचे असतात ...तेच क्षण आपल्याला पुढे चेहयावर नकळत हसू आणि रडूही आणतात.
- संकेत य पाटेकर
__________________________________






सोमवार, २ जुलै, २०१२

आतल्या मनाचा आवाज..

हे मनं, कधी म्हणतं  तिच्याशी खूप भांडाव , रागवावं,
पण रागाच्या भरात नको ते शब्द भराभरा निघतात अन  समोरील व्यक्तीच्या मनावर आघात करतात.
नंतर आपणासही पच्छांताप होऊ लागतो त्या गोष्टीचा.

समोरील व्यक्तीचं  वागणं कधी कधी अचानक बदलतं ...
ते कां बदलतं, ह्याची कारणं  अनेक  असतील पण ते  आपणास  मिळत नाही अन जोपर्यंत ती व्यक्ती स्व:ताहा ते सांगत नाही , खरं  काय आहे कळत नाही  . तोपर्यंत  आपण वेगळ्याच गैरसमजुतीतून  जात असतो.
मनात येतं  कि हि जाणूनं  बुजून करते आहे , भेटणं  बोलणं टाळते आहे.
पण खरी परिस्थिती वेगळी असते , असू शकते हि ...
आपण मात्र .....त्याच लयात राहतो, मनाचा ताण अधिक वाढवत जातं
- संकेत 

स्वभाव


प्रत्येकाचा स्वभाव तसा वेगळाच असतो. कुणी हसरा ...आपल्या चेहऱ्यावरच्या गोड हास्याने सर्वाना हसवत आणि खेळवत ठेवणारा , कुणी बोलका...आपल्या गोड अन प्रेमळ बोलण्याने जनमनात रुजणारा .. कुणी रागीस्ट ..त्वरित रागावणारा ....
कुणी प्रेमळ ..कुणालाही लगेच आपलास करणारा , कुणी शांत .........कोणतीही गोष्ट , समस्या शांत पणे विचार करून करणारा ...! कुणी माणसाच्या गर्दीतून दुरावेला ...सदा एकटा एकटाच राहणारा ...माणसात सहसा न मिसळणारा.
प्रत्येकाचा स्वभाव आणि त्याच इतरांशी बोलणं चालनं वागणं हे वेगवेगळ असतं.
अन म्हणून ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार आपल्यालाही त्याप्रमाणे समोरच्याशी वागावं लागतं ..बोलणं -चालनं ठेवावं लागत . नाहीतर आपण ह्या सर्वांशी एकाच पद्धतीने म्हणजे आपल्या स्वतःच्या वागण्या बोलण्या नुसार त्याच्याशी ' चर्चा किंवा संवाद' साधू लागलो तर काही गोष्टी खटकतात समोरच्याला ...
उदाहरण द्यायचाच झाल तर .... एखाद्याशी आपण आपल्याच गतीवान वेगात गमती जमतीत बरेच काही बोलून जातो ...ते समोरच्याला रुचत नाही ...त्याला राग येतो त्या गोष्टींचा .. कारण स्वभावाच त्यांचा तसा असतो ....काही ठराविक मर्यादेपर्यंत त्याच्याशी आपण मस्करी ..किंवा गंमती जमती करतो ...पण त्यापुढे नाही .
दुसर उदाहरण द्यायचं झाल तर ... एखाद्याला कितीही काही बोला ...गमतीत ते तो शब्द मनावर घेत नाही कारण त्याला ठाऊक असत समोरचा आपली मस्करी करतोय .............. तरीसुद्धा ह्यातून हेही एक निष्पन्न होत कि स्वभावाला सुद्धा काही ठराविक मर्यादा असतात.

संकेत य पाटेकर ०४.०६.२०१२

जीवनाचं खर सूत्र काय आहे ..?


कुणीतरी आपलंस आहे ..आपल म्हणणार आहे , आपल्याशी सु:ख दु:ख वाटून घेणार आहे ...ह्यातच किती धन्यता वाटते ....!!

काल रात्री एक मेसेज आला मोबईल वर ...हाय संकु ..ओळखीचाच होता ...जवळच्याच व्यक्तीचा बरेच दिवसाने आलेला हा मेसेज पाहून मी त्या मेसेज ला प्रतीउत्तर दिल. आणि मग पुढे पुढे प्रश्न - उत्तरांची साखळीच निर्माण झाली.
तिचे प्रश्न फार निराळे होते ..नैराश्याचे ...हताश झालेलं , जीवनाबद्दल कटुता निर्माण ह्वावे तसे . काहीतरी विपरीत घडलेलं काय घडल ते मलाही न्हवत ठाऊक .. पण आम्ही बोलत होतो ..एकमेकांशी मेसेज द्वारे ............
प्रत्येकच दुःख कस निराळ असतं. आनंदित सुरळीत सार काही चालू असताना नियती अचानक काही वेगळाच खेळ खेळते .काय असत तिच्या मनात काही कळत नाही .... आपल मन मात्र त्यात फार पोखरल जात , अन त्यातून बाहेर पडण कठीण होवून जात.
जीवनाचं सूत्र च नक्की कळत नाही . पावला पावलांवर अनेक असह्य धक्के खात जावे लागते . जो त्या धक्यातुनच सावरून सांभाळून पुढे येतो . तोच जीवनाचं खर सूत्र काय आहे ते समजू शकतो .

संकेत य पाटेकर ०७.०६.२०१२

आयुष्य ...



७५ टक्के आयुष्य हे दुखाने व्यापलं आहे जणू आणि २५ टक्के फक्त सुख आणि आनंद .... सुखाचे क्षण तरी किती ते हाताच्या बोटावर मोजता येईल तितके ...दुख हे अथांग महासागरासारख विस्तीर्ण ....
कधी कधी वाटत कि दुखी अश्रुनेच हां अथांग महासागर निर्माण झाला असावा . प्रत्येकाचे दुख किती वेदानात्मक असतात ...काळजावर ते अनेक घाव घालतात . पाहवत नाही ...बघवत नाही.
अस वाटतं कि गांधीजीनी ज्या प्रकारे इथल्या गोर गरिबांसाठी त्यांच्यासाठी , जोपर्यंत त्यांना अंगावर घालण्यासाठी व्यवस्थित कपडालत्ता मिळत नाही तोपर्यंत ...स्वतःसाच्या अंगावर फक्त पंचा नि धोतराच परिधान करून राहिले ..... तसं मीही माझ्या प्रिय जनासाठी जोपर्यंत त्याचं दुख दूर होत नाही ...तोपर्यंत आपण कसलीही मौज मजा न करता ह्या दुखाला कवटाळून राहावं ......अस मनात येतं :)

- संकेत

''साद - प्रतिसाद'' ............



नाते संबंधात अधिक जवळीकता आणणारे हे दोन शब्द...!!
नात्यातला गोडवा जशाचा तसा ठेवणारे हे दोन शब्द .... खूप मोल आहे ह्या दोन शब्दांना .........
आपल्या सादेला जोपर्यंत समोरच्याचा प्रतिसाद मिळत राहतो ...तोपर्यंत सर्व काही ठीक असत , पण समोरून प्रतिसाद मिळनचं बंद झाल तर साद देण्याचा उपयोग तरी काय ?
मन निराशेच्या छायेखाली अशा वेळी वाहत ..वाहत राहतं ...अन मग नात्यातली ती अतूट गाठ हळू हळू सैल होऊ लागते.
एखाद्या इको पोईन्ट असेल ...तर तिथे आपण गळा काढून एखादी हाक मारतो , जोरात ओरडतो ....कुणाच्या तरी नावाने किंवा कसेही ...पण ओरडतो, का ?तर, आपलाच ध्वनी ..प्रतीध्वनिच्या स्वरूपात ..आपल्यास पुन्हा येऊन मिळतो . तेंव्हा आनंदाला सीमा उरत नाही आपण अधिक उत्साहाने , आनंदाने पुन्हा पुन्हा साद घालतो ....
नात्यात सुद्धा असंच आहे. जोपर्यंत तुम्ही नात्यातील कोणत्याही व्यक्तीला ..तिला, तिच्या सादेला प्रतिसाद दिला नाही तर त्या व्यक्तीचा तुम्हावरील विश्वास हळू हळू कमी होत जाईल . आणि नात्यात एक दूरत्व निर्माण होईल .
नात्यात ..साद - प्रतिसाद , विश्वासाला खूप मोठी किंमत आहे ...!!
त्यानेच नातंबहरतं ..नव्या उमेदीत , नव्या उत्साहात , सुख दुखाच्या खळखळत्या प्रवाहात..एकरूपाने , एकजुटीने !

- संकेत

सह्याद्री ...


सह्याद्री ....................सह्याद्री ................सह्याद्री !!!

सह्याद्री म्हटले कि आले त्याचे रौद्र तितकेच मनाला भुलवून टाकणारे मनमोहक रूप , उंचच उंच आभाळाला भिडणारे त्याचे काळेभिन्न कातळ कडे .....तिथला सतत घुंगवत राहणारा...आपल्यासोबत वृक्ष वेलींनाहि , पक्षी पाखरांना डोलवनारा मनमुराद वारा , ते धुक्याचे दाट पांढरे ढग त्याची विस्तीर्ण पसरलेली ती रूपरेषा ...तो तिथला अलंकारित निसर्ग .... सह्याद्री म्हटले कि आले गड -कोट किल्ले , आपले आदर्श छत्रपती शिवाजी महाराज... स्वराज्य व स्वराज्याची राजधानी राजगड, रायगड , राजगडावरून स्वराज्यासाठी आखलेल्या अनेकानेक मोहिमा .... रायगडावरील तो सुवर्ण क्षण ..राज्यभिषेक सोहळा ती आठवण ...., स्वराज्यातील बळकट, भक्कम, आणि अचंबित करणारे हे किल्ले तेथील वास्तू ... त्यांचा तो रक्तरंजित इतिहास ... सह्याद्री म्हटल कि आला कोकण कडा ...ट्रेकर्स मंडळींना आपल्या अजस्त्र पण मनमोहक रूपाने नेहमीच आकर्षित करणारा कोकण कडा ....हरिचंद्र राजाची महती सांगणारा तो हरिश्चंद्र गड सह्याद्रीत वसलेले हे गड-कोट किल्ले ...त्यांचा इतिहास ..तो निसर्ग ......डोंगर दऱ्या ...नदी ..ओढे , पक्षी पाखरे ..विविध रंगी .फुले ...झाडे वेली...ती माती ...तो तिथला दरवळीत सुगंध ..तो आनंद मनाला पार भुलवून टाकतो .... असा हा ''सह्याद्री'' आणि मनाला भुलवणारा ,अद्भुत हवा हवासा वाटणारा ''निसर्ग'' मला नेहमीच वेड लावत . संकेत य पाटेकर ३० जून २०१२

गुरुवार, ७ जून, २०१२

जीवन हे खूप गुंतागुंतीच आहे

मित्रहो, 
जीवन हे खूप गुंतागुंतीच आहे ...तो गुंता सोडवता सोडवता आपण आपल्या जीवनातला आंनदच गमावून बसतो . ......अन दुखाला कवटाळून राहतो . आनंद म्हणजे नक्की काय असत ह्याचा आपणास विसरच पडतो. 
आयुष्य हे एकदांच मिळत .........म्हणून जीवनातला प्रत्येक क्षण हा शक्यतो हसत खेळत काढावा . नेहमी हसत राहावं . हसत ...हसत प्रेमाने बोलाव , कधीही कुणावर उगाच चिडू नये , द्वेषाने बोलू नये , द्वेषाचे बोल ते शब्द खूप आघात करतात एखाद्यावर. 
जीवनातला प्रत्येक क्षण हा खूप महत्वाचा आहे . .... गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही . 
म्हणून हसत रहा...आनंदात रहा , प्रेमाने बोला प्रेमाने चला 

संकेत य पाटेकर 
३०.०५.२०१२

मन ..

मनं ...........
कधी म्हणतं तिच्याशी खूप भांडाव , रागवाव.... पण रागाच्या भरात नको ते शब्द भराभरा निघतात आणि मग समोरील व्यक्तीच्या मनावर आघात करतात ...नंतर आपणासही पच्छांताप होऊ लागतो त्या गोष्टीचा.......
समोरील व्यक्तीच वागण कधी कधी अचानक बदलत...ते कां बदलत ह्याच कारण काही केल्या आपणास मिळत नाही.
जोपर्यंत ती व्यक्ती स्वताहा ते सांगत नाही , खर काय आहे ते कळत नाही तोपर्यंत आपण मात्र वेगळ्याच गैरसमजुतीन जात असतो. मनात येत कि हि जाणून बुजून अस करते आहे , भेटण बोलन वगैरे सार टाळते आहे.
...पण खरी परिस्थिती वेगळी असते , असू शकते ....पण आपण मात्र .....त्याच लयात राहतो, मनाचा ताण अधिक वाढवत जातो .
- संकेत

बुधवार, ३० मे, २०१२

खर चुकतो तो इथे आपण ..............

मनं .............
समोरील व्यक्तीच्या मनात आपल्याविषयक, आणि आपल्या मनात समोरील व्यक्तीविषयक काय विचार आहेत...काय भावना आहेत , किती प्रेम आहे , किती काळजी आहे ......हे कधी कळतंच नाही कारण हे मनं कधी कळतंच नाही ...कुणाचं कुणाला .. :( कळलं तरी फार उशिराने ते कळतं ...
तेंव्हा आपण एक तर तिच्या नजरेतून फार उतरलेलो असतो .....किंवा आपल्या मनात तिच्याविषयक प्रेम कुठेतरी कमी झालेलं असतं.
मनाची हीच गोष्ट खूप खटकते ... आपल्या मनात तिच्याविषयक असलेल प्रेमळ भावना ...तिला कळतच....नाही आणि बहुदा तिच्या मनातली आपल्याविषयक असलेली ' प्रेमळ भावना' आपल्यालाही कळत नाही ....
मनं हे अस..................मनं हे असं..
miss u a lot...!! संकेत य पाटेकर
२१.०५.२०१२
सोमवार

आपल्याला प्रिय असलेली व्यक्ती सोडून का जाते रे ?

आपल्याला प्रिय असलेली व्यक्ती सोडून का जाते रे ?
काल सायंकाळी ऑफिस मधून घरी परतत असताना ... एक मेसेज आला मोबाईल वर जवळच्याच एका व्यक्तीचा .. त्यात तिने प्रश्न केला होता ...
आपल्याला प्रिय असलेली व्यक्ती सोडून का जाते रे ?
काही क्षण त्या प्रश्नाकडे नजर माझी स्थिरावली गेली. अन क्षणात वाऱ्या गतीने मनात विचारांचे चक्र गरगर फिरू लागले . भूतकाळाच्या आठवणीत मनं कस गढून गेल.
का दुरावते ती व्यक्ती जिच्यावर आपण मनापासून प्रेम कराव ? का होत अस ? काय चुकतं आपलं ?
पहिली गोष्ट : आपण त्या व्यक्तीशी कसं बोलतो कस वागतो कस आचरण करतो ? त्यावरून तिच्या मनात आपल्या विषयीक प्रेम भावना व आदर निर्माण होत असतो.
व त्याप्रमाणेच तिचं आपल्याशी बोलणं वगैरे होत असतं.
दुसरी गोष्ट : काही वेळा ...वेळे अभावी ...व परिस्थितीच्या कचाट्यात सापडल्यामुळे त्या व्यक्तीला आपणास वेळ देता येत नाही .
भेटता येत नाही ..नि बोलता हि येत नाही . हे खर असत पण ते आपणास खोट वाटू लागत .. ती व्यक्ती जाणून बुजून आपल्याशी अस वागत आहे ह्याच तंद्रीत आपण राहतो . त्यामुळे कधी कधी अस वाटून जात . कि ती व्यक्ती आपणा पासून दुरावत चालली आहे .
तिसरी गोष्ट : आपल इतक प्रेम असत त्या व्यक्तीवर .. कि सतत आपण त्या व्यक्तीचाच रात्रंदिवस विचार करत राहतो तिच्याविना आपणास दुसर काही दिसत नाही किंवा काही सुचतच नाही . अशा वेळी समोरील व्यक्ती जीवन काय आहे , आपल ध्येय काय आहे . .. प्रेमा पलीकडे सुद्धा एक जग आहे . हे दाखवून देण्यासाठी आपणापासून काही अवधीसाठी स्वताहाच्या मनावर दबाव टाकून दूर राहते . आपल्या हितासाठी आपल्या भल्यासाठीच ..!!
बघा माझं म्हणणं पटत का ते तुम्हाला ...
संकेत य पाटेकर २४.०५.२०१२
गुरुवार

गुरुवार, १७ मे, २०१२

प्रेम..पाहायला गेल तर अवघे दोनच शब्द ..

प्रेम
पाहायला गेल तर अवघे दोनच शब्द आहेत हे 'प्रेम' पण त्या शब्दात किती भव्यता आणि विशालता दडलेय .
प्रत्येकजण आप आपल्या आयुष्यात 'प्रेम मिळाव' म्हणून किती धडपडत असतो , तळमळत असतो, रडकुंडीस देखील येतो !! कारण प्रेम हे जीवन आहे . जगण्याची एक शक्ती आहे , प्रेरणा आहे.
जीवनात प्रेम, सर्वांनाच मिळत नाही , सर्वांच्या भाग्यात नसत ते . , कुणी वंचित राहतो आईच्या प्रेमापासून , कुणी वंचित असतो बहिणीच्या मायेपासून तिच्या प्रेमळ सहवासापासून कुणी वंचित राहतो वडलांच्या कठोर पण तितक्याच प्रेमळ छायेपासून कुणी वंचित राहतो भावाच्या खेळकर , खोडकर आणि प्रेमळ सहवासापासून
प्रेम प्रेम प्रेम असत............. सर्वांनाच ते हव असत पण भाग्यात मात्र कुणाच्या असत तर कधी नसत. दु:ख त्याचच तर फार असत ..!!
मनातल काही !!
संकेत पाटेकर

आनंद आनंद आनंद हे आनंद म्हणजे तरी नक्की काय हो ?

आनंद आनंद आनंद हे आनंद म्हणजे तरी नक्की काय हो ?
१) मनाच्या कप्प्यात कुठेतरी कुणासाठी तरी एक जागा असणं..प्रेम असन तसेच समोरच्या व्यक्तीमध्ये सुद्धा तसंच काहीस मिळत जुळत असन अस दिसन आणि ते एकमेकांना समजण म्हणजे आनंद .
२) अचानक अनेक वर्षांनी महिन्यांनी दिवसांनी आपल्या प्रिय व्यक्तीचा किंवा मित्र मैत्रिणीचा फोन आला ...तेंव्हाचा तो क्षण म्हणजे आनंद
३) एखाद्या जिवलग मित्राची- मैत्रिणीची आपल्या नात्यातील व्यक्तीची वर्षानुवर्षा नंतर जी अचानक योगायोगाने म्हणा जी भेट घडते ..तेंव्हाचा तो क्षण म्हणजे आनंद
३) वणवण भटकून अथक परिश्रमाने मिळवलेला तो अन्नाचा एक दाणा म्हणजे आनंद
४) यशाच्या उंच शिखरावर आपण उभे असताना आपल्या आई वडलांच्या डोळ्यातून वाहणारे ते आनंदअश्रू पाहणे म्हणजे आनंद
५)आईच्या मांडीवर आपण कितीही मोठ झालो तरी शांत डोक ठेवून निजण तेंव्हाचा तो आनंद
६) पावसाच्या पहिल्या सरीत आंघोळ करणं तो म्हणजे आनंद
७)२-३ तासाच्या अवघड चढणी नंतर पहिला पाउल जेंव्हा पाहिलं पाउल गडाच्या माथ्यावर पडत तो क्षण म्हणजे आनंद
८) अथक परिश्रमानंतर एखाद्या वस्तूचे पक्षी प्राण्याचे आपल्याला हवा जसा फोटो मिळून जातो त्या समाधानात मिळणारा तो आनंद
अशा आनंदाच्या अनेक व्याख्या देता येतील ...मला इतक्या देता आल्या ....आपणास बघा जमतंय का ..!!
संकेत य पाटेकर
१०.०५.२०१२